Recipes

या पौष्टिक आणि चविष्ट रेसिपींसोबत यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज करा खास

Trupti Paradkar  |  Nov 11, 2020
या पौष्टिक आणि चविष्ट रेसिपींसोबत यंदा दिवाळी पाडवा  आणि भाऊबीज करा खास

भारतात दिवाळी हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. एकमेंकाना दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी दिले जातात. हा सण म्हणजे काळोखावर प्रकाशाने केलेली मात आहे त्यामुळे दिवाळी नव्या सुरूवातीचेही प्रतीकही आहे. यंदा सर्वत्र असलेल्या कोरोनाच्या संकटाला दूर करण्यासाठी या प्रकाशाची, उत्साहाची सर्वांनाच गरज आहे. खरंतर यंदा दिवाळीला या सकारात्मक ऊर्जेने सुरूवात झालेलीच आहे. आता वेळ आहे हा उत्साह द्विगुणित करण्याची…लक्ष्मीपूजनानंतर सर्वजण आतूरतेने वाट पाहत असतात दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेची. कारण त्यानिमित्ताने घरातील दूर राहत असलेली मंडळी पुन्हा एकत्र येत असतात. जीवलगांचे हितगूज जाणून घेण्याचे आणि एकमेकांना आनंद वाटण्याचा हा एक सुखद क्षण असतो. अशा वेळी घरी आलेल्या आप्तेष्टांना खूश करण्यासाठी दिवाळीच्या फराळासोबत काही तरी खास नक्कीच करायला हवं… यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज सुचवत आहोत. ज्या यंदाच्या कोरोनाच्या काळात खाणं सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. या रेसिपीज आपल्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ हेमश्री शुभ्रमण्यम आणि सब्यसाची गोराय यांनी… तेव्हा या रेसिपीज ट्राय करा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा (bhaubeej wishes in marathi) सोबत सण आनंदाने साजरा करा. 

मालपोहा (शेफ हेमश्री शुभ्रमण्यम)

मालपोहाच्या पिठासाठी साहित्य –

साखरेच्या पाकासाठी –

तळण्यासाठी –

मालपोहा तयार करण्याची कृती –

१. मैदा आणि अगोड खवा / माव्याचे मिश्रण करा आणि त्यात बडीशेप घालून नीट मिश्रण तयार करून घ्या. 

२. हळूहळू पाणी घाला आणि जाडसर ओतले जाणाऱ्या पिठात मिश्रण करा. 

३. हे पीठ १२ तास आंबू द्या. 

साखरेचा पाक –

१. पाणी उकळा आणि त्यात साखर व वेलची टाका. 

२. साखर विरघळेपर्यंत हलवा आणि मध्यम आचेवर आणखी पाच मिनिटे उकळा. 

३. साखरेचा पाक बाजूला ठेवा. 

रबडी –

१. जाड बुडाचे भांडे दूध ओतून गरम करा. आच मध्यम ठेवा आणि सातत्याने दूध हलवत राहा. 

२. दूध अर्धे झाल्यावर त्यात साखर, वेलची पावडर आणि केशराच्या काड्या घाला. नीट मिश्रण करा. 

३. अक्रोड सुमारे २ तास भिजत घाला. ते बारीक चिरा आणि रबडीत अक्रोड घालून नीट हलवून घ्या. 

४. रबडी तयार आहे.

मालपोहा-

१. तेल मोठ्या कढईत गरम करा. 

२. हळूवारपणे भिजलेले पीठ ओता. उलटा आणि कुरकुरीत आणि सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा. आता तळलेला मालपोहा साखरेच्या पाकात घाला. 

३. सुमारे २ मिनिटे साखरेच्या पाकात भिजवा. 

४. मालपोहा रबडी, बारीक चिरलेले अक्रोड आणि केशरासोबत सर्व्ह करा. 

पनीर करी (शेफ हेमश्री शुभ्रमण्यम)

मसाला पेस्ट बनवण्यासाठी साहित्य –

करी पनीर बनवण्यासाठी साहित्य –

पनीर करी करण्याची कृती  –

१. एका कढईत थोडे तेल घ्या. त्यात जिरे, दालचिनी, लवंग, बडीशेप, कांदा, हिरवी मिरची, कॅलिफोर्निया अक्रोड, आले आणि लसूण घाला. 

२. कांदे पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. हे सर्व साहित्य पूर्ण थंड होऊ द्या आणि ते मिक्सरच्या भांड्यात घाला. थोडे पाणी ओता आणि बारीक पेस्ट होईपर्यंत बारीक करा.

३. कच्चे टोमॅटो प्युरी होईपर्यंत वेगळे बारीक करा आणि बाजूला ठेवा. 

४. एका पॅनमध्ये थोडे लोणी घाला. त्यात पनीरचे तुकडे घाला आणि सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. ते बाजूला ठेवा.

५. त्याचप्रमाणे, लोण्याच्या पॅनमध्ये सिमला मिरची आणि कांद्याचे तुकडे घाला. परतून बाजूला ठेवा. 

करी बनवणे

१. एका कढईत थोडे तेल आणि लोणी घाला.  

२. ग्रेव्हीचे मिश्रण आणि टोमॅटो प्युरी ओता. 

३. आर्द्रता उडून जाईपर्यंत परता आणि त्यात मीठ, मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि थोडे पाणी घाला. 

४. सर्व मिश्रण एकत्र करून कढई झाकून ठेवा. 

५. ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवत राहा. 

६. त्यानंतर त्यात परतलेले पनीर, मिरची पावडर आणि कांद्याचे तुकडे एकामागून एक घाला आणि ग्रेव्हीत मिश्रण करा. 

७. सुमारे ५ मिनिटे परता आणि त्यात कसूरी मेथी आणि ताजी चिरलेली कोथिंबीर घाला. 

८.  सर्व्ह करताना त्यावर थोडं क्रिम घाला.

शाही तुकडा – (शेफ सब्यसाची गोराय)

रबडीसाठी साहित्य –

साखरेच्या पाकासाठी साहित्य –

सर्व्ह करण्याची साहित्य आणि कृती –

कृती –

१. ब्रेडच्या कडा काढा आणि ते त्रिकोणी आकारात कापून घ्या. 

२.  ब्रेडचे स्लाइस दोन्ही बाजूंनी ब्रेड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम तेलात तळा. 

३.  साखरेच्या पाकासाठी एका पॅनमध्ये पाणी घालून त्यात साखर घाला. त्यात हवे असल्यास थोड्या केशराच्या काड्या घाला. ते उकळा आणि मग आचेवरून काढून घ्या. 

४. ब्रेडच्या दोन्ही बाजू साखरेच्या पाकात बुडवा आणि बाजूला ठेवा. 

५.  रबडीसाठी दूध गरम करा, त्यात साखर, वेलची पावडर आणि केशराचे दूध घाला. 

६. एका प्लेटमध्ये तळलेले ब्रेड स्लाइस ठेवा आणि त्यात अर्धा कप तयार केलेली रबडी घालून सर्व्ह करा. 

अधिक वाचा –

मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज

नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज

ओट्स पासून तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज

Read More From Recipes