Eye Make Up

डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi

Leenal Gawade  |  Oct 8, 2020
डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi

डोळ्यांचा मेकअप परफेक्ट झाला तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसते. मोठे, सुंदर,आकर्षक,टपोरे असे डोळे सगळ्यांनाच आवडतात. कारण असे डोळे लगेचच आपल्याला आकर्षित करुन घेतात. सगळ्यांच्याच डोळ्यांचा आकार हा सारखा नसतो.काहींचे डोळे हे चेहऱ्याच्या तुलनेने फारच लहान असतात. पण डोळे लहान असले म्हणून काय झाले ‘मेकअप’ हा त्यावर एकदम रामबाण उपाय आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने मेकअप केला तर तुमचे डोळेही तितकेच सुंदर आणि आकर्षक दिसू शकतात. डोळ्यांचा मेकअप नेमका कोणत्या पद्धतीने केला की, तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही ट्रिक्स शेअर करणार आहोत ज्याने तुमचे छोटे डोळेही उठून दिसतील.

डार्क सर्कलपासून मिळवा सुटका (Get Rid Of Dark Circles)

Instagram

डोळे लहान असतील आणि तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ (Dark Circle) असतील. ती योग्य पद्धतीने मेकअपमध्ये कव्हर केले नाही तरीही तुमचे डोळे आकर्षक दिसत नाहीत. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करण्याची तुमची पहिली पायरी म्हणजे काळी वर्तुळे झाकणे महत्वाचे असते. त्यासाठी तुम्ही ‘कन्सिलर’ (Concealer) चा उपयोग करा.

असे वापरा कन्सिलर 

*तुम्ही चांगल्या कन्सिलरच्या शोधात असाल तर POPxo च्या मते तुम्ही घ्यावे हे बेस्ट कन्सिलर 

आयब्रोज करा हायलाईट (Highlights Eyebrows)

Instagram

जाड आयब्रोज हा हल्लीचा ट्रेंड आहे. जर तुम्ही अजून पर्यंत तुमच्या आयब्रोजवर प्रयोग केले नसतील तर तुम्ही अगदी हमखास आयब्रोजना हायलाईट करण्याचे काम करायला हवे. आयब्रोज गडद केल्यामुळे तुमच्या डोळ्यांकडे अर्थातच अनेकांचे लक्ष जाईल. पण आयब्रोजचा आकार नीट करायचा असेल किंवा त्यांना अधिक आकर्षक करायचे असेल तर तुम्ही आयब्रोजसाठी मिळणाऱ्या खास प्रोडक्टसचा वापर करु शकता. 

असा करा वापर :

*तुम्ही चांगल्या आयब्रोज फिलरच्या शोधात असाल तर POPxo च्या मते हे आहे बेस्ट प्रोडक्ट 

आयशॅडोचा शेड (Eyeshadow Shade)

Instagram

आता सुरु होतोय डोळ्यांचा खरा मेकअप. आयशॅडोच्या रंगाची निवड ही तुमच्या डोळ्यांसाठी फारच महत्वाची असते. कारण त्यावरच मेकअपचा सारा खेळ अवलंबून असतो. जर तुम्ही योग्य आयशॅडोची शेड निवडली तर तुमचे डोळे अधिक खुलून दिसतात. लहान डोळ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर आदर्श डोळ्यांला हवी असलेली क्रिस लाईन आयशॅडोच्या मदतीने काढता येतात. डोळ्यांसाठी आयशॅडो पॅलेट कसे निवडायचे ते शिका. 

असा करा वापर 

*न्यूड आयशॅडो पॅलेट हवे असेल तर POPxo च्या मते तुम्ही या प्रोडक्टसची करावी खरेदी 

वॉटरलाईन करा गडद (Darken The Waterline)

Instagram

डोळ्यांच्या खालच्या भागाला वॉटरलाईन असे म्हटले जाते. डोळ्यांच्या मेकअपमध्ये वॉटरलाईन फार महत्वाची असते. त्यामुळे तुमचा मेकअप खुलून दिसण्यास अधिक मदत मिळते. हल्ली वॉटरलाईनला काजळचे वेगवेगळे रंग लावले जातात. त्याप्रमाणे तुम्ही काळा, पांढरा असा कोणताही रंग निवडू शकता.

असा करा वापर 

*स्मज फ्री आणि गडद काजळ शोधत असाल तर POPxo चा सल्ला तुम्ही घ्या ही काजळ पेन्सिल 

डोळ्यांवरील क्रिस करा हायलाईट (Highlight Crease On The Eyes)

Instagram

डोळ्यांवरील क्रिसलाईन ही डोळे मोठे दाखवण्यासाठी फारच महत्वाची असते. क्रिसलाईन हायलाईट करण्यामुळे तुमचे डोळे अधिक मोठे आणि चांगले दिसू लागतात. आयशॅडो लावतानाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे क्रिसलाईन हायलाईट करणे तुम्हाला डोळे मोठे दाखवणारा #cutcreaseeyes असा लुक करायचा असेल तर तुम्ही तो लुकही करु शकता. 

