Fitness

मखाना खाण्याचे फायदे, जाणून घ्या (Makhana Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Jun 6, 2021
Makhana Benefits In Marathi

आपण हल्ली खूपच हेल्थ कॉन्शस झालो आहोत. फिटनेसकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या चुकीच्या लाईफस्टालमुळे अनेक रोगांना आपणच आमंत्रण देतो. भूक तर लागणारच पण त्यासाठी नक्की काय निरोगी आरोग्या राहील असे पदार्थ खायचे याचा आपण विचार करतो. यामध्येच आता एक नाव समाविष्ट झालं आहे ते म्हणजे मखाना (मखाणा). अनेकांना मखाना भाजून खायाला खूपच आवडतात. तर काही जणांना तळून खायला आवडते. तर याची खीरही बनवता येते. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही पदार्थ बनवून झाले की, या प्रत्येक पदार्थाची वेगळी चव लागते. मखाणा (makhana) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मखाना खाण्याचे फायदे (makhana benefits in marathi) अनेक आहेत. या लेखातून आपण मखाना खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. तुम्हीही वेळेवर आता आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरूवात करा. तत्पूर्वी आपण मखानामधील पोषक तत्वे जाणून घेऊया. 

मखानामधील पोषक तत्वे (Nutritional Value Of Makhana)

Nutritional Value Of Makhana

मखाना खाण्याचे फायदे (makhana benefits in marathi) हे त्यातील पोषक तत्वांमुळे मिळतात. यामध्ये नक्की कोणती पोषक तत्वे आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवे. यामध्ये साधारण 393 इतकी कॅलरी असते तर 10.71 ग्रॅम प्रोटीन असते. 10.71 ग्रॅम फॅट यामध्ये असते. त्यामुळे तुमचा वजन वाढण्याचा प्रश्न येत नाही. 71.43 ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट यामध्ये असते. तर 3.6 ग्रॅम इतके फायबर असते. यामुळे तुम्ही जेव्हा मखाना खाता तेव्हा तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. तर यामध्ये काही प्रमाणात साखरही असते. यातून तुमच्या शरीराला कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम ही पोषक तत्वेदेखील मिळतात. म्हणूनच हल्ली मखाणाला जास्त मागणी आली आहे. 

मखाना खाण्याचे फायदे (Makhana Benefits In Marathi)

Makhana Benefits In Marathi

मखाणा अर्थात कमळाच्या बिया. हा अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. अनेक नावाने याची ओळख आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याबद्दल आपण जाणून घेतलं आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

वजन घटविण्यासाठी (Weight Loss)

आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमुळे खूप वेळा जेवणाच्या वेळा जपल्या जात नाहीत. त्याचा परिणाम अर्थातच आपल्या वजनावर होत असतो. पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मखानाचा उपयोग करून घेता येईल. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर सांगण्यात आल्यानुसार कमळाच्या बिया अर्थात मखाणामध्ये एथेनॉलचा असणारा अर्क हा शरीरातील फॅट अर्थात चरबीचे सेल्स नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जिमला जाता अथवा डाएट प्लॅन करता तेव्हा त्यामध्ये मखानाचा समावेश करण्यता येतो. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक लवकर लागत नाही. त्यामुळे वजन कमी करून ते नियंत्रणात राहण्यासाठी मदत मिळते. 

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी (Blood Pressure Maintain)

ब्लडप्रेशर अर्थात रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हाला मखाना खाण्याचे अनेक फायदे मिळतात. नियमित तुम्ही मखाणाचे सेवन केले तर या गंभीर समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. कारण यामध्ये असणारे अल्कलॉईड हायपरटेन्शन अर्थात हाय ब्लड प्रेशरच्या समस्येला नियंत्रित करणारे पोषक तत्व असतात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे.

मधुमेही व्यक्तींनाही उपयोगी (Diabetes Maintain)

मधुमेह हा आजार हल्ली खूपच लोकांमध्ये पाहायला मिळतो. बदलत्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयातही अनेकांना मधुमेहासारख्या आजाराला सामोरं जावं लागत आहे. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही मखानाचा उपयोग करून घेऊ शकता. एका शोधानुसार सांगण्यात आले आहे की, मखानामध्ये आढळणारे रेझिस्टेंट स्टार्च यामध्ये हायपोग्लायसेमिक (रक्तदाब कमी करणारे) हे मधुमेही रूग्णांसाठी अत्यंत उपयोगी ठरते. हा प्रभाव मधुमेहाची समस्या नियंत्रित करण्यासाठी खूपच उपयोगी ठरतो. याशिवाय इन्शुलिन नियंत्रित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

हृदयासाठीही फायदेशीर ठरते (For Heart)

जसं आम्ही तुम्हाला सांगितले की, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसाच मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठीही होतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजारांमुळे हृद्यावर ताण येतो. हे दोन्ही आजार हृदयरोगासाठी जोखीम असणारे ठरतात. त्यामुळे मखाणाचे सेवन हे हृदयासाठीही फायदेशीर ठरते. तर एका शोधानुसार सिद्ध झाले आहे की, कमळाच्या या बिया अर्थात मखाणा कार्डिओवस्कुलर रोगासंबंधी अर्थात हृदयरोगासंबंध काम करते. 

