आपली त्वचा अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे (coronavirus) आपण ऑफिसला जात नाही. घरातूनच काम करत आहोत. पण घरातील आणि ऑफिसच्या कामाचा पसारा इतका झाला आहे की, स्वतःची काळजी करण्याचा वेळच मिळत नाही. याशिवाय काम, आरोग्य, कुटुंब यामधील वाढता ताण झेपवणेही कठीण झाले आहे. पण तुम्हाला घरच्या घरी जर आरामदायी वाटून घ्यायचे असेल आणि सर्व ताण दूर करायचा असेल तर तुम्ही रिलॅक्सिंग बाथने (relaxing bath) या समस्येवर तोडगा काढू शकता. वेळ काढून तुम्ही आंघोळ करायला हवी. याशिवाय स्किन केअर (skin care) अर्थात त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळ करताना काही रूटिन सेट करणे गरजेचे आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यात काही अशा गोष्टी मिसळल्या आणि आंघोळ केली तर फरक दिसून येतो. अशा कोणत्या गोष्टींचा आणि कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.
ऑलिव्ह ऑईल
Shutterstock
आंघोळीला जाण्याआधी आपल्या बाथटबमध्ये एक कप ऑलिव्ह ऑईल अथवा आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत 2 चमचे ऑलिव्ह ऑईल (olive oil) मिक्स करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये नैसर्गिक अशा गोष्टी असतात ज्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
फुलांच्या पाकळ्या
Shutterstock
फुलांच्या पाकळ्या विशेषतः गुलाब आणि लव्हेंडर अरोमाथेरपीचा परिणाम त्वचेवर अधिक चांगला होतो. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात दोन्ही एकत्र केले तर त्वचेसह तुमच्या मेंदूलाही रिलॅक्सेशन मिळते आणि या अरोमाथेरपीचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो.
त्वचा कोरडी होत असेल तर वापरा या 7 सोप्या टिप्स
युकलिप्टिस आणि टी ट्री ऑईल
Shutterstock
तुम्हाला जर अधिक रिलॅक्सिंग बाथची गरज असेल तर या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. युकलिप्टिस आणि टी ट्री ऑईलचे काही थेंब पाण्यात मिक्स करा आणि 4-5 वेळा दीर्घ श्वास घेत याचा सुगंध घ्या. तुमच्या त्वचेसाठी हे उत्तम असून तुमचा ताण कमी करायलाही याची मदत मिळते.
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे ‘5’ फायदे
सायट्रस
Shutterstock
लिंबू, नारिंगी, संत्री, द्राक्ष या फळांचे लहान लहान तुकडे अथवा सालं काढून आंघोळ करण्याच्या पाण्यात तुम्ही टाका. 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा. तुम्हाला विटामिन सी मुळे त्वचेला अधिक तजेलदारपणा मिळतो आणि अन्य काही करण्याची गरज भासत नाही. याच्या सुगंधामुळे अधिक ताजेतवानेदेखील वाटते.
या ‘5’ चुका पोहचवतात तुमच्या त्वचेला नुकसान, वेळीच व्हा सावध
दालिचिनी
Shutterstock
दालिचिनी या मसाल्याचं नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण खरंच दालिचिनीचा खूपच चांगला परिणाम झालेला दिसून येतो. यामुळे तुमची त्वचा केवळ मुलायमच होते असं नाही तर आंघोळीचं पाणीही अधिक अरोमॅटिक बनविण्यास याचा उपयोग होतो. दिवसभर अंगाला चांगला सुगंध येत राहतो.
ओट्स
Shutterstock
तुमची त्वचा कोरडी, खाज येणारी असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेस ओट्स घाला आणि ते फुगल्यावर तुम्ही अंगाला स्क्रब करा. इतकंसं केल्यानेही तुमची त्वचा अधिक चांगली होते. तसंच ओट्समुळे त्वचेला मुलायमपणा मिळतो.
आले
Shutterstock
तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्हा आल्याचा वापर करून घेऊ शकता. तुम्हाला केवळ आल्याचे किस करून घ्यायचा आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तो मिक्स करा आणि त्यात पाण्याने आंघोळ करा. तुमच्या त्वचेला तजेलदार बनविण्याप्रमाणेच सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
एप्सम सॉल्ट
Shutterstock
तुम्हाला जर गार्डनिंग हॅक्स माहीत असतील तर तुम्हाला एप्सम सॉल्टबद्दल नक्कीच माहीत असेल. मॅग्नेशियमवर आधारित या सॉल्टमध्ये अनेक अँटिइन्फ्लेमेटरी घटक असतात जे तुमच्या त्वचेला रिलॅक्स करण्यासाठी मदत करतात. केवळ एक बादली पाण्यात अर्धा चमचा एप्सम सॉल्ट घाला आणि मिक्स करा आणि या पाण्याने आंघोळ करा.
मध आणि लिंबू
Shutterstock
लिंबू आणि मध मिक्स केल्याने त्वचेला अधिक चांगला परिणाम मिळतो. आंघोळीच्या पाण्यात मध आणि लिंबाची सालं टाकून स्क्रब बाथ तयार करा. लिंबाच्या सालांनी तुम्ही अंगावर रडगा आणि मधामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळेल. नंतर दुसऱ्या पाण्याने पुन्हा आंघोळ करून मधाचा चिकटपणा घालवून टाका.
दूध
Shutterstock
त्वचा नैसर्गिक मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी दूध हा उत्तम पर्याय आहे. दुधाने आंघोळ करणं अथवा पाण्यात दूध घालून आंघोळ करणं हे अनादी काळापासून चालत आलं आहे. दुधातील लॅक्टिक अॅसिड हे त्वचेसाठी उत्तम ठरते. त्यामुळे तुम्ही किमान आंघोळीच्या आधी 15 मिनिट्स एका वाटीत दूध घेऊन चेहरा, मान आणि हाताला तरी दूध लावा आणि मग आंघोळ करा. काही दिवसातच तुम्हाला त्वचेमध्ये फरक दिसून येईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक