Care

शॅम्पूच्या वापरानंतर केस होत असतील असे तर आताच सोडा शॅम्पू

Leenal Gawade  |  Dec 14, 2020
शॅम्पूच्या वापरानंतर केस होत असतील असे तर आताच सोडा शॅम्पू

शॅम्पूच्या वेगवेगळ्या जाहिराती पाहिल्यानंतर ते शॅम्पू वापरुन पाहावे असे सगळ्यांना वाटते. त्यामुळे वेगवेगळे शॅम्पू आपण वापरुन पाहतो.शॅम्पू बदलताना नुसत्या जाहिराती पाहून चालत नाही. कारण त्यामध्ये असलेले घटक प्रत्येकाच्या केसासाठी चांगले असतातच असे नाही. काही शॅम्पूच्या वापरानंतर तुमचे केसांवर काही विपरित परिणाम होऊ लागतात. तुम्हीही एखादा नवा शॅम्पू वापरायला घेतला असेल आणि तुमच्या केसांमध्ये काही ठराविक बदल दिसत असतील तर तुम्ही त्या शॅम्पूचा वापर करणे आताच सोडून द्या. तुमच्या केसांवर खालील बदल दिसत असतील तर शॅम्पू बदलण्याचे हे संकेत आहेत.

मोहरीचा हेअरमास्क वापरून केस होतील अधिक घनदाट

कोरडे केस

Instagram

शॅम्पूचा वापर केल्यावर केस स्वच्छ होतात. केस स्वच्छ झाल्यानंतर केसांना शाईन देणे हे देखील शॅम्पूचे काम असते. पण काही शॅम्पूचा वापर केल्यानंतर केस कोरडे होऊ लागतात.तेलकट केसांपेक्षा कोरडे केस बरे असे अनेकांना वाटत असेल. पण असे मुळीच नाही. कारण कोरडे केस हे अधिक त्रासदायक वाटतात. कोरडे केस तुटण्याची आणि डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. काही शॅम्पूमध्ये सल्फेट किंवा काही इतर घटक मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे केसांना कोरडेपणा येतो. केसांचा हा कोरडेपणा वाढत असेल आणि तुमचे केस निस्तेज दिसत असेल तर आताच या शॅम्पूचा वापर थांबवा. त्याऐवजी तुम्हाला सूट होईल असा शॅम्पू वापरा.

केस गळतीवर वेळीच करा उपचार

केसामध्ये कोंडा

Instagram

केसांमध्ये होणारा कोंडा हा केसांसंदर्भातील आणखी एक असा त्रास आहे ज्यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसांमध्ये होणारा कोंडा अनेकपद्धतीने वाईट असतो. केसांमध्ये कोंडा झाला तर केस खराब होतात. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास हा तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. त्वचेवर पुरळ, मुरुम येऊ लागतात. त्यामुळे एखाद्या शॅम्पूच्या वापरानंतर तुम्हाला कोंड्याचा त्रास होत असेल तर तुम्ही शॅम्पूचा वापर करणे टाळा. केसांमध्ये कोंडा वाढत गेला. तर ड्राय स्काल्प होण्याची शक्यता अधिक असते. कोरड्या स्काल्पमुळे केसांचे पोअर्स बंद होतात. त्यामुळे नवे केस येण्यास अडथळा निर्माण होते.या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही शॅम्पूची निवड आणि त्याचा वापर करा. 

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

केसगळती

काही शॅम्पूमध्ये असलेले काही घटक इतके त्रासदायक असतात की, त्यामुळे केसगळती होण्याची शक्यता अधिक असते. केसगळतीचा त्रास एकदा सुरु झाला की, तो निस्तरणे फार कठीण असते.. केसगळती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.आहार, काळजी या गोष्टी जरी असल्या तरी काही गोष्टींच्या वापरामुळे या केसगळतीला चालना मिळते.  जर तुम्हाला केसगळतीचा त्रास हा  शॅम्पूच्या वापरामुळे होत असेल तर तुम्ही अशा शॅम्पूचा वापर करणे तुम्ही टाळा

एखाद्या नव्या प्रोडक्टचा वापर केसांसाठी सुरु केल्यानंतर हा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करणे त्याच क्षणी टाळा. खूप उशीर होण्यापेक्षा वेळीच परिस्थिती सांभाळून घ्या. 

 

 

Read More From Care