असा करा #cutcrease लुक 

*आयशॅडो प्राईमर लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला POPxo तुम्हाला हे प्रोडक्ट नक्की ट्राय करु शकता. 

लॅश करा आयलॅश (Curl The EyeLashes)

Instagram

डोळ्यांच्या सौंदर्यामध्ये भर घालणरी आणखी एक गोष्ट म्हणजे आयलॅश कर्ल. जर तुम्ही या पूर्वी याचा वापर कधीही केला नसेल तर तुम्ही आता करा. कारण त्यामुळे तुमचे डोळे अधिक चांगले दिसतात. त्यावर मस्काराही अगदी योग्य पद्धतीने उठून दिसतो. 

असा करा वापर 

*तुम्हालाही हवे असेल आयलॅश कर्लर तर POPxo च्या दृष्टिकोनातून याची करावी निवड 

पांढऱ्या काजळ पेन्सिलचा करा वापर (Use Of White Kajal Pencil)

Instagram

काजळ पेन्सिलचा वापर डोळ्यांसाठी करणे हे फारच गरजेचे असते. पण पांढरी काजळ पेन्सिल हे तुमचे डोळे अधिक उठून दिसण्यास मदत करते. कारण त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही या पांढऱ्या पेन्सिलचा वापर करा. 

असा करा वापर 

*POPxo ने तुमच्यासाठी निवडली आहे ही पांढऱ्या रंगाची आयपेन्सिल 

 

डोळ्यांखालील सूज करा कमी (Reduces Puffiness)

Instagram

 

डोळ्यांखाली असलेली सूज कमी करणे कोणत्याही मेकअपसाठी तुमचे डोळे चांगले दिसणे गरजेचे असते. तुमच्या डोळ्यांखाली फुगीर भाग आला असेल तर तुम्ही तो मेकअपच्या आधी कमी करणे गरजेचे आहे. बाजारात उत्तम प्रतीचे आय मास्क मिळतात. ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली असलेला पफीनेस कमी होते आणि तुमचे डोळे छान दिसतात. डोळ्यांची सूज कमी झाली की, तुम्ही अगदी हमखास त्यावर मेकअप करु शकता. 

*डोळ्यांसाठी खास मास्क शोधत असाल तर POPxo निवडेल हे प्रोडक्ट 

आयलायनर लावा योग्यपद्धतीने (Apply Eyeliner Correctly)

Instagram

आयलायनर लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. जाड आयलायनर लावल्यामुळे डोळे लहान दिसतात असे जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. कारण लायनर लावल्यामुळेच तुमचे डोळे अधिक खुलून दिसतात. पण दोन्ही डोळ्यांंना योग्यपद्धतीने लायनर लावा. आयलायनरचा कोणताही प्रकार करताना तू खूप जास्त होणार नाही याची काळजी घ्या 

असे लावा लायनर 

*उत्तम पेन्सिल आयलायनर हवे असेल तर POPxo सांगतेय हे प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी बेस्ट 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. पांढऱ्या रंगाच्या आयलायनरमुळे तुमचे डोळे मोठे दिसतात का ? 

पांढरा रंग हा त्वचेवरील काही भागांना लावल्यानंतर तो भाग उठून दिसतो. मेकअपमध्येही पांढऱ्या रंगाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. हल्ली डोळ्यांसाठी आयलायनरचे वेगवेगळे रंग येतात. त्यामध्ये हल्ली प्रामुख्याने वापरला जाणारा रंग म्हणजे पांढरा. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे लायनर असेल तर त्यामुळे तुमचे डोळे नक्कीच उठून दिसतात. पण जर तुम्हाला ते योग्य पद्धतीने लावता आले नाही तरी देखील डोळे लहान दिसू शकतात. त्यामुळे आयलायनरच्या रंगापेक्षा टेक्निक ही फार महत्वाची आहे. 

2. मोठ्या पापण्या लावल्यामुळे डोळे मोठे दिसतात का ?

चेहऱ्याला शोभेल इतक्याच पापण्या लावणे गरजेचे असते. जर तुम्ही पापण्या खूप मोठ्या लावल्या तरी त्या तुमच्या डोळ्यांच्या मेकअपला म्हणावा तितका न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे फार मोठ्या आणि फार दाट पापण्या लावण्याचा प्रयत्न करु नका. त्याऐवजी जितकी गरज आहे तितक्याच मोठ्या पापण्या लावा 

3. डोळ्याखाली आयलायनर लावल्यामुळे डोळे लहान दिसू शकतात का ? 

मुळीच नाही! डोळ्यांखाली लायनर लावल्यामुळे डोळे मोठे दिसतात आणि अधिक सुंदर दिसतात. पण तरीही डोळ्यांखाली लायनर लावताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे कारण जर तुम्ही डोळ्यांना नीट लायनर लागले नाही तरी तुमचे डोळे लहान दिसू शकतात. 

आता तुम्ही डोळ्यांना अशापद्धतीने मेकअप केला तर तुमचे छोटे डोळे आकर्षक आणि मोठे दिसतील.

Read More From Eye Make Up