प्रोटीन म्हणून चांगले (Good Protein)

मखानामध्ये प्रोटीनचे प्रमाण असते. 100 ग्रॅम मखाना खाल्ल्यास, साधारण 10.71 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना प्रोटीनची कमतरता असते त्यांनाही मखाना खाण्याचा सल्ला देण्यात येतो. याच्या नियमित उपयोगाने शरीरामध्ये प्रोटीनचे आवश्यक मात्रा मिळते. तसंच तुम्ही नियमित खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीनची कमतरतेच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही. 

गरोदर महिलांसाठी उपयोगी (For Pregnant Women)

गर्भावस्थामध्ये मखानाचे सेवन करणे गरोदर महिलांना फायदेशीर ठरते. गर्भावस्थेमध्ये महिलांना तुम्ही अनेक पक्वानांमध्ये मिक्स करून मखाणा देऊ शकता. एका शोधानुसार, मखाण्याचा उपयोग हा गर्भावस्थेच्या दरम्यान आणि प्रसव नंतर होणाऱ्या कमतरता दूर करण्यसाठी उपयोगी ठऱते. याशिवाय यामधील पोषक तत्व अर्थात लोह, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यामुळे गर्भावस्थेदरम्यान महिलांना आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. 

अनिद्रेच्या समस्येवर उपयोगी (Sleep Problems)

अनिद्रा अर्थात झोप न येण्याच्या समस्येवरही याचा उपयोग होतो. यावरील एका शोधानुसार, अनिद्रेच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही मखाना खाऊ शकता. पण यावर अधिक शोध करणे बाकी आहे. मखाना खाल्ल्याने नक्की झोप कशी येते, यामध्ये कोणते गुणधर्म आढळतात यावर अधिक शोधाची गरज आहे. 

हिरड्यांसाठी करा मखानाचा वापर (For Gums)

एका शोधात सिद्ध झाल्याप्रमाणे मखानामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबियल गुण आढळतात. मखानामध्ये असणारे हे दोन्ही गुण हिरड्यांशी संबंधित सूज आणि बॅक्टेरियल प्रभावाने होणाऱ्या दातांच्या त्रासाला रोखण्यास मदत करतात. त्यामुळे हिरड्यांच्या सुजण्याचा त्रास असल्यास, तुम्ही नियमित मखाणाचे सेवन करावे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. याचा कोणताही शोध लागला नसला तरीही याचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. त्यामुळे तुम्हालाही हिरड्यांसंबंधी त्रास असेल तर तुम्ही मखानाचे सेवन चालू करा. 

किडनीसाठी मखानाचा उपयोग (Kidney)

मखानाच्या उपयोग तुम्ही किडनी निरोगी ठेवण्यासाठीही करू शकता. एनसीबीआयच्या एका शोधानुसार मखाण्याचे सेवन अन्य समस्यांसह जंतावरही उपयोगी ठरतो. तसंच किडनीशी संबंधित समस्यांवरही याचा उपयोग होतो. यातील नक्की कोणत्या गुणधर्माचा प्रभाव पडतो हे सिद्ध झाले नसले तरीही तुम्ही किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या आहारात मखानाचा समावेश नक्कीच करून घेऊ शकता. 

अँटीएजिंग लाभ (Anti Aging Benefits)

आपली त्वचा चांगली राहावी यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. नियमित पार्लरमध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला जर त्वचेसंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही नियमित मखणाचे सेवन करावे. इतकंच नाही तर मखणाचा तुम्ही त्वचेवर उपयोग करून त्वचा अधिक चांगलीही राखू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुण असतात, जे त्वचेवर असणारा एजिंगचा प्रभावा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच सुरकुत्या कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

मखाणाचा उपयोग कसा करावा (Uses Of Makhana In Marathi)

Uses Of Makhana In Marathi

मखाना कसा खावा याबाबत काही जणांना माहीत नसते. म्हणजे मखाण्याचा नक्की कसा उपयोग करून घ्यावा याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

वेळ – मखाना तुम्ही सकाळी अथवा संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता

प्रमाण – साधारण एका वेळेस 20-30 ग्रॅम इतका मखाणा तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि भूक लागलेली असताना ती व्यवस्थित शमते. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. मखाणा खाण्याचे काही नुकसान होते का?

मखाणामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मखाणा तुम्ही प्रमाणापेक्षा अति खाल्ल्यास पोटात गॅस निर्माण होणे आणि पोट दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात याचे सेवन करावे. तसंच काही जणांना याची अलर्जीही असू शकते. त्यामुळे खाण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या अथवा तुम्हाला अलर्जी आलीच तर त्वरित डॉक्टरांकडे जा.

2. मखाणा हा शरीरासाठी कसा असतो?

मखाणा हा उष्ण असतो. त्यामुळे ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांनी मखाणा अगदी प्रमाणात खावा. अति मखाण्याचे सेवन अशा व्यक्तींसाठी चांगले आणि फायदेशीर ठरत नाही.

3. मखाणा उपवासादरम्यान खाता येतो का?

मखाना (मखाणा) अर्थात कमळाच्या बिया. काही ठिकाणी उपवासाचा पदार्थ म्हणूही मखाणा खाल्ला जातो. त्यामुळे तुम्हीदेखील उपवासासाठी याचे सेवन करू शकता.

Read More From Fitness