लाईफस्टाईल

70 मंगळागौर उखाणे, मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे | Mangalagaur Ukhane

Dipali Naphade  |  Jul 20, 2022
mangalagaur-ukhane-in-marathi

श्रावणातील सण हे हिंदू परंपरेनुसार खास असतात. श्रावण महिन्याचे महत्व तर आपल्याकडे खूपच जास्त आहे. या महिन्यातील सर्वात पहिला सण सुरू होतो तो म्हणजे श्रावणी सोमवाराने. तर नववधूंसाठी खास असते ती मंगळागौर. मंगळगौरीची माहिती, पूजा आणि महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. मंगळागौरीला नववधू पूजा तर करते पण त्यानंतर खेळण्यात येणाऱ्या खेळाची खरी मजा असते आणि यावेळी आपापल्या नवऱ्यांची नावं (Mangalagaur Ukhane) उखाण्यात घेण्याची जणू काही स्पर्धाच लागते. आपल्याकडे खास सणांसाठी उखाणे घेण्याची पद्धत असते. नवनधूने नवऱ्यासाठी घ्यायचे उखाणे मजेशीर असतात तर नवरेही वेगळे उखाणे घेतात. असेच मंगळागौरीसाठी खास उखाणे (Mangalagaur Ukhane) आम्ही या लेखातून देत आहोत. मंगळागौर उखाणे (Mangalagauri Ukhane) खास तुमच्यासाठी. 

सोपे मंगळागौर उखाणे | Mangalagaur Ukhane In Marathi 

सोपे मंगळागौर उखाणे –  Mangalagaur Ukhane In Marathi 

महिलांनी उखाणे हे काही नवे नाही. मंगळागौर पूजेसाठी खास महिलांसाठी उखाणे (Mangalagaur Ukhane For Female) आम्ही येथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हीही तुमच्या मंगळागौरीसाठी हे खास मंगळागौर उखाणे (Mangalagaur Ukhane) घ्या आणि करा तुमची मंगळागौर अधिक मजेशीर. 

1. श्रावणात बरसतात सरींवर सरी, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी …रावांची सखी मी बावरी 

2. मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर,….रावांचे नाव घेते, माझे भाग्य थोर 

3. श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…मंगळागौरीच्या दिवशी ….रावांचे नाव घेते आणि फुलवते संसाराचा फुलोरा

4. भर श्रावणात पाऊस आला जोरात…रावांचे नाव घेते मंगळगौरीच्या दिवशी ….च्या घरात 

5. आकाशात कडकडल्या विजा…रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा 

6. मेघमल्हार बहरताच, श्रावणसर कोसळते, …रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते 

7. श्रावणात येते सुंदर श्रावणधारा, ….रावांचे नाव घेते, मंगळागौर पूजा आहे आज घरा

8. सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

9. जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, मंगळागौरीच्या दिवशी आले एवढे महत्त्व ….च्या नावाला

10. अथांग वाहे सागर संथ चालते होडी मंगळागौरी सुखी ठेवो …..रावांची आणि माझी जोडी

11. लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव …च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव, मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव

12. मंगळागौरी तू आशीर्वाद दे येऊ दे भाग्याला भरती….च्या उत्कर्षाची कमान नेहमी राहू दे चढती..!

13. मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते…..रावांच्या नावाने मंगळागौर सजवते

14. निलवर्ण आकाशात चमकतो शशी….रावांचे नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी

15. सासर आहे छान, सासू आहे हौशी…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

गृहप्रवेश उखाणे

नवरीसाठी मंगळागौर उखाणे – Manglagaur Marathi Ukhane For Bride

नवरीसाठी मंगळागौर उखाणे 

मंगळागौर उखाणे (Mangalagauri Ukhane) नव्या नवरीने घ्यायचे अशी पद्धत आहे. मंगळागौरीच्या दिवशी तर या उखाण्यांना खास महत्व प्राप्त होते. वटपौर्णिमेला खास उखाणे नवी नवरी घेते. त्याचप्रमाणे मंगळागौरीचे उखाणेही नवरीसाठी खास आम्ही या लेखातून देत आहोत. 

1. सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे….. रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे

2. हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात …रावांचे नाव घेते मंगळागौरीची पूजा हे आहे कारण!

3. मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाली आहे गोड आठवण…रावांचे नाव घेते सासरच्यांकडून लाभली प्रेमाची गोड साठवण

4. मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी, ….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी 

5. मंगळागौरीच्या दिवशी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, …रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट

6. मंगळागौरी देवी नमन करते तुला,…रावांच्या नावाचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

7. पतिव्रता सीतेची, सावित्रीचा निग्रह, मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेण्यासाठी केला सर्वांनी आग्रह 

8. सीतेची पवित्रता, पार्वतीचा निग्रह, मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेण्यास करू नका आग्रह

9. आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन 

10. यमुनेच्या काठी रमतो राधाकृष्णाचा खेळ…रावांचे नाव घेते आली मंगळागौरीच्या पूजनाची वेळ 

11. मंगळागौरीला पुजल्या आहेत सौळा पत्री…रावांची मी आहे कुशल गृहमंत्री 

12. लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी, …रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी 

13. मंगळागौरीच्या पूजेसाठी दिवे केले गोळा सोळा….रावांचे नाव घेते सखी झाल्या गोळा

14. पानाफुलांनी सजवले मंगळागौरीसाठी मखर…राव करतात नेहमीच माझ्यावर प्रेमाची पाखर

15. सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती…राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी 

नवऱ्या मुलासाठी मंगळागौरीचे उखाणे – Mangalagaur Ukhane For Groom

नवऱ्या मुलासाठी मंगळागौरीचे उखाणे 

नवऱ्या मुलीसह नवरादेखील या मंगळागौरीच्या पूजेसाठी हजर असतो. अशावेळी केवळ नवरीलाच नाही तर अगदी नवऱ्यालाही मंगळागौरीचे उखाणे घेण्याचा आग्रह करण्यात येतो. तुम्हालाही अशावेळी काही सुचत नसेल तर तुम्ही या लेखाचा आधार घेऊन मंगळागौरीचे उखाणे घ्या. 

1. कृष्णाचे नाव सतत माझ्या मुखी, वचन देतो मंगळागौरीच्या दिवशी…ला ठेवने कायम सुखी

2. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, मंगळागौरीच्या दिवशी मान्य करतो….माझी बायको आहे सर्वात देखणी 

3. प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट, मंगळागौरीच्या दिवशी…चं फक्त नाव घेतात माझे ओठ 

4. कृष्णाला बघून राधा हसली, मंगळागौरीच्या दिवशी…पाहून कायमची मनात बसली

5. 2 अधिक 2 होतात चार, मंगळागौरीच्या दिवशी देतो वचन….बरोबर करेन मी सुखाचा संसार

6. सुंदर झाडावर कोकिळा गाते गाणी, मंगळागौरीच्या दिवशी सांगतो तुम्हाला…..हीच माझी साथी 

7. सीतेसाठी रामाने रावणाला मारले, मंगळागौरीच्या दिवशी….चं नाव मी हृदयात कोरले

8. श्री रामासाठी हनुमान धावले….च्या आयुष्यात मंगळागौरीच्या दिवशी टाकतो मंगलमयी पावले

9. मंगळागौरीसाठी केली सगळी तयारी, सोन्याचा मुकुट आणि जरीचा तुरा….आहे माझी खरा हिरा

10. पक्षांचा थवा, दिसतो छान, मंगळागौरीच्या पूजेला आली आहे….ने वाढविली माझी शान 

11. सुंदर दिसते, मंगळागौरीचे मुख…च्या सुखातच माझे खरे सुख 

12. मंगळागौरीचा चेहरा आहे हसरा….च्या समोर सगळेच मला भासतात कचरा

13. मंगळागौरीच्या दिवशी मारतात मैत्रिणी चकरा….चा आहे मी नवरा

14. मंगळागौरीच्या दिवशी लोकांनी आणला प्रेमाचा आहेर, माझ्या प्रेमात….विसरेल तिचं माहेर

15. मंगळागौरीच्या पूजेला पसरला चंदनाचा सुगंध….घेऊन आली माझ्या आयुष्यात खरा आनंद

श्रावण आणि मंगळागौरीचे Best उखाणे – Best Mangalagauri Ukhane In Marathi

श्रावण आणि मंगळागौरीचे Best उखाणे 

श्रावणाचे आणि मंगळागौरीची उत्तम उखाणे आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. श्रावणात साजरी होणारी मंगळागौरीची पूजा ही असते खास. जाणून घ्या मंगळागौर उखाणे (Mangalagaur Ukhane)

1. मंगळागौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी, ….रावांचे नाव घेते श्रावणाच्या दिवशी

2. मंगळागौरीपुढे वाढले प्रसादाचे ताट….रावांचे नाव घेते, श्रावणाचा दिवस आहे खास

3. श्रावणातील मंगळागौरीला दरवळला उदबत्तीचा वास….रावांना भरवते जिलबीचा घास

4. श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली….रावांच्या नावाने मी मंगळागौर पुजली

