बॉलीवूड

कभी खुशी कभी गममधली ‘पू’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Trupti Paradkar  |  Dec 22, 2019
कभी खुशी कभी गममधली ‘पू’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

कभी खुशी कभी गममध्ये करिना कपूरने साकारलेली ‘पू’ ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात असेल. या चित्रपटात तिने पूजा नावाच्या तरूणीची भूमिका साकारली होती. जी शाळेत असताना अगदी साधी असते  मात्र कॉलेजमध्ये तिला तिच्या ग्लॅमरस लुकमुळे ‘पू’ या नावाने ओळखलं जातं. करिनाचे चाहते आजही तिच्या या व्यक्तिमत्वाचे चाहते आहेत. कारण ‘पू’ चे काही मीम्ज आजही सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.  चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमामुळे ‘पू’ ची व्यक्तीरेखा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कभी खुशी कभी गममध्ये ‘पू ‘साकारणारी अभिनेत्री करिना कपूरने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे लवकरच सर्वांची लाडकी पू परत येत आहे. 

पू डायरिजमधून प्रेक्षकांसमोर येणार पुन्हा ‘पू’

लवकरच पू डायरिज नावाची एक वेबसिरीज येत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांच्या पू ला भेटता येणार आहे. गुड न्यूजच्या प्रमोशन दरम्यान करिनाने याबाबत एक खुलासा केला आहे. करिनाच्या मते पूची व्यक्तिरेखा तिच्याशिवाय दुसरं कोणीच साकारू शकत नाही. करण जोहर आणि करिना यांच्यामते याबाबत चर्चा सुरू आहे. या वेबसिरिजच्या पटकथेचे लेखन सध्या सुरू आहे. या कथेचे लेखन पुर्ण झाल्यानंतर या वेबसिरिजची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

कशी असणार चाळीशीमधली ‘पू’

पू डायरिजची निर्मिती करण जोहर म्हणजेच धर्मा प्रॉडक्शन करत आहे. नेटफ्लिक्सवर या वेबसिरिजला प्रदर्शित केलं जाणार आहे. मात्र ही वेबसिरिज कधी प्रदर्शित होणार हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. कारण सध्यातरी बेबो म्हणजेच करिना आणि या वेबसिरिजमधली पू तिच्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे. करिना सध्या लाल सिंह चढ्ढाच्या शूटिंगमध्ये आणि गुडन्यूजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र त्यानंतर ती या वेबसिरिजमध्ये काम करण्यासाठी सज्ज होईल. शिवाय तिने सांगितल्याप्रमाणे या वेबसिरिजमधली पू करिनाच असेल यातही शंका नाही. त्यामुळे पुन्हा एकदा  चाहत्यांना पूचा जलवा आणि नखरे पाहता येतील. करिना कपूर लवकरच चाळीस वर्षांची होईल. चाळीस वर्षांनंतर पू साकारणं तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. कारण चाळीस वर्षांची पू नेमकी कशी असेल हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारं असणार आहे. चाळीशीनंतरची पू शांत असेल की पूर्वीप्रमाणेच चुलबुली असेल. तीचं बदलेलं रूप पाहायला मिळेल की ती पूर्वीसारखीच ग्लॅमरस आणि हॉट दिसेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना पू डायरिज पाहवी लागेल. यासोबच करिना लवकरच करणच्या तख्तमध्येही दिसणाप आहे. ज्यामुळे करिनाला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते आता उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट करणे फरहानला पडले भारी

तुम्हालाही नक्की तोंडपाठ असतील हे मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

Read More From बॉलीवूड