
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. यापुर्वी तिने 15 ऑगस्ट या चित्रपटाची निर्मिती केली होती. 15 ऑगस्ट हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता माधुरी तिच्या दुसऱ्या म्हणजेच पंचक या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती ती तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत करत आहे. नुकतंच माधुरीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर यांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तिने आजपासून आमच्या a&mmovingpictures बॅनरखाली प्रदर्शित होणारा दुसऱ्यो प्रोजेक्टचं ‘पंचक’चं शूटिंग सुरू झालं आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाोबत पाहण्यासारखा आणि अंधश्रद्धेबाबत जागरुकता निर्माण करणारा एक विनोदी चित्रपट आहे असं शेअर केलं आहे. शिवाय तिने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिच्या टीमला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. यासाठी तिने या पोस्टमध्ये शेअर केलं आहे की, “निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट “पंचक” तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पंचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा”
‘पंचक’च्या शूटिंगला सुरूवात
पंचक हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा गावाकडची असून त्यात कोकणातील अंधश्रद्धा आणि त्याविषयी असणाऱ्या अज्ञात भितीविषयी कथानक असणार आहे. मात्र असं असलं तरी त्यातून सहज घडणारे विनोद प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील. शिवाय हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट पाहू शकता. पंचक चित्रपटाची निर्मिती माधुरी आणि श्रीराम नेने करत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जठार करणार आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या प्रमुख कलाकारांसोबत आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश ओळेकर, दिप्ती देवी यांच्यादेखील भूमिका असणार आहेत. माधुरी दीक्षितचा 15 ऑगस्ट हा चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित झाला होता. फायरब्रॅंडनंतर नेटफ्लिक्सचा हा दुसरा ओरिजनल चित्रपट होता. चाळीतील जीवन आणि चाळीत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन यात दाखविण्यात आला होता. या चित्रपटामध्येदेखील आदिनाथ कोठारे शिवाय वैभव मांगले, राहुल पेठे आणि स्वप्नील जयकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
चाहत्यांची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण
मागील वर्षी एप्रिल महिन्यात माधुरीचा ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये पहिल्यांदाच माधुरीचा मराठी अंदाज प्रेक्षकांना पाहता आला. बकेट लिस्टमधुन माधुरीने मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच पदार्पण केलं आणि अनेक चाहत्यांची माधुरीला मराठीत काम करताना पाहण्याची बकेट लिस्ट पूर्ण झाली. या आधी निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये माधुरीला मराठी बोलताना पाहण्याची संधी मिळाली होती. मात्र बकेट लिस्टमध्ये माधुरीने एक प्रमूख भूमिका साकारून तिच्या चाहत्यांना थक्क केलं. या चित्रपटात माधुरीसोबत सुमीत राघवन, रेणूका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदीप वाळेकर, शुभा खोटे, दिलिप पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बकेट लिस्टमध्ये काम केल्यानंतर माधुरीने दोन मराठी चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. ज्यामुळे माधुरीचं मराठी चित्रपटसृष्टीवर असलेलं प्रेम नक्कीच दिसून येत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात
The Kapil Sharma show’ मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade