मंगळसूत्र हा महिलांचा असा दागिना आहे जो रोजच्या रोज घातला जातो. वैवाहिकतेचे प्रतीक म्हणून गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. पण हल्ली मंगळसूत्रही लेटेस्ट झालेली पाहायला मिळतात. वेगवेगळ्या सरी, पेडंटनी मंगळसूत्राचा साज अधिकच चढतो. बाजारात हल्ली वेगवेगळी पेंडंट पाहायला मिळतात. रोजच्या वाट्यांपेक्षा या वाट्या थोड्या वेगळ्या असल्या तरी देखील असे मंगळसूत्र चांगलेच शोभून दिसते. तुम्हालाही थोडं हटके मंगळसूत्र करायचे असेल तर मंगळसूत्राच्या पेंडंटच्या खास डिझाईन फक्त तुमच्यासाठी
मॅग्नेटिक स्टोन्स
हिऱ्यांचे पेंडंट असेल तर ते कोणाला आवडणार नाही. हल्ली थोडे हटके पेंडंट अगदी नक्की पाहायला मिळते ते म्हणजे मॅग्नेटिक पेंडंट. या पेंडंटचा आकार तुम्हाला गोलाकार दिसेल पण ती उघड्यानंतर त्याचा आकार सरळ होतो. हे पेंडंट तुम्हाला हिरे आणि सोन्यात अमेरिकन डायमंडमध्येही घडवता येऊ शकते. हे स्टोन्स एकदम हलके असतात. त्यामुळे त्याला पातळ अशी सर देखील चालू शकते. तुम्हाला थोडे स्टायलिश असे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही चेनमध्ये कमीत कमी काळे मणी घेऊन त्याला असे फॅन्सी पेंडंट घेता येईल. मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहताना याचा विचार नक्की करायला हवा
सोलिटर मंगळसूत्र
आता डायमंडमध्ये मंगळसूत्र घ्यायचे म्हणजे त्यामध्ये सेंटचा विचार करुन आपण घेतो. जितका सेंट मोठा तितकी त्याची किंमत असते. तुम्हाला नुसता एक मोठा हिरा पेंडंट हवा असेल तर तुम्ही एक हिरा पेंडंट म्हणून लावू शकता. हे देखील खूप सुंदर दिसते. ज्यांना काहीतरी लाईट पण तितकेच सुंदर असे पेंडट हवे असेल तर तुम्हाला असे सोलिटर मंगळसूत्र करता येईल. जे तुम्हाला कोणत्याही कपड्यांवर नक्कीच घालता येईल.
वेलीचे मंगळसूत्र
सोन्यात बनवता येईल असे वेलीचे नाजूक मंगळसूत्र देखील तुम्हाला या नव्या ट्रेंडनुसार नक्कीच बनवता येईल. सोन्यात बनवले जाणारे हे मंगळसूत्र यामधये तुम्हाला ज्याप्रमाणे वेलीचा बाक असतो. तसे हे वेलीची डिझाईन असते. त्यामुळे हे पेंडंट नक्कीच थोडे वेगळे आणि छान दिसते. त्यामुळे तुम्ही अशी सुंदर डिझान्सही नक्कीच बनवू शकता. मंगळसूत्राचे महत्व तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवे.
मुहूर्तमणी मंगळसूत्र
खूप जणांकडे लग्नात मुहूर्तमणी घातला जातो.हा मुहूर्तमणी लग्नात नवरा काळ्या मण्यामध्ये ओवतो. पण त्यानंतर त्या पासून खूप जण स्वतंत्र मंगळसूत्र देखील बनवतात. जर तुम्हालाही या मण्यापासून मंगळसूत्र बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे मंगळसूत्र बनवताना मुहूर्तमणीच्या शेजारी काही काळे मणी घालून ते तयार करु शकता.
काळेमणी आणि सॉलिटर
मंगळसूत्र म्हणजे काळेमणी आलेच. तुम्हाला थोडी नाजूक डिझाईन करायची असेल तर तुम्ही एखादी मध्यम आकाराची चैन घेऊन त्यामध्ये मध्यल्या भागात काळे मणी ते अंदाजे 10 आणि त्यानंतर दोन्ही कोपऱ्यांमध्ये हिरे किंवा खडे लावू शकता. त्यामुळे ते खूपच सुंदर दिसतेय
आता नवे नाजूक असे छोटे मंगळसूत्र करायचे असेल तर तुम्ही हे मंगळसूत्र डिझाईन नक्कीच बनवू शकता.
मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार | Mundavalya Designs In Marathi
Read More From अॅक्सेसरीज
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje