DIY सौंदर्य

चेहऱ्यासाठी काय आहे लेझर ट्रिटमेंट, कसा होतो फायदा

Leenal Gawade  |  Jun 21, 2022
skin_laser_fb

 चेहरा जितका सुंदर तितका तो आकर्षक दिसतो. आकर्षक चेहऱ्याची तुमची व्याख्या काय आहे? नितळ त्वचा, चमकदार त्वचा, पिपंल्स विरहीत त्वचा. त्वचेच्या सुंदरतेची व्याख्या ही ठरलेली असते. तुम्हाला हवी असलेली त्वचा मिळवण्यासाठी जर तुम्ही काही ट्रिटमेंट करत असाल तर सध्या चेहऱ्यासाठी लेझर ट्रिटमेंट ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. मायक्रोडर्मा, स्किन पिलींग या सगळ्या ट्रिटमेंटहून अधिक प्रभावशाली अशी ही ट्रिटमेंट असून यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. चेहऱ्यासाठी केल्या जाणाऱ्या या लेझर ट्रिटमेंटविषयी जाणून घेऊया अधिक. या शिवाय लेझर हेअर रिमुव्हलबद्दलही माहिती असायला हवी.

लेझर आहे चेहऱ्यासाठी फायद्याचे

डॉक्टरांच्या मते लेझर ( Laser) हे चेहऱ्यासाठी फारच जास्त फायद्याचे असतात. ज्याप्रमाणे आपण व्यायाम करतो. त्यावेळी आपले टिश्यू फाटले जातात आणि त्या जागी खालून नवे टिश्यू येतात.  त्यामुळे त्वचेला पुन्हा एकदा नवा तजेला मिळतो.

अधिक वाचा: नारळपाण्याने करा फेशिअल, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

अशी केली जाते लेझर प्रोसिजर

लेझर प्रोसिजर करण्याआधी तुम्हाला याची माहिती असणे फार गरजेचे असते. ही प्रोसिजर पटकन होणारी आहे. 

  1. सगळ्यात आधी तुमचा चेहरा क्लिन्झ केला जातो. जर मेकअप असेल तर तो काढून टाकण्यात येतो. 
  2. त्यानंतर ही मशीन फिरवली जाते. तुम्हाला किती तीव्र लेझरची गरज आहे त्या क्षमतेचे लेझर तुम्हाला दिले जातात. 
  3. यात दोन अटॅचमेंट असतात. पहिली अटॅचमेंट ही खूप दुखते. म्हणजे काहीतरी सतत चावल्यासारखे जाणवते. हे शॉट्स घेताना असे वाटेल की, तुमची त्वचा जळतेय पण असे अजिबात होत नाही. 
  4. ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आले आहेत .त्या ठिकाणी हे शॉट्स दिले जात नाही याचे कारण असे की, असे केल्यामुळे पिंपल्स अधिक जास्त येण्याची शक्यता असते. हे लेझर उष्णता वाढवतात. ज्यामुळे पिंपल्स पॉप होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणूनच या ठिकाणी लेझर केले जात नाही. 
  5. ही प्रोसिझर झाल्यानंतर तुम्हाला सनस्क्रिन लावले जाते. त्यामुळे त्वचा सुथिंग व्हायला मदत मिळते. 

तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मगच तुम्हाला याचे सेशन घ्यायचे असतात. त्यामुळे त्याचा चांगला रिझल्ट मिळतो.

अधिक वाचा : एसपीएफ आणि फाऊंडेशन एकत्र करुन वापरा, होईल त्वचेचे रक्षण

Read More From DIY सौंदर्य