DIY लाईफ हॅक्स

लोखंडाचा तवा आणि कढई आहे शरीरासाठी उत्तम, कसे जाणून घ्या

Dipali Naphade  |  Feb 24, 2021
लोखंडाचा तवा आणि कढई आहे शरीरासाठी उत्तम, कसे जाणून घ्या

आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो. हेल्दी लाईफस्टाईलसाठी योग्य खाणेपिणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम करणे, सकाळी उठून धावणे अशा अनेक गोष्टी करताना आपण अनेकांना पाहतो. पण आपण जेवण बनविण्यासाठी नक्की कोणती भांडी वापरतो आणि त्यातून आपल्याला कसा फायदा मिळतो याची तुम्हाला कल्पना आहे का? जेवण बनविण्यासाठी आपण अल्युमिनिअम, स्टील, लोखंडी कढई अशा अनेक भांड्यांचा उपयोग करतो. पण लोखंडाच्या कढईत भाजी बनवणे अथवा लोखंडी तव्यावर पोळ्या करणे हे आपल्या शरीरासाठी अधिक उत्तम आणि लाभदायक आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लोखंडाच्या भांड्याचा वापर करणे अधिक हितकारक आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळेच अगदी पूर्वीपासून लोखंडी भांड्यांमध्ये जेवण करायची पद्धत होती. पण आता फॅशनबेल गोष्टींमुळे ही पद्धत मागे पडली असली तरीही तुम्ही तुमच्या नियमित गोष्टीमध्ये याचा समावेश करून घेतला तर तुमच्या शरीरालाच अधिक फायदा मिळेल.

तुम्ही वापरत असलेली मातीची भांडी सिमेंटची तर नाही ना?

लोखंडाच्या भांड्यांचा काय आहे फायदा

Shutterstock

शरीरामध्ये जसे लोह वाढेल तसंच तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते. हिमोग्लोबिनची पातळी आपल्या शरीरात चांगली राहणे अत्यावश्यक आहे. हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील रक्ताद्वारे फुफ्फुस्सांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करत असते. तसंच जर हिमोग्लोबिन (hemoglobin) कमी झाले तर आपल्या शरीरातील लाल पेशी कमी होतात आणि यामुळे अनिमया आणि अन्य शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला हृदयरोग, केसांची गळती, श्वास घेण्यास त्रास होणे यासाठी हिमोग्लोबिनची रक्तातील कमतरता कारणीभूत ठरत असते. या सगळ्या आजारातून सोडविण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये अति लोह तर नक्कीच समावेश करून घेऊ शकत नाही. मग त्यापेक्षा ज्यातून लोह तुम्हाला मिळेल अशा लोखंडी भांड्यातून  जेवण बनविणे अधिक सोपे होते. लोखंडाच्या भांड्यात पदार्थ बनविल्याने त्यातील लोह हे त्या पदार्थांमध्ये उतरते आणि तुमच्या पोटात अगदी योग्य प्रमाणात लोह जाऊन त्याचा तुम्हाला फायदा मिळतो.  मात्र लोखंडाच्या भांड्याचा वापर करत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, तुम्ही एखादा आंबट पदार्थ बनवणार असाल तर तेव्हा या भांड्याचा वापर करू नका.  अन्य कोणताही पदार्थ तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये करून घेऊ शकता. 

 

हिमोग्लोबिन शरीरात योग्य असण्याचे फायदे

Freepik.com

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय (How To Increase Hemoglobin In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स