लाईफस्टाईल

#StrengthOfAWoman या आहेत भारतातील नवदुर्गा

Aaditi Datar  |  Mar 5, 2019
#StrengthOfAWoman या आहेत भारतातील नवदुर्गा

‘मंजिल उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।’ या फक्त ओळी नसून काही ध्येयाने भारावलेल्या व्यक्तींच्या आयुष्याचा आरसा आहेत. ज्या समाजाला दोष देत बसत नाहीत तर वाईटांवर विजयही मिळवतात. महिलांना कमी लेखणारी लोकं हे विसरतात की, तिला जन्म देताना एक महिला म्हणजेच जन्मदात्री जितकी वेदना सहन करते. तितकी वेदना कोणताही पुरूष सहन करू शकण्याचा विचाही करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणत्याही डॉक्टर किंवा बिझनेस वुमनबद्दल नाहीतर अशा काही महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी समाजाला एक नवी दृष्टी नवा विचार दिला. या महिलांनी सिद्ध (#StrengthOfAWoman) केलं आहे की, असं कोणतंही काम नाही जे महिला करू शकत नाहीत. चला तर जाणून घेऊया भारतातील अशाच काही सुपरवुमन्सबाबत –

शांती देवी, ट्रक मॅकेनिक

ट्रकचा टायर बदलणं ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही. या कामासाठी कमीत कमी दोन पुरूष आपला जोर लावतात तेव्हा कुठे ट्रकटा टायर बदलता येतो. शांती देवी भारतातील पहिल्या महिला ट्रक मॅकेनिक आहेत. ज्या एकटीने ट्रकचा टायर बदलतात. त्यांनी टायर बदलण्यासोबतच मॅकेनिकची काही इतर कामंही शिकून घेतली आहेत. आजही त्या घरही सांभाळतात आणि आपल्या नवऱ्याला या कामात मदतही करतात. शांतीदेवी जेव्हा ट्रकचा टायर बदलत तेेव्हा सुरूवातीला लोकं अवाक होतं आणि तिकडेच थांबून त्यांना बघू लागत. पण त्यांनी कधी माघार घेतली नाही आणि समाजाचा विचार न करता हे काम केलं. 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून त्या हे काम करत आहेत. 

इशिता मालवीय, वॉटर सर्फर

27 वर्षाची इशिता मालवीय भारतातील पहिली प्रोफेशनल महिला सर्फर आहे.

इशिता समुद्रातील लाटांवर बिनधास्तपणे स्वार होते आणि हे दृश्य बघताच चांगले चांगले सर्फरही बोटं तोंडात घालतात. इशिता गोव्यामध्ये सर्फिंग शिकवते आणि खेळ जगतातही ती हिरीरीने सहभाग घेते.

प्रिया झिंगन, आर्मी ऑफिसर

प्रिया झिंगन या पहिल्या महिला आर्मी ऑफिसर आहेत. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीमध्ये फर्स्ट लेडीज पुरस्काराने सन्मानितही केलं आहे. प्रिया यांनी लहानपणीच ठरवलं होतं की, लग्न करायचं नाही आणि देशाची सेवा करायची. सेनेत महिलांच्या वाढत्या सहभागातील प्रत्येक टप्प्यावर प्रिया झिंगन यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

हर्षिनी कान्हेकर, फायरफाईटर

कोणत्याही ठिकाणी आग लागली की, सर्वात आधी फायर ब्रिगेड पाचारण करण्यात येतं. फायर ब्रिगेडमध्ये साधारणपणे सर्व पुरूष कर्मचारी असतात. पण हर्षिनी कान्हेकर यांनी हा विचार बदलण्याची वेळ आल्याचं दाखवून दिलंय.

भारतातील पहिली महिला फायर फाईटर बनून हर्षिनी यांनी समाजाला दाखवून दिलं आहे की, महिला आगीपासून स्वतःचा आणि दुसऱ्यांचाही बचाव करू शकतात.

