Make Up Trends and Ideas

चेहऱ्यावर असतील भरपूर पिंपल्स तर टाळा मेकअपमधील या स्टेप्स

Leenal Gawade  |  Aug 7, 2020
चेहऱ्यावर असतील भरपूर पिंपल्स तर टाळा मेकअपमधील या स्टेप्स

एखादा मस्त मेकअप व्हिडिओ पाहिल्यानंतर असाच मेकअप करावा आपल्याला वाटते. पण कोणताही मेकअप करताना तुमच्या चेहऱ्याचा पोत, तुमचा रंग आणि मेकअपकडून तुमची असलेली अपेक्षा अगदी स्पष्ट असायला हवी. हे झाले सर्वसामान्य मेकअपबाबत. पण तुमच्या चेहऱ्यावर जर खूप पिंपल्स असती तर मेकअप करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते.  काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तर तुमच्या त्वचेला कोणत्याही मेकअप प्रोडक्टमुळे त्रास होणार नाही. जाणून घेऊया तुम्ही करत असलेल्या चुका आणि मेकअप करण्याच्या सोप्या टिप्स 

लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा

तुमची त्वचा आहे का अॅक्ने प्रोन (Acne Prone Skin)

Instagram

अॅक्ने प्रोन त्वचा ही तेलकट त्वचेमध्ये मोडणारी असते. अशी त्वचा असलेल्या लोकांचे पोअर्स हे मोठे असतात. त्यामुळेच त्यांच्या पोअर्समध्ये घाण साचून पिंपल्स येण्याची शक्यता असते. काही तेलकट त्वचेवर पिंपल्स येण्याचा त्रास फारसा नसतो. त्यामुळे सगळ्याच त्वचा या अॅक्नेप्रोन त्वचेमध्ये येत नाहीत. पण तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील आणि ते लवकर न जाता त्यामध्ये पू साचत असेल तर तुमची त्वचा अॅक्ने प्रोन त्वचेमध्ये मोडते असते समजावे. या त्वचेवर तेलाचा इतका जाड थर येतो की, त्वचेच्या अन्य समस्या ही या त्वचेच्या व्यक्तिंना सहन करावे लागतात.

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

अॅक्ने प्रोन असलेल्या त्वचेसाठी असा असावा मेकअप

Instagram

आता तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील आणि तुम्ही काही चुका करत असाल तर तुम्ही या काही गोष्टींचा नक्की विचार करा.

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

Read More From Make Up Trends and Ideas