DIY सौंदर्य

खास व्यक्तीला भेटायला जाताना असा करा मेकअप, टाळा या चुका

Leenal Gawade  |  Dec 29, 2021
खास व्यक्तीला भेटायला जाताना टाळा या चुका

 मेकअप हा सगळ्या महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की मेकअप करायला अनेकांना आवडतं. पण मेकअप करणे सगळ्या ठिकाणीच गरजेचे नसते. कधी कोणता मेकअप करायला हवा. विशेषत: तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला भेटायला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही मेकअप टिप्स आम्ही देणार आहोत. तुम्ही डेटवर जाताना किंवा एखाद्याला पहिल्यांदाच भेटायला जाताना मेकअपच्या कोणत्या चुका टाळायला हव्यात त्या जाणून घेऊया.

ओव्हर मेकअप टाळा

मेकअप सगळ्यांनाच आवडतो असा नाही. तुम्ही खूप मेकअप होलिक असाल तर त्यामुळे तुम्ही कोण आहात ते समोरच्या व्यक्तीला दिसत नाही. तुम्ही जसे आहात तसे जाणे हे कधीही चांगले. चेहऱ्यासाठी बेस निवडताना तो लाईट असायला हवा. त्यामुळे तुम्ही फाऊंडेशन लावत असाल तर ते थोडे कमीच असायला हवे. लाईट मेकअप असेल तर तो कॅरी करणे तुम्हाला सोपे जाते. मेकअप जरासा जरी इथे तिथे झाला तरी देखील तो तुम्हाला नीट करता येतो. त्यामुळे तुम्ही कमीत कमी आणि लाईट मेकअप करा.

लग्नासाठी ब्रायडल मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना

डोळ्यांना नका लावू खूप काजळ

डोळ्यांना नका लावू खूप काजळ

खूप जणांना काजळ आणि आयलायनर लावायला आवडते. पण हल्ली विंग्ड आयलायनर चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. डोळ्यांना काजळ किंवा आयलायनर लावताना असे आयलायनर लावा जे तुमच्या डोळ्यांना अधिक खुलवेल. खूप जण ट्रेंड फॉलो करत नाहीत. त्यांना एखादा लायनर लुक म्हणजे विंग्ड आयलायनर लुक आवडला तर तो ते कॅरी करतात. पण सगळ्या कपड्यांवर डोळ्यांना केलेला मेकअप चांगला दिसतोच असते. नाही. त्यामुळे तुम्ही डोळ्यांना खूप काजळ लावू नका. ट्रेंडमध्ये नसलेले आयलायनर लावू नका. बारीक नाजूक आणि तुमच्या डोळ्यांना उठून दिसेल असे आयलायनर तुम्ही लावा. 

रंगाचे प्रयोग करु नका

रंग कितीही आवडले तरी मेकअप एक कला आहे. यामध्ये रंगसंगतीचे भान तुम्हाला असायला हवे. लिपस्टिकचा रंग आणि आयशॅडोचा रंग याची निवड तुम्हाला करता यायला हवी. एकाचवेळी चेहऱ्यावर वेगवेगळे रंगाचे प्रयोग करणे टाळा. म्हणजे लिपस्टिकची शेड गुलाबी असेल तर आयशॅडो गडद निळा किंवा हिरवा असा रोजच्या मेकअप लुकसाठी चांगला दिसेलच असे नाही. त्यामुळे याचे भान तुम्ही नक्कीच ठेवायला हवे. 

आता कोणत्या खास व्यक्तीला भेटायला जाताना मेकअपच्या या चुका टाळा

Read More From DIY सौंदर्य