लग्नाचा सीझन धुमधडाक्यात सुरू झाला आहे. त्यामुळे जिकडे तिकडे सध्या लग्नातील विधी आणि कार्यक्रमांची धमाल दिसत आहे. लग्नाआधी हळद आणि मेंदी हे दोन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आजकाल मेंदीसोबत संगीत कार्यक्रमही दणक्यात केला जातो. मेंदीच्या कार्यक्रमात वधुच्या हात आणि पायावर सुंदर मेंदी काढली जाते. यासाठी घरातील महिला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले जाते. अशा शुभप्रसंगी ऐकण्यासाठी ही काही मेंदीची गाणी. जी गाणी ऐकून वधुच्या हातावरील मेंदीला जास्तच रंगत येईल.
मेहंदीचा रंग चढत नाही? मग ट्राय करा या सोप्या Tricks (How To Make Mehndi Darker)
मेंदी कार्यक्रमासाठी मराठी गाणी
महाराष्ट्रीयन लग्नातही मेंदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो. यासाठीच तुमच्यासोबत शेअर करत आहोत मेंदीवर आधारीत काही मराठी गाणी
मेंदीच्या पानावर …
मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यांत दव अजून सलते गं
झुळझुळतो अंगणांत तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजून तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे गं
गीत कार – सुरेश भट
संगीत कार – पंडित ह्रदयनाथ मंगेशकर
गायिका – लता मंगेशकर
खुलविते मेंदी माझा….
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
गोरागोरापान जसं केवड्याचं रान बाई गं केवड्याचं रान
दोन डोळे नंदादीपस पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान, हो रंग गोरापान
नीलमणी नयनांत, हिरकण्यांचे हो दात
ओठ लाललाल माझे माणकासमान, हो रंग गोरापान
नवी लाज लाजते मी, नवा साज साजते मी
लाडऱ्या मनाला माझ्या करा बंदिवान, हो रंग गोरापान
गीतकार – कवी संजीव
संगीतकार – वसंत कुमार मोहिते
गायिका – आशा भोसले
चित्रपट – भाऊबीज
80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी
फुलले रे क्षण माझे…
फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीच्या, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे
झुळूक वाऱ्याची आली रे लेवून कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशीम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे
प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनाची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे
मेंदीसाठी खास बॉलीवूड गाणी
आजकाल संगीत कार्यक्रम आणि मेंदींचा कार्यक्रम एकत्र आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी ऐका बॉलीवूडची काही खास मेंदी गाणी
मेहंदी की रात आई मेहंदी की रात
नव्वदीच्या काळातील हे गाणं खूप लोकप्रिय आणि उत्साह निर्माण करणारं आहे.
मेहंदी हे रचने वाली
जुबैदा चित्रपटातील हे गाणं नववधूच्या मनात लग्नाआधीची हुरहूर नक्कीच निर्माण करणारं आहे.
हिंदू लग्न विधी समारंभ असतो असा, विवाह विधी घ्या जाणून (Lagna Vidhi Marathi)
मेहंदी लगा के रखना
लोकप्रिय चित्रपट दिलवाले दु्ल्हनिया ले जायगें चित्रपटातील हे रोमॅंटिक गाणं लग्नसोहळ्यात ऐकायलाच हवं.
घरात लग्नकार्य आहे, मग मुंबईतील हे ‘वेडिंग प्लॅनर्स’ तुमच्यासाठी आहेत बेस्ट