Stories

सर्वोत्कृष्ट मराठी रहस्यमय कादंबरी (Marathi Bhay Katha Kadambari)

Trupti Paradkar  |  Oct 14, 2020
Marathi Horror Novels

मराठीमध्ये अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय कादंबऱ्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. खरंतर प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच एकमेकांपासून वेगळी असते. अनेकांना मित्रांसोबत रात्री उशीरा गप्पा मारताना अशा गोष्टी सांगायला आवडतात ज्या काही काळासाठी त्यांचा अंगाचा थरकाप उडवू शकतील. अशा कथा आणि त्यातून निर्माण होणारी भीती ही काल्पनिक आणि तात्पुरती असेल तर त्यात एक मौज नक्कीच असू शकते. कोणाचंही नुकसान न करता केवळ मनोरंजन म्हणून अशा गूढ कथा वाचण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्याआधी ते वाचण्याची तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी मात्र नक्कीच असायला हवी. जर तुम्हाला अशा रोमांचक, थरारक आणि रहस्यमय गोष्टी वाचण्याची आवड असेल तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत सर्वोत्कृष्ट मराठी रहस्य कथा कादंबरी. रोमॅंटिक कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबऱ्या प्रेमींना कदाचित हे आवडत नसावे. कारण मराठी रहस्य कथा कादंबरी तुम्हाला काही काळासाठी एका गूढ विश्वात घेऊन जातील. म्हणूनच या मराठीतील सदासर्वकाळ वाचता येतील अशा मराठी रहस्य कथा कादंबरी तुमच्या वाचनात असायलाच हव्या.

गहिरे पाणी (Gahire Paani)

 

लेखक – रत्नाकर मतकरी

मराठी रहस्यकथा लेखकांमध्ये रत्नाकर मतकरी हे नाव खूप सर्वात वरच्या यादीत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत अनेक गूढ आणि रहस्यमय साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या लेखनामध्ये वाचकांना त्या क्षणात धरून ठेवण्याची विलक्षण ताकद आहे. गहिरे पाणी ही त्यांची मराठी रहस्यमय कांदबरी अशा एका विश्वास घेऊन जाईल जिथे तुम्हाला गुढ आणि भय या दोन्ही भावनांचे समिश्र अनुभवता येईल. या कांदबरीत एकूण सोळा कथा आहेत. ज्या वाचताना या कथा काल्पनिक असूनही तुम्हाला समोर घडत आहेत अशाच वाटतात. तेव्हा वाचा रत्नाकर मतकरी यांच्या लोकप्रिय कांदबरी पैकी ही एक महत्त्वाची Marathi Bhay Katha Kadambari. 

घनगर्द (Ghangard)

 

लेखक – ह्रषीकेश गुप्ते

मराठीमध्ये अनेक लोकप्रिय लेखक आहेत ज्यांनी प्रभावी आणि दर्जेदार साहित्य निर्माण केलेले आहेत. ह्रषीकेश गुप्ते यांच्या कथामध्ये नेहमीच एक अशी कल्पना गुंफलेली असते जी पुस्तक वाचताना तुमच्या मनावर प्रभावी होऊ लागते. घनगर्द मध्ये भय आणि अदभूत असा समिश्र अनुभव तर तुम्हाला मिळतोच. शिवाय ती वाचताना पुढे काय घडणार हे तुम्हाला शेवटपर्यंत समजत नाही. ज्यामुळे घनगर्द Marathi Bhay Katha Kadambari वाचणं हा तुमच्यासाठी एक रोमहर्षक आणि रहस्यमय प्रवास ठरू शकतो. 

वाचा – Best Kadambari In Marathi

ताडोबाचे पडघम (Tadobache Padgham)

लेखक – गिरीश देसाई

ताडोबाचे पडघम आणि इतर भय-गूढ-विज्ञान ही गूढ, विज्ञान आणि भय अशा तीन गोष्टींची अनुभूती देणारी कांदबरी आहे. या कांदबरीच्या सुरवातीच्या सर्व कथा या विज्ञानावर आधारित आहेत. अरण्यातील भ्रंमती, चुकवणाऱ्या वाटा यातून काही पात्रे यात गुंफण्यात आली आहेत. यातील गूढ कथांचे वैशिठ्य म्हणजे यात उगाचच थरार निर्माण केलेला नाही. यातील पात्रांच्या मनात निर्माण होणारी भीती हे पुस्तक वाचताना हळूहळू आपल्याला जाणवू लागते. कथांची नावेदेखील आकर्षक असून त्यात तुम्ही चक्क गुंतून राहता.

चंद्राची सावली (Chandrachi Savli)

लेखक – नारायण धारप

नारायण धारप हे गूढ, रहस्य लेखन प्रकारातील एक लोकप्रिय नाव आहे. पूर्ण चंद्राच्या रात्री,चांदण्यांमध्ये एका गूढ व्यक्तीच्या डोळ्यांमधून या वाचनाला सुरूवात होते. त्याला भेटणारी ती जिच्या डोळ्यांमध्ये बुबुळे नाहीत तर चक्क चंद्रप्रकाश आहे. त्याचं आणि तिचं काय नातं आहे. याचा रात्र आणि चंद्राशी काय संबंध आहे हे कथेतून तुमच्या लक्षात येऊ लागतं. ही कांदबरीत वाचताना हळू हळू तुमच्या मनातील उत्कंठता वाढवत नेण्याचे सामर्थ्य आहे.

