DIY सौंदर्य

मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

Dipali Naphade  |  Nov 14, 2021
makeup-tips-for-beginners

घामामुळे अथवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे तुमचा मेकअप अथवा आयलायनर खराब होते का? अथवा काजळ पसरते किंवा फाऊंडेशने हायकव्हरेज मिळत आहे का? असं अनेकदा होतं आणि मग मेकअपमुळे चेहरा खराब होतो. त्यामुळे मेकअप करताना बेसिक मेकअप टिप्स आणि ट्रिक्स माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी हे अत्यंत उपयोग ठरते. तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल तर पार्लरमध्ये जाण्याची आधी नेहमीच आवश्यकता वाटत असेल. पण तुम्ही आता पार्लरची मदत न घेता घरच्या घरीही उत्तम मेकअप करू शकता. तुम्हीही अशाच महिलांपैकी आहात की, तुम्हाला मेकअपची कोणतीही कल्पना नाही तर अशा महिलांसाठी हा लेख नक्कीच उपयोगी ठरेल. तुम्ही या लेखात दिलेल्या ट्रिक्सचा वापर करून बेसिक मेकअप टिप्सने अधिक आकर्षक दिसू शकता. आयलायनर, मस्कारा, फाऊंडेशनचा वापर, लिपस्टिकचा वापर कसा करायचा आणि चुका कशा टाळायच्या याबाबत घ्या जाणून. 

कॅट आय लुक

सर्वात व्हायरल असा कॅट आय लुक करणे अत्यंत सोपे आहे. चमचा अथवा टेपच्या मदतीने तुम्ही हा लुक करू शकता. हो तुम्ही अगदी योग्य वाचलं आहे. आयलायनर लावणे अजिबात कठीण नाही. मात्र कॅट आयाठी विंग आयलायनर लावणे नक्कीच थोडे कठीण वाटते. पण ही समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला केवळ एक चमचा अथवा टेपची गरज आहे. टेप तुम्ही तुमच्या खालच्या लॅश कॉर्नरलाला चिकटवा आणि त्यावर चमचा ठेवा त्यानंतर तुम्ही परफेक्ट कॅट आय लुक बनवू शकता 

DIY जेल आयलायनर 

हे मेकअप टिप्स आणि ट्रिक्ससाठी खूपच उपयोगी आहे. कारण DIY जेल आयलायनर बनवणेही सोपे आहे. तुम्हाला केवळ व्हॅसलिन अथवा पेट्रोलियम जेली, कोरफड जेल आणि ब्लॅक आयशॅडोची यासाठी गरज भासते. एक कंटेनरमध्ये कोरफड जेलसह अर्धा चमचा पेट्रोलियम जेली घाला मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये तुम्ही आयशॅडो मिक्स करा. मात्र याच्या गुठळ्या होऊ देऊ नका. आता हे मिश्रण ब्रशने तुम्ही मेकअपसाठी वापरा. यामध्ये केमिकलही नाही आणि याचा तुम्हाला त्रासही होत नाही. तसंच तुम्ही नियमित याचा वापर करू शकता.

2-इन-1 लिप आणि चिक कलर 

मेकअप उत्पादने महाग असतात. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी आणि एक उत्पादनातून 2-इन-1 उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्ही लिप – चिक कलरचा समाविष्ट करून घ्या. मेकअप टिप्स आणि ट्रिक्समध्ये याचा नक्की वापर करून घ्या.  लिप कलरचा वापर ब्लश म्हणूनही होऊ शकतो हे लक्षात घ्या. तुम्ही त्याप्रमाणे आपल्या लिपस्टिकची निवड करा. तसंच तुम्ही लिप क्रेयॉनचा वापर ब्लश करण्यासाठी गालावर करू शकता. लहान लहान स्ट्रोक लाऊन गाल अधिक आकर्षक करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांचा वापर करावा. नैसर्गिक लुक मिळविण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. 

लिपस्टिकसाठी टिप्स 

तुम्ही नेहमी हे लक्षात घेतलं असेलच की लिपस्टिक लावल्यानंतर काही वेळात ती निघून जाते. काही जणांना ओठांवर जीभ फिरवल्याने, खाल्ल्याने लिपस्टिक जास्त काळ टिकत नाही. पण या टिप्सचा वापर करून तुम्ही लिपस्टिक अधिक काळ टिकवू शकता. यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करावा. यामुळे किमान 6-7 तास लिपस्टिक ओठांवर टिकून राहण्यास मदत मिळते. लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर एकदा टिश्यू लावा. आता ओठांवर टिश्यू पेपर ठेवा आणि मग त्यावर कॉम्पॅक्ट पावडर आणि सेटिंग पावडर हाताने लावा. असं केल्याने लिपस्टक सेट होते आणि अधिक काळ टिकते

DIY लिप स्क्रब

नैसर्गिक DIY लिप स्क्रबचा वापर अधिक काळ टिकणाऱ्या मेकअपसाठी आणि टिप्स आणि ट्रिक्ससाठी चांगला उपयोगी ठरतो. ओठांना केवळ आऊटलाईन केल्यामुळे फुलर ओठ दिसून येत नाहीत. ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स हटविण्यासाठी स्क्रबची आवश्यकता असते. त्यामुळे यासाठी एका बाऊलमध्ये कॉफी आणि नारळाचे तेल घ्या. हे व्यवस्थित मिक्स करा आणि आपल्या ओठांना लावा. त्यानंतर अगदी हलक्या हाताने ओठ एक्सफोलिएट करणे सुरू करा. हे डेड स्किन सेल्स हटविण्यास मदत करतात आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला फुलर ओठ आणि परफेक्ट ओठ मिळतात. 

परफेक्ट काजळ लावण्याची ट्रिक 

तुम्हाला काजळ लावायला आवडत असेल तर तुम्ही अधिक काळ काजळ टिकविण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरायला हवी.  डोळ्यांच्या खालच्या लॅशलाईनला काजळ लावल्यानंतर आयलायनर अथवा आयशॅडोचा वापर करा आणि काजळाच्या वर अजून एक लाईनचा वापर करा. हे तुमचे काजळ अधिक घनदाट दाखवतेच आणि डोळे अधिक आकर्षक दाखविण्यास मदत करते. तसंच अधिक काळ टिकण्यासही मदत मिळते. 

Read More From DIY सौंदर्य