Recipes

नारळाची इन्स्टंट बर्फी बनवा घरच्या घरी, सोपी रेसिपी

Dipali Naphade  |  Nov 11, 2020
नारळाची इन्स्टंट बर्फी बनवा घरच्या घरी, सोपी रेसिपी

सण असो अथवा कोणताही दिवस आपल्याला बऱ्याचदा जेवणानंतर तोंड गोड करावं वाटतं. अशावेळी घरात साखर किंवा गूळ खाऊन  आपण समाधान मानतो. काही वेळा बाहेरून आणलेली मिठाई खातो. घरी बनवायला त्रास होईल वेळ लागेल हा विचार करून बरेच पदार्थ आपण घरी बनवायचा घाट घालत नाही. पण घरात बनवलेल्या पदार्थांची चवच काही वेगळी असते. तुम्हाला जर इन्स्टंट मिठाई घरीच बनवा असं म्हटलं तर नक्की आश्चर्य वाटेल. ओल्या नारळाची बर्फी तुम्ही घरातल्या घरात पटकन बनवू शकता.  आता तुम्हाला वाटेल की मिठाई अर्थात बर्फी कशी काय पटकन तयार होईल. तर नक्कीच आम्ही दिलेली रेसिपी तुम्ही करून पाहा आणि वेळही वाचवा. तसंच बाहेरून आणण्याचा खर्चही वाचवा. ही मिठाई फार कमी वेळात तयार होते आणि चविष्ट असते. ओल्या नारळाची बर्फी बनवायला तुम्हाला जास्त साहित्याची गरजही भासत नाही. जाणून घेऊया ही झटपट रेसिपी. ओल्या नारळाच्या रेसिपी असतातच. त्यापैकी ही एक खास रेसिपी

रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि माहिती

Instagram

लागणारा वेळ – साधारण अर्धा तास 

तयारीसाठी – केवळ 10 मिनिट्स 

शिजण्याची वेळ – 20 मिनिट्स 

सर्व्हिंग – 6 जणांसाठी 

कॅलरी – 300 ग्रॅम 

पौष्टिक आणि चविष्ट लाडूच्या मस्त रेसिपीज (Ladoo Recipes In Marathi)

साहित्य 

बनविण्याची पद्धत

स्टेप 1 – एका नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर तुम्ही कंडेन्स्ड मिल्क ओता.  त्यानंतर ग्रेटेड सुके खोबरे त्यात मिक्स करा. एकत्र अजिबात ओतू नका.  थोडा थोडा मिक्स करत खोबरे आणि कंडेन्स्ड मिल्क व्यवस्थित मिक्स होऊ द्या. एकदम ओतल्यास ते पॅनला चिकटेल आणि खराब होईल. तसंच गॅसची आच अजिबात मोठी ठेऊ नका.  

स्टेप 2 – वरील मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्याचे दिसले की गॅस बंद करा आणि त्यात नंतर वेलची पावडर मिक्स करून व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाली की नाही ते पाहून घ्या.

स्टेप 3 – आता एका स्टीलच्या खोलगट प्लेटमध्ये अथवा केकटिनमध्ये तूप लावा आणि त्यावर नारळाचे हे मिक्स्चर ओता आणि व्यवस्थित पसरून घ्या

स्टेप 4 – लक्षात ठेवा की, हे गरम आहे तोपर्यंतच तुम्ही केकटिनमध्ये हे पसरवा. तुम्हाला हवं असल्यास, यात काजू, बदाम, पिस्ते कापून तुम्ही घालू शकता. (तुमच्या आवडीनुसार) सेट होण्यासाठी साधारण 20 मिनिट्स लागतात. तुम्ही जितक्या लवकर हे भांड्यात पसरवाल तितकी त्याची लेव्हल चांगली राहील हे लक्षात ठेवा 

स्टेप 5 – वरून तुम्ही वाटीच्या खालच्या बाजूने अथवा एखाद्या ग्लासच्या मदतीने लेव्हल सरळ करून घ्या. हवं  तर तुम्ही लाटण्याचाही उपयोग करून घेऊ शकता.

स्टेप 6 – साधारण वीस मिनिट्सनंतर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ही नारळाची बर्फी कापून घ्या. खाण्यासाठी तयार. 

ही बर्फी साधारण बाहेर चार दिवस टिकते.  जर फ्रिजमध्ये ठेवली तर साधारण आठवडाभर ही बर्फी टिकते. त्यामुळे तुम्ही ही तयार करून फ्रिजमध्येही ठेऊ शकता.  तुम्हाला खावीशी वाटेल तेव्हा काढून खा.  बनवायलाही सोपी आणि पटकन तयार होते हेच या नारळाच्या बर्फीचे वैशिष्ट्य  आहे.  मग वाट कसली पाहताय.  चला पटकन करा ही सोपी रेसिपी. 

तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From Recipes