आरोग्य

प्रेगनन्सीमध्ये हायड्रेट राहणं का आहे गरजेचं, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Dec 17, 2020
प्रेगनन्सीमध्ये हायड्रेट राहणं का आहे गरजेचं, जाणून घ्या कारण

गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी स्वप्नवत काळ असतो. मात्र या काळात तिला स्वतःची आणि पोटातील बाळाची अधिक काळजी घ्यावी लागते. या काळात योग्य आहारासोबत हायड्रेट राहणंही खूप आवश्यक आहे. या काळात महिलांनी नेहमीपेक्षा अधिक पाणी पिणं गरजेचं आहे कारण त्यांना दोन जीवांचे पोषण एकाच वेळी करायचं असतं. शरीर निरोगी आणि सुदढ राहण्यासाठी मुबलक पाणी पिण्याची गरज असते. ज्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडतात. यासाठीच गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज लागू शकते. माणसाचे शरीर पन्नास ते सत्तर टक्के पाण्याने तयार झालेले असते. त्यामुळे पाणी हे सर्वांसाठी जीवन  आहे असंच म्हणावं लागेल. श्वास घेणे, घाम येणे, मलमूत्र विसर्जन यातून पाण्याचा सतत ऱ्हास होत असतो. त्यामुळे सतत पाणी पिणे शरीरासाठी गरजेचं असतं. सामान्य माणसापेक्षा गरोदर महिलेच्या शरीरातील क्रिया या नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या आणि जलद गतीने होत असतात. कारण या काळात त्यांच्या शरीरात आणखी एका नव्या शरीराची निर्मिती होत असते. सहाजिकच या काळात गरोदर महिलांच्या शरीराला मुबलक पाण्याची गरज लागते. 

गरोदर महिलांनी किती पाणी प्यावे –

सामान्य माणसाला दररोज 8 ते 10  ग्लास पाणी पिण्याची आवश्यक्ता असते. गरोदर महिलांनी या प्रमाणापेक्षा कमी पाणी पिल्यास त्यांना डिहाडड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. गरोदर महिलांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. मात्र जर त्यांनी मुबलक प्रमाणात पाणी आणि लिक्विड फूड घेतलं तर हा त्रास कमी होऊ शकतो. मात्र पाणी पिताना तुमच्या घरातील पाण्यामध्ये लेडचे प्रमाण नाही. कारण असं असल्यास पाण्यामुळेही गर्भपात अथवा बाळामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. 

Shutterstock

डिहायड्रेशनचे परिणाम –

गरोदर महिलांना डिहायड्रेशन झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या बाळ आणि प्रसूतीवर होऊ शकतो. त्यामुळे हा काळात शरीरात अती उष्णता निर्माण होणे, डोकेदुखी अथवा आळस, युरिनचा रंग बदलणे अशा समस्या जाणवल्या तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर या काळात डिहायड्रेशन झालं तर किडनी स्टोन, शरीर सूजणे, बाळाच्या बौद्धिक विकासावर परिणाम होणे, युरिनरी इनफेक्शन, प्रिमॅच्युअर बेबी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच वेळीच आहाराबाबत योग्य ती काळजी घ्या आणि भरपूर पाणी आणि लिक्विड फूड खा. ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहिल. 

हिहायड्रेशन रोखण्यासाठी सोप्या टिप्स –

 

 

Shutterstock

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा –

प्रेगनन्सी विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय

Read More From आरोग्य