घर आणि बगीचा

डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

Dipali Naphade  |  Mar 17, 2021
डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

स्वयंपाकघरामध्ये आपण बरेचदा महिनाभराचं सामान भरतो. यामध्ये तांदूळ, गहू आणि अनेक डाळीच्या पिठांचा समावेश असतो. पण कधी कधी महिनाभराच्या आतच काही सामानाला अर्थातच काही डाळींच्या पिठांमध्ये अथवा अन्नधान्यांमध्ये कीड लागते. सहसा तांदळाच्या पिठात अथवा बेसनमध्ये कीड लागलेली आपल्याला दिसून येते. मग अशावेळी नक्की काय करायचे? असा प्रश्न पडतो. इतकं भरलेले सामान फेकून द्यावे लागणार का अशीही परिस्थिती निर्माण होते. घरातील रवा, बेसन आणि इतर पदार्थांमध्ये कीड लागू नये यासाठी नक्की काय करायचं याचे सोपे उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. हे सहजसोपे उपाय करून तुम्ही या त्रासातून नक्कीच तुमची सुटका करून घेऊ शकता. 

पॅकेजिंग बदला

Shutterstock

रवा, बेसन आणि मैदा यासारखे पदार्थ जास्त काळ टिकवायचे असतील तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा याचे पॅकेजिंग काढून टाकायला हवे. मूळ पॅक करण्यात आलेल्या पिशवीऐवजी तुम्ही एखाद्या डब्यात अथवा दुसऱ्या पिशवीमध्ये हे पदार्थ भरून ठेवा. तुम्ही ज्या शेल्फमध्ये हे डबे ठेवणार अथवा ही पिशवी ठेवणार ती जागा सुकी असायला हवी. पाण्याचा तिथे लवलेशही असता कामा नये. तसंच इथे दमटपणा नसावा. यामुळे पदार्थांमध्ये कीड लागणार नाही. 

तमालपत्र अथवा कडिलिंबाच्या पानाचा करा उपयोग

Shutterstock

किड्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तमालपत्र हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तमालपत्राचा उपयोग करून आपले पदार्थ किड्यांपासून सुरक्षित ठेऊ शकता. तसंच कडिलिंबाच्या पानांचाही तुम्ही यासाठी उपयोग करू शकता. मैदा, बेसन, रवा या पदार्थांच्या डब्यामध्ये तुम्ही कडिलिंबाची पाने अथवा तमालपत्र टाकून ठेवा. यामुळे कीड लागत नाही. तसंच यामुळे दमटपणाही कोणत्याही पिठाला अथवा अन्नधान्याला लागत नाही. 

एअर टाईट कंटेनरचा करा वापर

Shutterstock

पीठ आणि अन्नधान्यावर किड्यांचा वावर होऊ नये यासाठी हे पदार्थ काचेच्या बंद डब्यात अर्थात एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवावेत. हा यावरील चांगला उपाय आहे. काच अथवा मेटलच्या कंटेनर्समध्ये तुम्ही हे पदार्थ ठेवा. याशिवाय एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या कंटेनर्समध्येही तुम्ही स्वच्छ करून ठेऊ शकता. तसंच एअर कंटेनरर्समुळे पदार्थ दमट होत नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. 

तुमच्या किचन गार्डनमध्ये सोप्या पद्धतीने लावा लसूण, बाजारातून आणायची गरज नाही

रेफ्रिजरेटिंग

Shutterstock

तुम्हाला मैदा अथवा कोणतेही इतर पदार्थ टिकवून ठेवायचे असतील तर तुम्ही पीठ अथवा रवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकता. यामुळे अधिक काळ टिकते आणि त्याला कीड लागण्याची भीती राहत नाही. तसंच फ्रिजमध्ये या वस्तू ताज्या राहतात. रेफ्रिरेजरमुळे तुम्हाला या पदार्थांना अधिक काळ सुरक्षित ठेवता येते. 

अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी

कढईमध्ये भाजून ठेवा

रवा, बेसन अशी काही पिठं असतील ती तुम्ही भाजून ठेऊ शकता. बेसन आणि रवा असे पदार्थ भाजून तुम्हाला ठेवल्यानंतर जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्याशिवाय तुम्हाला पटकन पदार्थ काढल्यानंतर लगेच त्याचा पदार्थ बनवता येतो. वेळही जात नाही. भाजून ठेवल्याने कीड लागत नाही. हे पदार्थ अर्धेकच्चे भाजा आणि मग तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवता येतात. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

वापरा पुदिन्याची पाने

पुदिन्याची पाने आपण नेहमीच स्वयंपाकघरामध्ये वापरतो. हीच पाने तुम्ही पदार्थांना कीड न लागण्यासाठीही वापरू शकता. पुदिन्याची सुकलेली पाने तुम्ही या पिठांमध्ये अथवा अन्नधान्याच्या डब्यांमध्ये ठेवल्यास, कीड लागत नाही. याचा सुगंध कीड न लागण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे अन्नधान्य आणि पीठ सुरक्षित राहण्यास मदत मिळते. 

तुम्हालाही आपल्या घरातील पदार्थ सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही वर दिलेल्या सोप्या टिप्स नक्की वापरा आणि ठेवा आपले स्वयंपाकघर किड्यांपासून सुरक्षित!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From घर आणि बगीचा