5. श्रावणाच्या महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट,…रावांचं नाव घ्यायला मी कशाला पाहू वाट

6. श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू, झिम्मा, फुगड्या, कोंबडा, पिंगा….रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा 

7. श्रावणात सुचते मला कविता, ….रावांचे नाव घेते मंगळागौरीला केलेल्या तुमच्या आग्रहाकरिता 

8. श्रावणातील मंगळागौरीला तुमचा सर्वांना मान राखून घेते मी उखाणा….रावांचे नाव घ्यायला करत नाही मी बहाणा

9. श्रावणाची सर येता मन मोहोरते, मंगळागौरीच्या दिवशी…रावांचं नाव घ्यायला मी सजते सवरते 

10. मंगळागौरीच्या भाळी शोभे कुंकवाचा टिळा, …रावांना आवडतो श्रावणातील घननिळा

मंगळागौर पूजा उखाणे – Mangalagaur Pooja Ukhane In Marathi

मंगळागौर पूजा उखाणे 

मंगळागौर पूजा उखाणे (Mangalagauri Ukhane) तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या लेखाचा आधार घेऊ शकता. मंगळागौरीच्या या खास पूजेसाठी खास उखाणे

1. मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा….राव आहे आमचा अगदी साधाभोळा

2. मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने सवाष्णीची भरते ओटी, …रावांच्या आणि माझ्या प्रेमाला कधीही न लागो ओहोटी

3. मंगळागौरीच्या पूजेचा केलाय थाट…रावांसाठी वाढते चांदीचे ताट 

4. मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची…रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची

5. सात हंड्यांवर ठेवली कळशी….रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी 

6. मंगळागौरीच्या पूजेला केली फुलांची आरास…राव लावत आहेत आम्रपर्णांचे तोरण दारास

7. घुमू दे घागर घुमू दे, खेळात जीव रमू दे, मंगळागौरीच्या कृपेने ….रावांना उदंड आयुष्य लाभू दे

8. रेशमी लुगडं आणि कोल्हापुरी साज….रावांचं नाव घेते मंगळागौरीची पूजा आहे आज 

9. मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुढे समईची जोडी…रावांसह कायम राहू दे माझी जोडी

10. मंगळागौरीसमोर ठेवले सातारी कंधी पेढे,….रावांचे नाव घ्यायला कशाला हवेत इतके आढेवेढे

11. दारापुढे काढली ठिपक्यांची रांगोळी…रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी

12. गौरीमध्ये गौर बाई अशी ही मंगळागौर…रावांचे नखरेच आहेत काही अजब आणि और

13. रिमझिम पावसात थुईथुई नाचे मोर…रावांचे नाव घेऊन पुजते मंगळागौर

14. मंगळागौरीची ओटी भरते वाकून…रावांचे नाव घेते पूजेच्या दिवशी सर्वांचा मान राखून 

15. मंगळागौरीच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव, सर्वांच्या आग्रहाखातर घेते ….रावांचे नाव 

मंगळागौरीचे मोठे उखाणे – Mangalagauri Long Ukhane

मंगळागौरीचे मोठे उखाणे 

काही ठिकाणी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी अगदी मोठे उखाणे घेतले जातात. असेच काही मंगळागौरीचे मोठे उखाणे तुमच्यासाठी. तुम्हालाही मोठे उखाणे घ्यायचे असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. 

1. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
परातीत होते सातू सातूचा केला भात
भातावर वरण, वरणावर तुपाची धार
तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा
जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी
बलगडीत पिंजरा, पिंजऱ्यात राहिले राघु,
राघूच्या तोंडी उंबर….. रावांचं नाव ऐकलंत ना, मग मंगळागौरीच्या दिवशी आता काढा रुपये शंभर

2. सासरचा गाव चांगला गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तूप, तुपासारखं रूप
रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं
आणि मंगळागौरीनंतर…. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं

3. माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
मग मला कशाचे उणे
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
मंगळागौरीच्या पूजेला, सारे जण बसा
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते सोन्याचा हार 

निष्कर्ष – मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे (Mangalagaur Ukhane) तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की या लेखाचा आधार घ्या. मंगळागौरी हा सण प्रत्येक नववधूसाठी खास असतो. अशा मंगळागौरीच्या पूजेसाठी तुम्ही आपल्या नवऱ्यासाठी घ्या खास मंगळागौरी उखाणे (Mangalagauri Ukhane). 

Read More From लाईफस्टाईल