शापित खजिना (Shapit Khajina)

लेखक – मानस वाघ

या कांदबरीत एक आनंद नावाचा तरूण उद्योजक व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्याला विराज नावाचा एक माणूस पैशांची मदत करतो आणि पैशांची मदत करताना काही सोप्या अटी घालतो. मात्र व्यवसाय व्यवस्थित सुरू झाल्यावर आनंदला आणखी पैशांची गरज लागते आणि त्याला त्या दागिन्याचा मोह होतो. पुढे त्या दागिन्याचा शोध घेता घेता एका रहस्यमय चक्रात तो गुंतत जातो आणि एक थरार कथा सुरू होते. हा आनंद आणि विराज कोण हे कादंबरी वाचल्यावरच तुम्हाला समजेल. 

अनोळखी दिशा (Anolakhi Disha)

लेखक – नारायण धारप

नारायण धारप यांचे अनोळखी दिशा हे विस्मयकारक आणि भयकथांचा संग्रह आहे. यात त्यांच्या लेखनातील काही निवडक कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. माणसाला एखादे अनपेक्षित अथवा अल्पनिय चित्र दिसले किंवा भास झाला तर त्याला भीती वाटू लागते. माणसाचा हा स्वभावधर्म नैसर्गिक आहे. हाच धागा पकडत नारायण धारप यांनी या कथासंग्रहाची निर्मिती केलेली आहे. अशक्य अथवा फक्त योगायोगामुळे घडलेल्या कथा काल्पनिक असूनही खऱ्या आहेत असं दाखवण्याची कला आणि विलक्षण लेखनशैली असल्यामुळे नारायण धारप यांच्या कथा वाचकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची ही लोकप्रिय आणि दर्जेदार कादंबरी अवश्य वाचा.

कबंध (Kabandh)

लेखक – रत्नाकर मतकरी

ज्यांचा कोणत्याही गूढप्रकारावर विश्वास नाही अशा लोकांनाही हे पुस्तक नक्कीच वाचावेसे वाटेल असे आहे. रत्नाकर मतकरींच्या लिखाणामध्ये गूढ कथा असल्या तरी त्यात व्यक्ती चित्रण, मनाला गुंतवून ठेवणाऱ्या कथांसोबतच एक विलक्षण वातावरण निर्मिती करण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच गूढ कथा वाचकांना आवडतात. विज्ञान दृष्टीने या कथांमध्ये काही तथ्य नसले तरी त्या वास्तववादी आणि कलात्मक असतात.

चेटकीण (Chetkin)

लेखक नारायण धारप

नारायण धारप यांच्या चेटकीणमध्येनगजबजलेल्या वस्तीपासून दूर असलेल्या एक घर आणि त्या घरात माणसे एका अकल्पनिय शक्तीला सामोरी जाताना गायब होत असतात. मात्र यातून काही माणसं सहीसलामत सुटतात आणि ते घर पिशाच्चमुक्त अथवा पवित्र होते. हा प्रवास कसा थरारक आणि रहस्यमय असतो हे समजून घेण्यासाठी तुम्ही चेटकीण कांदबरी नक्कीच वाचायला हवी. 

निजधाम (Nijdham)

लेखक – रत्नाकर मतकरी

बोलावणं, निजधाम आणि जेवणावळ अशी एक अनोखी ही कादंबरी आहे. रत्नाकर मतकरीच्या कथांमध्ये वातावरण, माणसाच्या मनातील गूढता यांचा वेध घेण्याची क्षमता आहे. ज्यामुळे अशाच काही कालच्या, आजच्या आणि उद्याच्या वाचकांसाठी लिहिलेल्या या नव्या स्वरूपातील कथा आहेत. जर तुम्हाला मतकरींच्या रहस्यमय वाचनाची आवड असेल तर हा कथासंग्रह तुमच्या वाचनात असालाच हवा. 

ऐक… टोले पडताहेत ! (Eik Tole Padtahet)

लेखक – रत्नाकर मतकरी 

जग विज्ञानवादी असूनही लोकांना गूढ आणि रहस्यमय कथा वाचायला नक्कीच आवडतात. ऐक…टोले पडतायत! हा मतकरीच्या काही खास कथांचा संग्रह आहे. यात गावातील एका जुन्या जाणत्या आणि श्रीमंत बाईला ऐकू येणारे टोले, जे घड्याळच अस्तित्वात नाही अशा घड्याळाचे टोले, चाळीतल्या एका भाडेकरूबद्दल त्याच चाळीतील संजीवनीला वाटणारे गूढ अशा अनेक कथा गुंफलेल्या आहेत. ज्या वाचताना तुमच्या अंगावर शहारे आणि मनात भीतीची लहर उमटत जाते. 

Read More From Stories