बिग बॉस

करण जोहर करणार यंदाच्या बिग बॉस 15 सीझनचे सूत्रसंचालन

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 29, 2021
करण जोहर होणार होस्ट

हिंदीतील सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉस 15 हा रिअॅलिटी शो लवकरच ओटीटीवर सुरु होणार आहे.  यामध्ये कोणते सेलिब्रिटी असतील याची उत्सुकता सगळ्यांनात आहे. पण यामध्ये एक मोठा बदल केला जाणार आहे. या बदलानुसार आता या रिअॅलिटी शोचे होस्टिंग सलमान खान नाही तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या शोचे होस्टिंग करण जोहर करणार असल्याची घोषणा आधीच झालेली होती.करण जोहर या शो चे होस्टिंग करत असल्याचा आनंद खूप जणांनी व्यक्त केला आहे.

“भेटली ती पुन्हा 2” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 हिना खानने व्यक्त केली प्रतिक्रिया

सौजन्य : Instagram

हिना खान बिग बॉसची एक्स स्पर्धक असून तिने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, करण जोहरची मी खूप मोठी फॅन्स असून तो हा शो होस्ट करणार याचा मला आनंद आहे. पण या घरात तीन महिने राहिल्यानंतर एवढे राहणे शक्य नाही असे वाटते. शेवटी शेवटी कंटाळा येऊ लागतो. पण आता तर हा शो चक्क 6 महिने सुरु राहणार आहे. त्यामुळे नक्कीच हे शेड्युल खूप त्रासदायक आणि हेक्टीक असणार आहे. याची चिंता तिला अधिक सतावत आहे. आता करण जोहर असो वा सलमान खान या शोचे होस्टिंग कोणीही केले तरी चालेल असेच हिनाचे मत आहे असे दिसून येत आहे. 

सगळ्यात लांब चालणार शो

एरव्ही बिग बॉस हा रिअॅलिटी शो केवळ तीन आणि जास्तीत जास्त चार महिने चालला आहे. पण यावेळी पहिल्यांदाच हा सीझन सुरुवातीपासूनच सहा महिन्याचा असणार आहे. सीझनमध्ये असलेल्या कलाकारांना मिळणारा टीआरपी पाहता यातील दिवस कमी जास्त होत असतात. पण यावेळी पहिल्यांदाच हा शो सहा महिन्यांचा असणार आहे. तब्बल सहा महिने चालणाऱ्या या शोमध्ये अनेक शॉक दिले जाणार आहेत असे देखील सांगितले जात आहे.  करण जोहर यामध्ये बरीच खुमासदार फोडणी देणार आहे.

केआरकेवर लागला विनयभंगाचा आरोप, मॉडेलने केली तक्रार

करण जोहर पहिल्यांदाच करणार बिग बॉस

करण जोहरने या आधी कॉफी विथ करणचं होस्टिंग केलेले आहे. पण बिग बॉस करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. इतके वर्ष सलमान खान करत आहे. त्यामुळे खूप जणांन  बिग बॉस म्हणजे सलमान खान हेच एक समीकरण झाले आहे. आता करण जोहर अचानक या शो चे होस्टिंग करणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या आहेत. एकीकडे उत्सुकता एकीकडे हा शो कसा असेल अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. खूप जणांना हा सीझन फ्लॉप होईल असे देखील वाटत आहे. पण आता करण जोहर या नव्या शोच्या होस्टसाठी तयारी करताना दिसत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे. 

नव्या नावांची चर्चा 

या नव्या पर्वामध्ये नव्या नावांची चर्चा देखील होऊ लागली आहे. पण अद्याप काही नावं स्पष्ट झालेली नाही. पण रिया चक्रवर्ती, अंकिता लोखंडे असा काही नावांचा उल्लेख होत आहे. 

आता होस्ट म्हणून करण जोहर हा चेहरा लोकं कसा स्विकारतात ते पाहणे महत्वाचे आहे. 

होम मिनिस्टरमध्ये लिटिल चॅम्प्स मिळवून देणार पैठणीचा मान

Read More From बिग बॉस