बॉलीवूड

#HappyBirthdaySridevi: आईच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी

Aaditi Datar  |  Aug 13, 2019
#HappyBirthdaySridevi: आईच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी

फिल्म इंडस्ट्रीतील ‘चांदनी’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी. जिचा मृत्यू अचानक आणि अकाली झाल्याने अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. श्रीदेवीच्या फॅन्सना आजही विश्वास बसत नाही की, त्यांची चांदनी निखळलीयं. तर तिच्या कुटुंबियांची अवस्था काय वर्णावी? आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर तिच्या मुलीने जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने तिला खास बर्थडे विशेस दिल्या. 

जान्हवीने शेअर केली खास पोस्ट

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा सुंदर फोटो शेअर केला असून ती आईला सिंपली #HappyBirthday मम्मा, आई लव्ह यू असं विश केलं आहे. पण या छोट्याश्या आणि साध्या मेसेजममागील अनेक भावना कोणीही समजू शकतं.

अनिल कपूरची बायको सुनीता कपूरचीही भावनिक पोस्ट

श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त तिला आठवताना अभिनेता अनिल कपूरची बायको आणि श्रीदेवीची जाऊ सुनिता कपूरनेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. श्रीदेवीसोबतचा फोटो शेअर करत लिहीलं आहे की, मेमरीज नेहमी स्पेशल असतात. कधी आपण त्या गोष्टी आठवून हसतो ज्याकाळी आपण एकत्र रडलो होतो आणि कधी आपण रडतो जेव्हा आपण आठवतो एकत्र हसलेला काळ. हेच आयुष्य आहे. #HappyBirthdaySridevi मिस यू.

मदर्स डेला ही जान्हवी झाली होती भावूक

Instagram

जान्हवी मे महिन्यात मदर्स डेच्या निमित्तानेही एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला होता. ज्यानंतर पूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली होती. जान्हवीचा पहिला सिनेमा धडक रिलीज होण्याआधीच श्रीदेवीचा मृत्यू झाला. जान्हवीच्या करिअरबाबत श्रीदेवी खूपच एक्सायटेड होती पण दुर्दैवाने तिचं बॉलीवूड करिअर सुरू होण्याआधीच मृत्यूने तिला हिरावून नेलं. या परिस्थितीतही न डगमगता जान्हवीने कुटुंबियांच्या साथीने स्वतःला सावरलं. पण तरीही तिच्या पहिल्या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अजूनही जान्हवी बॉलीवूडमध्ये चाचपडतेय. कदाचित आज श्रीदेवी असती तर जान्हवीच्या करिअरला चांगली दिशा नक्कीच मिळाली असती.

श्रीदेवीबाबत थोडंसं

Instagram

श्रीदेवीने जेव्हा मोठ्या पडद्यावर डेब्यू केलं तेव्हा ती फक्त चार वर्षांची होती. तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं Thirumugham’s Thunaivan. जो 1969 साली आला होता. तसंच श्रीदेवीचं खरं नाव आहे श्री अम्मा यंगर अय्यप्पन (Shree Amma Yanger Ayyapan). जे नंतर बदलून श्रीदेवी असं ठेवण्यात आलं. तिच्या अनेक गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे चांदनी चित्रपटातील मुख्य भूमिका. चांदनी चित्रपटातील साध्या आणि छोट्या शहरातील चांदनीच्या भूमिकेने तिने अनेकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली ती आजतागायत. तिचं गोड हसू आजही सगळ्यांच्या मनात कोरलेलं आहे. श्रीदेवीला हुस्न की मल्लिका असंही म्हटलं जायचं. आज जर ती असती तर तिचा 55 वा वाढदिवस साजरा करण्यात आला असता. असो…आज श्रीदेवी या जगात नसली तरी तिच्या चाहत्यांच्या मनात ती सदैव असेल.

हेही वाचा – 

श्रीदेवीच्या ‘चालबाज’प्रमाणे जान्हवी कपूर ‘या’ चित्रपटात साकारणार डबलरोल

अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार

जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी

Read More From बॉलीवूड