Make Up Trends and Ideas

पावसाळ्यात मेकअप करताना ‘या’ गोष्टींची काळजी जरूर घ्या

Trupti Paradkar  |  Jul 30, 2019
पावसाळ्यात मेकअप करताना ‘या’ गोष्टींची काळजी जरूर घ्या

जुलै संपून ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सण-समारंभाला सुरूवात होते. महिलांना सणसमारंभ अथवा एखाद्या कार्यक्रमासाठी नटूनथटून जाण्यात एक वेगळीच मौज असते. चांगलं दिसायचं असेल तर ट्रेंडी कपड्यांसोबत साजेसा मेकअप करणं हे आलंच. शिवाय आजकाल कॉलेज अथवा ऑफिसला जातानादेखील हलका आणि प्रोफेशनल मेकअप केला जातो. मात्र पावसात मेकअप करणं हे एक आव्हानच असतं. कारण पावसात भिजल्यामुळे अथवा हवामानातील दमटपणामुळे तुमचा मेकअप पाऱ काळ टिकू शकत नाही. यासाठीच पावसात जर तुम्हाला तुमचा मेकअप टिकवायचा असेल तर या काही टिप्स जरूर फॉलो करा

स्कीन रूटीन फॉलो करा

पावसाळ्यात त्वचा घाम आणि पाण्यामुळे तुमचा मेकअप खराब होण्याची दाट शक्यता असते. यासाठी दररोज स्कीन केअर रूटीन फॉलो करा. नियमित क्लिंझिंग, टोनिंग, मॉश्चराईझिंग, सनस्क्रीन आणि लीपबाम लावल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहील. शिवाय कमी मेकअपमध्येदखील तुम्ही सुंदर आणि फ्रेश दिसाल.  

Shutterstock

प्रायमरचा वापर करा

मेकअप करताना प्रायमरचा वापर करा. ज्यामुळे तुमची त्वचा ओलसर झाल्यास मेकअपचे पॅचेस दिसणार नाहीत. शिवाय प्रायमरमुळे तुमची त्वचा एकसमान दिसेल. 

फांऊडेशनचा वापरू नका

पावसाळ्यात फांऊडेशन न लावलेलंच बरं. कारण जर तुमचा चेहरा भिजला तर फांऊडेशनमुळे तुमच्या चेहऱ्यावर पॅचेस दिसू लागतील. त्यामुळे फांऊडेशन ऐवजी सरळ लूज पावडर अथवा कॉम्पॅक्टच लावा. 

ब्लशर निवडताना सावध रहा

मेकअप करताना ब्लशरमुळे फार सौंदर्यप्रसाधने न वापरताही तुम्ही पटकन आणि सहज सुंदर दिसू शकता. मात्र पावसाळ्यात ब्लशरची शेड निवडतान विशेष काळजी घ्या. कारण पावसाळ्यात फार क्रीमी अथवा शिमर शेड्सचं प्लशर वापरलं तर ते तुमच्या त्वचेवर व्यवस्थित ब्लेंड होणार नाही. ज्यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो. 

लिपस्टिकचा रंग निवडताना

पावसाळ्यात लिपस्टिकचे शेडदेखील जाणिवपूर्वक गडद निवडा. इतर मेकअप करण्यापेक्षा एखाद्या गडद लिपस्टिकमुळे तुमच्या लुकमध्ये पटकन बदल करता येऊ शकेल. यासाठी वॉटरप्रूफ लिपस्टिक निवडा ज्यामुळे ती फार वेळ टिकेल. लिपस्टिक ग्लॉसी निवडण्यापेक्षा मॅटच निवडा. शिवाय लिपस्टिक तुम्ही तुमच्यासोबत कॅरी देखील करू शकता. त्यामुळे कोणत्याही क्षणी लिपस्टिक लावून तुम्ही पुन्हा तयार होऊ शकता.

Instagram

आय मेकअप कसा कराल

पावसाळ्यात आय मेकअप करणं हे एक खूप मोठं टाक्सच  असू शकतं. कारण पावसात भिजल्यास तुमचा आय मेकअप लगेच निघून जाऊ शकतो. यासाठी डोळ्यांच्या मेकअपसाठी लागणारं साहित्य वॉटरप्रूफच असेल याची काळजी घ्या . आयब्रो पेन्सिल वापरण्यापेक्षा भुवया सेट करण्यासाठी लिक्वीड जेलचा वापर करा.

हेवी मेकअप करू नका

पावसाळ्यात फार हेवी मेकअप न केलेलाच बरा. यासाठी अगदी सौम्य आणि साधा लुक असेलला मेकअप करा. ज्यामुळे तो पावसाने अथवा घामाने खराब होणार नाही.

मेकअप रिमूव्हर आणि टीश्यू पेपर कॅरी करा

पावसाळ्यात मेकअप खराब होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी घराबाहेर पडताना तुमच्या बॅगेत मेकअप रिमूव्हर अथवा टीश्यू पेपर सोबत ठेवा. ज्यामुळे जर तुमचा मेकअप पावसाने खराब झालाच तर तो काढून टाकण्यासाठी तुम्हाला त्रास होणार नाही.

मेकअप किटची काळजी घ्या

पावसाळ्यात हवामानात होणाऱ्या बदलाचा तुमच्या मेकअप साहित्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी तुमच्या मेकअप किटमधील वस्तू उघड्यावर ठेवू नका. कारण हवामानातील दमटपणामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. 

 

अधिक वाचा

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा ‘या’ मेकअप टीप्स

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Make Up Trends and Ideas