DIY फॅशन

नववधूसाठी आधुनिक भारतीय दागिन्यांचा ट्रेंड, लेटेस्ट डिझाईन्स

Dipali Naphade  |  Jun 14, 2021
नववधूसाठी आधुनिक भारतीय दागिन्यांचा ट्रेंड, लेटेस्ट डिझाईन्स

 

काळ कोणताही असो पण नववधू ही सुंदर दिसायलाच हवी. लग्न हा आपला महत्त्वाचा कार्यक्रम असतो आणि त्यातही नववधूचे दागिने हे अधिक महत्त्वाचे. लग्नाची तयारी सुरू झाली की, कोणती साडी आणि त्यावर कोणते दागिने घालायचे आहेत यावर अनेक घरांमध्ये अगदी मोठ्या चर्चाही होताना दिसतात. नववधूसाठी आधुनिक भारतीय दागिन्यांचा ट्रेंडही आता आहे. यामध्ये लेटेस्ट डिझाईन्स अर्थात आधुनिकता आणि पारंपरिकता याचा मेळ साधत अनेक दागिने बनवण्यात येतात. तुमच्या आवडीनुसार आणि डिझाईन्सनुसारही अनेक सोनारांकडे असे दागिने करून मिळतात. असाच दागिन्यांचा नवा ट्रेंड आपण या लेखातून पाहूया. तुमचंही लग्न ठरलं असेल अथवा तुमच्या मैत्रिणीला नव्या दागिन्यांचे डिझाईन्स हवे असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. आधुनिक मुलींसाठी पारंपरिकता आणि आधुनिकता असा मेळ घालणारा हा दागिन्यांचा ट्रेंड प्रत्येकाला माहीत असायलाच हवा. 

आर्किटेक्चर प्रभावित दागिने (Architecture Inspired Jewellery)

 

रिलायन्स ज्वेल्सने (Reliance Jewels) खास नववधूंसाठी आर्किटेक्चर प्रभावित दागिने अर्थात भारतीय पारंपरिकता, आपल्याकडील कलाकुसर, शिल्पकला यातून प्रभावित होऊन दागिन्यांचे डिझाईन्स केले आहेत. यामुळे नववधूच्या दागिन्यांना एक वेगळाच साज येतो. आपल्याकडे भारतात अशा अनेक पारंपरिकता आणि शिल्पकला, कलाकुसर आहेत. ज्या अजूनही अत्यंत सुंदर आहेत. यावरूनच प्रभावित होऊन अनेक डिझाईन्स बनविण्यात आले आहेत. अशा नाजूक आणि सुंदर कलाकुसरीचे दागिने हे नक्कीच नववधूसाठी वेगळे आणि अप्रतिम दिसतात. आधुनिक आणि तरीही परंपरा जपणारे असे हे नेकलेस तुम्हालाही आवडतील. 

वाचा – नवरीसाठी गळ्यातील दागिने

कंटेप्ररी टेम्पल ज्वेलरी (Contemporary Temple jewellery)

 

सगळ्याच मुलींना सोन्याचे दागिने आवडतात असं नाही. काही मुलींना दागिन्यांमध्ये वेगळेपणा हवा असतो. मग अशा नववधूंसाठी कंटेप्ररी टेम्पल ज्वेलरी हा उत्तम पर्याय आहे. लेहंगा आणि नववधूच्या आऊटफिटसाठी हे दागिने अगदी परफेक्ट आहेत. ज्या मुलींना पूर्ण सोन्याचे दागिने नको असतात, त्यांना हे जड आणि तरीही एलिगंट असे दागिने नक्कीच आवडतात. विशेषतः सिल्कच्या साड्यांचा तुम्ही लग्नात वापर करणार असाल तर तुम्हीला हे दागिने अधिक छान दिसतील. तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी सिल्क साडी आणि कंटेप्ररी टेम्पल दागिन्यांचा मेळ हा नक्कीच उत्तम आहे. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

हलके दागिने (Lightweight Queens)

 

काही मुलींना अगदी लग्नातही जड दागिने घालायला आवडत नाहीत. मग अशावेळी नक्की कोणते डिझाईन्स असावेत असा प्रश्न पडतो. तर त्यासाठी अगदी हलक्या वजनाचे आणि नाजूक असे दागिने यासाठी चांगला पर्याय आहे. शिवाय असे दागिने तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता. मुलींना जास्त जड अथवा भरलेले दागिने नको असतील तर अशा हलक्या आणि नाजूक दागिन्यांनीही तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता. पारंपरिक पद्धतीचे आणि अगदी आधुनिक आणि पारंपरिकतेचे मेळ घालून तुम्ही नाजूक कानातले हळदी आणि मेंदीच्या कार्यक्रमाला नववधूसाठी वापरू शकता. 

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

रंगीत खड्यांचे दागिने

 

नववधूच्या कपड्यांच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या खड्यांचे दागिनेही तुम्ही बनवून घेऊ शकता. रंगीत जेम सेट दागिन्यांचा सेट तुम्हाला एक रॉयल लुक मिळवून देतो. विशेषतः पाचू, हिरे अथवा चमकणारे सेमी प्रेशियस स्टोन्स असतील तर तुमच्या कार्यक्रमाची आणि अगदी तुमच्या लग्नातील लुकची शोभाही अधिक वाढते. तुम्हाला अधिक सौम्य आणि सुंदर नाजूक खडे हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगांचे खडे अथवा सोने आणि रोझ गोल्ड हे कॉम्बिनेशनही वापरू शकता. 

लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स

फ्लोरल दागिने (Floral jewellery)

ब्राईट, रंगबेरंगी आणि अत्यंत हलकी अशी फ्लोरल ज्वेलरी सध्या ट्रेंडमध्ये आहे. भारतीय नववधूंकरिता फुलांचा हार, कानातले आणि अन्य दागिने हे अगदीच सुंदर दिसतात. आपल्याकडे कपड्यांनुसार हे दागिने बनवून घेता येतात. त्यामुळे अगदी नाजूक आणि सुंदर लुक हवा असेल आणि पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम म्हणून तुम्ही फ्लोरल दागिन्यांचाही वापर करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन