बॉलीवूड

चित्रपटांशिवाय अनुष्का शर्माने आता सुरू केलंय ‘हे’ काम

Aaditi DatarAaditi Datar  |  Feb 28, 2019
चित्रपटांशिवाय अनुष्का शर्माने आता सुरू केलंय ‘हे’ काम

विरूष्काच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं तरी हे जोडपं आजही अगदी कालच लग्न झाल्यासारखं दिसतं. विराटची क्रिकेट खेळीही जोरदार सुरू आहे तर अनुष्काने आता अभिनयासोबत एक नवं काम हाती घेतलंय.

बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माला बरेचदा जनावरांबाबत हळवेपणा असल्याचं दिसतं. ती जनावरांच्या कल्याणासाठी सदैव काही ना काही काम करतच असते. आता अनुष्काने जनावरांच्या कल्याणासाठी अजून एक मोठं पाऊल उचलंल आहे. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

सूत्रानुसार, झिरो चित्रपटातली ही अभिनेत्री जनावरांसाठी पशू आश्रय आणि हॉस्पिटल बनवणार आहे. महाराष्ट्रातील शहापूरमधील दोहागाव येथे अनुष्काने जमीन घेतली आहे. या जमिनीवर ती जनावरांसाठी आश्रय बनवणार आहे. या कामांसाठी तिला क्लिअरंसही मिळाला आहे.

अनुष्काने तिच्या मागच्या वाढदिवसालाच याबाबत वाच्यता केली होती आणि 2016 मध्येच या कामाच्या आनुषंगाने सुरूवात केली होती. या पशू आश्रय आणि हॉस्पिटलकडे अनुष्काचं बाबाच लक्ष देणार आहेत. 

एवढंच नाहीतर या जमिनीवर ती एक घरही बांधणार आहे. या घराला ती आपल्या वडिलांचं कर्नल अजय कुमार शर्मा यांचं नाव देणार आहे. अशी ही चर्चा आहे की, अनुष्काचं कुटुंब इकडे राहायला येऊ शकतं. पण अनुष्काने याबाबत अजून कोणतीही रीतसर पुष्टी केलेली नाही.  

काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा सोशल मीडियावरील तिच्या लुक-्अ-लाईक सिंगरमुळे चर्चेत आली होती.

अनुष्का शर्मा मागच्या वर्षी झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर किंग खान शाहरूख आणि कतरिना कैप मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल रायने केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही जादू दाखवू शकला नाही.

आता पाहूया या वर्षी अनुष्का या नव्या कामासोबतच बॉलीवूडमध्येही कधी झळकणार ते.

हेही वाचा –  

विराट-अनुष्का (#Virushka) ‘ह्या’ खास जागी साजरा केला लग्नाचा वाढदिवस

विरुष्काच्या लग्नाचा पहिला वाढदिवस… जाणून घेऊया त्यांची लवस्टोरी

Read More From बॉलीवूड