Care

रेडिमेड मेंदीपेक्षा मेंदीची पाने आहेत केसांसाठी फारच फायदेशीर

Leenal Gawade  |  Jan 3, 2021
रेडिमेड मेंदीपेक्षा मेंदीची पाने आहेत केसांसाठी फारच फायदेशीर

केसांचे नैसर्गिक हेअर कंडिशनर आणि हेअर कलर अशी मेंदीची ओळख असते. म्हणूनच केसांच्या आरोग्यासाठी अनेक जण मेंदी लावणे पसंत करतात. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडच्या मेंदी मिळतात जे नैसर्गिक असल्याचा दावा करतात. पण उत्तम रंग येण्यासाठी आणि मेंदीच्या पावडरमध्ये काही अंशी केमिकल्स वापरले जातात. जे काहींना अजिबात चालत नाही. मेंदीचा वापर केल्यामुळे केस कोरडे होणे, केस गळणे अशा अनेक तक्रारी आतापर्यंत अनेकांना जाणवल्या आहेत. त्यामुळे मेंदी वापरायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. मेंदी लावण्याची आवड असेल आणि तिचे खरे फायदे तुम्हाला हवे असतील. तर तुम्ही रेडिमेड मेंदीपेक्षा ताजी मेंदी वापरायला हवीत. ताज्या मेंदीच्या पानांपासून तयार केलेल्या मेंदीचा मास्क हा अधिक फायदेशीर असतो. जाणून घेऊया मेंदीच्या पानांची ही कमाल केसांसाठी कशी फायदेशीर ठरते ते

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

मेंदीच्या पानांचे झाड

Instagram

तुम्ही कधी मेंदीचे झाड पाहिले आहे का? मेंदीचे झाड हे चिकू, सफरचंदासारख्या झाडासारखे मोठे वाढते. त्याला चिंचासारखी बारीक बारीक पाने असतात. मेंदीला म्हणावा तसा रेडिमेड मेंदीसारखा सुगंध नसतो. इतर कोणत्याही पानांप्रमाणे त्याला पानांसारखाच वास येतो. मेंदीमध्ये निलगिरीचे तेल घातल्यानंतरच त्याला असा सुगंध येतो. जो अनेकांना आवडतो.ताजी मेंदी वाटली की, त्याचा रंग जो येतो. तो असतो खरा मेंदीचा रंग.

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

मेंदीच्या ताज्या पानांचे फायदे

Instagram

मेंदीचे झाड तुम्ही आणले असेल आणि त्याची मेंदी बनवून तुम्ही केसांना लावण्याचा विचार करत असाल तर अशा ताज्या मेंदीचे फायदे जाणून घेऊया. 

आता मेंदीचे फायदे  वाचल्यानंतर मेंदीची ताजी पानं वापरण्याचा विचार केला असेल तर तुम्ही मेंदीची पानं कुटून त्यामध्ये निलगिरी, लिंबाचा रस घालून त्याचा वापर थेट केसांसाठी करु शकता. 

केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा

Read More From Care