Care

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

Trupti Paradkar  |  Jun 17, 2021
Kes Saral Karnyasathi Upay

केस सरळ करणे म्हणजेच हेअर स्ट्रेटनिंग अथवा हेअर स्मूथनिंगची फॅशन कधीच जुनी होत नाही. त्यामुळे जरी कायमस्वरूपी केस स्ट्रेट केले नाही तरी एखाद्या कार्यक्रमासाठी तात्पुरते तुम्ही हेअर स्मूथनिंग नक्कीच करू शकता. विशेषतः जेव्हा  तुमचे  केस कुरळे असतात अथवा गुंतागुंतीचे असतात तेव्हा तुम्हाला केस सरळ करणे खूप आवडू शकते. यासाठी पार्लरमध्ये खूप वेळ आणि पैसा मात्र नक्कीच खर्च करावा लागतो. शिवाय पार्लरमध्ये यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टमध्ये खूप केमिकल्स असते. ज्यामुळे पुढे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठीच आम्ही तुम्हाला केस सरळ करणे सोपे करणाऱ्या काही नैसर्गिक घटकांची माहिती देत आहोत. या साहित्याने तुम्ही घरच्या घरी केस सरळ करू शकता. जाणून घ्या केस सरळ करण्याचे उपाय (Hair Smoothening At Home In Marathi)

नारळाचे दूध आणि लिंबू

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

लिंबाचे केसांसाठी फायदे अनेक आहेत. जसं लिंबाच्या रसामध्ये तुमचे केस सरळ करणारे गुणधर्म असतात. पण जेव्हा लिंबाच्या रसाला नारळाच्या दुधाची जोड मिळते तेव्हा त्याचा तुमच्या केसांवर नक्कीच चांगला फायदा होतो. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषणही होते. नारळाचे दुध आणि लिंबाचा मास्क केसांवर लावण्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात शिवाय केसांवर नैसर्गिक चमकही येते. शिवाय पहिल्यांदा ही ट्रिटमेंट ट्राय करणार असाल तर केस सरळ करण्याचा हा उपाय (Kes Saral Karnyasathi Upay) नक्कीच चांगला ठरेल.

साहित्य –

हेअर मास्क बनवण्याची पद्धत –

अंडे, मध आणि ऑलिव्ह ऑईल

अंड्यातील प्रोटिन्समुळे तुमच्या केसांचे चांगले पोषण होते. मध आणि ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांवर एक उत्तम कंडिशनरप्रमाणे काम करते. यासाठीच घरीच करा केस सरळ करण्याचा  हा उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

साहित्य –

हेअर मास्क बनवण्याची पद्धत –

केळी आणि पपई

जशी केळी आणि पपई तुमच्या आरोग्य आणि त्वचेसाठी उपयुक्त आहेत. तसाच याचा वापर तुम्ही तुमचे केस सरळ करण्यासाठी करू शकता. कारण या दोन्ही फळांच्या मिश्रणामुळे तुमच्या केसांचे चांगले पोषण होते आणि केस निरोगी होतात.

साहित्य –

मास्क बनवण्याची पद्धत  –

एरंडेल तेल

Kes Saral Karnyasathi Upay

एरंडेल तेल तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. पण हे तेल खूप चिकट असल्यामुळे यामुळे तुमचे कुरळे केस सरळ होतात. शिवाय केसांना छान मऊपणाही येतो. तुम्ही आठवड्यातून एकदा एरंडेल तेल केसांना नक्कीच लावू शकता.

साहित्य –

केसांना लावण्याची पद्धत –

अॅव्होकॅडो

Hair Straightening At Home In Marathi

अॅव्होकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या केसांना मऊ आणि मुलायम करतात. केसांचे टेक्चर सुधारल्यामुळे केस आपोआप मऊ आणि सरळ होतात. यासाठीच घरी केस सरळ करण्यासाठी वापरा अॅव्होकॅडो हेअर मास्क. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने सरळ आणि सुंदर दिसतील.

साहित्य –

मास्क बनवण्याची पद्धत –

मध

मध त्वचेप्रमाणे केसांसाठीदेखील अतिशय पोषक असते. मधातील घटक केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतात. ज्यामुळे केस मऊ आणि हायड्रेट राहतात. यासाठीच केस सरळ करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता.

साहित्य –

कसा बनवाल मास्क –

कोरफड

कोरफड त्वचेसाठी उत्तम असल्यामुळे कोरफडाचा गर तुम्ही स्काल्पसाठी नक्कीच वापरू शकताा. ज्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतात. शिवाय यामुळे तुमचे केस मऊ आणि सरळदेखील होतात.

साहित्य –

मास्क लावण्याची पद्धत –

कोमट तेलाने मालिश

Hair Straightening At Home In Marathi

डोक्याची चंपी म्हणजे कोमट तेलाने केसांना मालिश केल्यामुळेही तुमच्या केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. जर तुमचे केस कुरळे असतील अथवा केसांमध्ये  सतत गुंता होत असेल तर तुम्ही नियमित केसांना कोमट तेलाने मालिश करायला हवी.

साहित्य –

केसांना लावण्याची पद्धत –

मेयॉनिज

मेयॉनिज हे अंड्यापासून तयार केले जाते. सहाजिकच त्यामध्ये केसांसाठी उपयुक्त घटक असतात. अंड्यातील प्रोटिन्समुळे तुमच्या केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात. यासाठीच केस सरळ करण्यासाठी तुम्ही मेयॉनिज वापरू शकता.

साहित्य –

कसा बनवाल हेअर मास्क –

केस सरळ करणेबाबत निवडक प्रश्न – FAQ’s

1. स्मूथनिंगमुळे केस खराब होतात का ?

स्मूथनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टमुळे केस ड्राय होतात ज्यामुळे ते कमजोर झाल्याने लवकर तुटतात. यासाठी नैसर्गिक घटकांनी केस सरळ करणे केसांच्या आरोग्यासाठी नेहमी चांगले असते.

2. स्मूथनिंगनंतर केस का बांधून ठेवू नये ?

केस स्मूथनिंग केल्यावर लगेच बांधू नयेत कारण त्यामुळे तुमच्या केसांवर झालेला परिणाम कमी होतो आणि केस सरळ होत नाही. यासाठीच केस न बांधण्याचा सल्ला दिला जातो.

3. स्मूथनिंग केल्यावर रेग्युलर शॅम्पू का वापरू नये ?

केस स्मूथनिंग करताना अनेक केमिकल्सचा केसांवर वापर केलेला असतो. सहाजिकच त्यानंतर केस धुताना स्मूथनिंग केसांसाठी असलेल्या सौम्य शॅम्पू वापरण्याची गरज असते.

4. स्मूथनिंग केल्यावर केसांना तेल लावणे योग्य आहे का ?

केस स्मूथनिंग केल्यावर केसांवर अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असते. त्यामुळे केसांचा सरळ होण्याचा परिणाम टिकण्यासाठी हेअर ट्रिटमेंटच्या पहिल्या आठवड्यात तरी केसांना तेल लावू नये.

Read More From Care