बॉलीवूड

कियारा आडवाणी ‘स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार’ ने सन्मानित

Trupti Paradkar  |  Sep 16, 2021
कियारा आडवाणी ‘स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार’ ने सन्मानित

कियारा आडवाणी सध्या एकापाठोपाठ एक यशाची शिखरे गाठत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शेरशाहमधील अभिनयासाठी तिचे सगळीकडून कौतुक होत आहे. शेरशाहच्या यशानंतर तिच्या नावे आता एक महत्त्वाचा पुरस्कार झाला आहे. कियारा आडवाणीला नुकतंच सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी ‘स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यामुळे कियाराच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे. कियाराने खूप कमी वेळात उत्कृष्ठ अभिनय आणि निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकूल व्हाल थक्क

कियाराच्या नावे आणखी एक पुरस्कार

शेरशाह चित्रपटातील अभिनयासाठी कियाराला हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. निरंजन हिरानंदानी आणि नानिक रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शनी अॅकेडमीने त्यांच्या 37 व्या वर्धापन दिनी ग्लोबल पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपटांसाठी कियाराच्या योगदानाबद्दल तिला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अध्यक्षांनी शेअर केलं की, स्मिता पाटील मेमोरिअल ग्लोबल पुरस्कार हा चित्रपट इंडस्ट्रीमधील दिग्गज महिलांना सन्मानित करण्यासाठी सुरु करण्यात आला होता. ज्याचा प्रभाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात दिसत आहे. या पुरस्कारासाठी कियाराची निवड करण्यामागते कारण असे की, कियाराने खूप कमी वेळात तिच्या प्रतिभा आणि कौशल्याने या पुरस्कारासाठी स्वतःचे स्थान इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले आहे. हा पुरस्कार आतापर्यंत श्रीदेवी, डिंपल कपाडिया, पूजा भट्ट, मनिशा कोयराला, माधुरी दीक्षित, तब्बू, ऐश्वर्या रॉय, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, करिना कपूर, विद्या बालन, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, तापसी पन्नूला मिळालेला आहे. 

परशा’ अर्थात आकाश ठोसरचा नवा लुक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

शेरशाहमधील डिंपलने जिंकली प्रेक्षकांची मने

कियाने खूप कमी वेळात चित्रपट सृष्टीत स्वतःची पाळेमुळे भक्कम केली. उत्तम अभिनय करत तिने कबिर सिंहची प्रिती साकारली होती. ज्यामुळे तिची सर्वीकडे चर्चा होऊ लागली. त्यानंतर तिची सतत तिच्या ग्लॅमरस लुकसाठी चर्चा होतच राहील. मात्र शेरशाहमधील डिंपल सर्वात जास्त प्रेक्षकांना भावली. शेरशाह हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. विक्रम बत्रा एका युद्धात शत्रूच्या हल्ल्यात शहिद झाले होते. या चित्रपटात कियाराने विक्रम बत्रा यांच्या भावी पत्नी डिंपलची भूमिका साकारली होती. डिंपल यांनी विक्रम बत्रा शहिद झाल्यावर लग्न केलं नाही आणि त्यांच्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केलं. 

जेनिलिया देशमुखचा मराठमोळा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

Read More From बॉलीवूड