चंद्रा आणि प्रकाशो तोमर, शूटर दादी

जर तुमच्या मनात काही करायची ईच्छा असेल तर तुमचं वयही अडथळा ठरू शकत नाही. हेच उदाहरण सादर करणाऱ्या या दोन शूटर दादी आहेत. बागपतच्या बडोत कोतवालीतील जोहडी गावात राहणाऱ्या प्रकाशी (77) आणि चंद्रो (82) या संपूर्ण देशात शूटर दादी या नावाने ओळखल्या जातात. नात्याने या दोघी एकमेकींच्या जावाजावा आहेत.  70-80 वयात जिथे हात थरथरू लागतात आणि कोणाच्यातरी मदतीने उठबस करावी लागते. त्याच वयात या बिनधास्त शूटर दादीज आपल्या अचूक निशाण्याने जोहाडी राईफल क्लबमध्ये अनेक युवा निशाणेबाजांना तयार करत आहेत.

अलिशा अब्दुल्ला, सुपरबाईक रेसर

चेन्नईची अलिशा अब्दुल्ला ही भारतातील पहिली आणि एकमेव महिला सुपरबाईक रेसरआहे. तसंच भारतातील सर्वात वेगवान महिला कार रेसरही आहे. तिने वयाच्या 13 व्या वर्षीचं नॅशनल गो-कार्टींग चँपियनशिप जिंकून आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं होतं. तितकी जितकी निडर आहे आपल्या कामाबाबत आहे तेवढीच ती स्वतःही आहे.

अलिशा रेसिंग क्वीन असण्यासोबतच सुंदर आणि मल्टीटॅलेटेंड आहे. तिने चित्रपटातही काम केलं आहे.

संपत पाल, गुलाबी गँग लीडर

संपत पाल देवी या एक सामाजिक कार्यकर्ता तसंच गुलाबी गँग नामक संस्थेच्या संस्थापिका आहेत. ज्या आजच्या काळात गुलाबी साडी आणि हातात काठी घेऊन महिलांच्या अधिकारासाठी आणि कामगार हक्कासाठी लढत आहेत. पण देशापुरतंच न थांबता आज या गुलाबी गँगने अनेक देशांमध्ये आपली ओळख बनवली आहे.

2007 साली फ्रान्समध्ये महिला लेखिका मेरी आणि मार्गो यांनी संपत पाल यांच्या संघर्षमय जीवनाचा परिचय फ्रान्सच्या फीड्स या प्रकाशनात प्रकाशित केला आणि संपत पाल यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवून दिली. तसंच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही बॉलीवूडमध्ये आला होता.

एम. वसंतकुमारी, बस ड्रायव्हर

जिथे आजही महिलांची वाईट ड्रायव्हींगसाठी खिल्ली उडवली जाते. अशा समाजात 1993 सालापासून एक बस ड्रायव्हर म्हणून तामिळनाडूतील एम.वसंतकुमारी काम करत आहेत. फक्त भारतच नाहीतर आशियामधील त्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर आहेत. जेव्हा त्या बस ड्रायव्हरच्या परीक्षेसाठी पोचल्या तेव्हा लोक त्यांच्यावर हसू लागली. पण जेव्हा त्यांनी सगळ्या टेस्ट पास केल्या तेव्हा तेथील अधिकारीही आश्चर्यचकित झाले.  

नोरती बाई, कॉप्युटर गुरू

राजस्थानमध्ये  64 वर्षाच्या नोरती बाई कॉम्प्युटर शिकवून यशाचा असा आलेख लिहीला आहे, ज्याने त्या आज प्रत्येकाचा आदर्श ठरत आहेत. नोरती बाई यांनी गावातील मागासलेल्या महिलांना हायटेक बनवण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्यांचं असं मत आहे की, फक्त शहरातीलच नाहीतर गावातील लोकांनाही हायटेक होण्याचा अधिकार आहे, ज्या त्या पूर्ण करत आहेत. नोरती या आज गावातील लोकांना कॉम्प्युटर शिकवत आहेत आणि त्यांना देशातील मुख्य धारेशी जोडण्याचं कामही करत आहेत.  

हेही वाचा –

महिला दिनानिमित्त काय गिफ्ट्स देता येतील तुमच्या आयुष्यातील स्पेशल ‘महिलांना’

#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Weightloss Guide)

आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा

Read More From लाईफस्टाईल