मनोरंजन

कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये कोमोलिका येणार परत, पुन्हा हिनाच्या प्रतीक्षेत

Dipali Naphade  |  Sep 9, 2019
कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये कोमोलिका येणार परत, पुन्हा हिनाच्या प्रतीक्षेत

‘कसौटी जिंदगी की’ मालिका दुसऱ्यांदा सुरु झाली आणि अनुराग प्रेरणाची जोडी पुन्हा गाजली. यातही सर्वात जास्त भूमिका गाजत आहे ती म्हणजे कोमोलिकाची. एका बाजूला मिस्टर बजाजच्या कारमुळे अनुरागचा अपघात झाला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेरणा देवदासच्या पारोप्रमाणे अनुरागला वाचवण्यासाठी धावत निघाली आहे. या सगळ्या ड्रामामध्ये अजून ड्रामा वाढवण्यासाठी आता पुन्हा दमदार एंट्री होणार आहे ती म्हणजे कोमोलिकाची. जेव्हापासून कोमोलिकाची या मालिकेतून एक्झिट झाली आहे तेव्हापासून या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम झाला आहे. पुन्हा एकदा टीआरपीच्या चार्टमध्ये येण्यासाठी मिस्टर बजाजची दमदार एंट्री करण्यात ही मालिका यशस्वी झाली होती. पण पुन्हाला एकदा आता या मालिकेचा ट्रॅक रेंगाळवाणा होऊ लागला आहे. त्यामुळे आता निर्माते कोमोलिकाची भूमिका पुन्हा एकदा यामध्ये आणणार असल्याची खात्रीलायक बातमी सध्या येत आहे. 

कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री

कोमोलिकाचा ट्रॅक आणणार परत

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचे निर्माते पुन्हा एकदा कोमोलिकाचा ट्रॅक परत आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच हिना खाननेच ही भूमिका पुन्हा एकदा साकारावी या प्रयत्नांमध्ये निर्माते असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी हिना खानशी सध्या बोलणी सुरु असल्याचंही म्हटलं जात आहे. पण हिना खानने पुन्हा आपण कोमोलिका ही भूमिका करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही तर तिने निर्मात्यांना या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेण्यासाठीही याआधीच सांगितलं होतं असं सांगण्यात येत आहे. पण मालिकेच्या सेटवरील हिना खानच्या मेकअप रूममध्ये अजूनही सर्व काही तिच्या मनाप्रमाणेच ठेवण्यात आलेलं आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर मेकअप रूमच्या बाहेरील हिना खानच्या नावाची नेमप्लेटही अजून बदलण्यात आलेली नाही. त्यामुळे निर्माते हिना खानला या भूमिकेसाठी पुन्हा तयार करू शकले तर, त्यांच्यासाठी आणि हिना खानच्या चाहत्यांसाठीही ही आनंदीची बातमी असेल. 

कसौटी जिंदगी की : कोमोलिकाच्या मृत्यूचा सीन झाला लीक

एकता कपूरनेही हिनाशिवाय कोणीही नको केलं स्पष्ट

मालिकेची निर्माती एकता कपूरनेही याआधी कोमोलिकाच्या भूमिकेमध्ये हिना खान व्यतिरिक्त कोणत्याही अभिनेत्रीला पाहू शकत नाही असं स्पष्ट केलं होतं. हिनाचा होकार मिळेपर्यंत आपण थांबायला तयार आहोत असंही तिने म्हटलं आहे. हिना खानने आपलं चित्रीकरण संपवून लवकरात लवकर ही भूमिका करण्यासाठी यावं असं एकताचं म्हणणं आहे. मालिकेमध्ये कोमोलिकाची भूमिका पुन्हा येणार हे तर निश्चित आहे. पण आता ही भूमिका हिना खान करणार की अजून कोणती दुसरी अभिनेत्री साकारणार हे बघावं लागेल. या भूमिकांसाठी याआधी सनाया इराणीला विचारण्यात आलं होतं पण तिने या भूमिकेसाठी नकार दिला आहे. तर क्रिस्टल डिसुझा, करिष्मा तन्ना या नावांचाही विचार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता तर अभिनेत्री जस्मिन भासिनचं नाव या भूमिकेसाठी फायनल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. पण जस्मिनला याबद्दल विचारलं असता तिने बालाजी टेलिफिल्म्समधून आपल्याला कोणताही फोन आला नाही असं सांगितलं. याशिवाय ती सध्या राजस्थानमध्ये चित्रीकरणात व्यस्त असून बाहेरूनच आपलं नाव फायनल झाल्याचं कळत असल्याचंही ती म्हणाली आहे. त्यामुळे आता लवकरच ही भूमिका पुन्हा कोण करणार यावरून पडदा उघडेल अशी आशा प्रेक्षकांना आहे.

‘कसौटी जिंदगी की ’ मालिका सोडल्यानंतर हिना खान कुटुंबासोबत मालदीवमध्ये

Read More From मनोरंजन