आपलं जग

जगण्याला उभारी देतील या मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Kavita In Marathi)

Trupti Paradkar  |  Sep 15, 2021
Motivational Kavita

आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच… पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असा होत नाही.  अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे. कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं. अशावेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची… ज्यातून स्फुर्ती घेत तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. यासाठीच वाचा दिग्गज लेखक, कवी आणि नवोदित कवींच्या या काही मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Poem In Marathi) आणि प्रेरणादायी चारोळ्या (Motivational Charoli In Marathi)

जीवनावरील मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Kavita In Marathi On Life)

Motivational Kavita In Marathi

या प्रेरणादायी कविता वाचून तुमचे मन पुन्हा नव्याने यशासाठी प्रयत्न करण्यास तयार होईल. मनाची समजून काढण्यासाठी, मनाला उभारी देण्यासाठी या मराठी प्रेरणादायी कविता (Marathi Preranadayi Kavita) (Marathi Motivational Kavita) जरूर वाचा.

  1. वाचणं हे पेरणं असतं
    तर लिहिणं म्हणजे उगवणं,
    उगवण्याची चिंता करीत
    बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
    एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य
    लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
    व्यकंटेश कल्याणकर 

2. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो…
आणि रिकामा खिसा जगातील ‘माणसं’ दाखवतो.
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणि 
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
‘विचित्र आहे पण सत्य आहे’
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले तर…!!
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…!!
चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही…
-पु. ल. देशपांडे 

3. अत्यंत महागडी,
न परवडणारी खऱ्या अर्थाने
ज्याची हानी भरून येत नाही
अशी गोष्ट किती उरली आहे
याचा हिशोब नसताना आपण जी 
वारेमाप उधळतो ती म्हणजे
‘आयुष्य’
व. पू. काळे

4. ज्याची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले 
त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रींमत ह्रदय त्यांनी 
रिते करून भरून घ्यावे,
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे.
दत्ता हलसगीकर

5. ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भितींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली 
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
– कुसुमाग्रज

6. मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा,
हातात कसा लागावा
मन थेंबाचे आकाश, लाटांनी सावरलेलं 
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा 
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्त्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
– सुधीर मोघे

7. असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुनी देताना…
संकटासही ठणकावुनी सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
विंदा करंदीकर

8.आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो,
उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. 
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री, तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल
पु. ल. देशपांडे

9. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही, 
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा…
माझ्या दुःखी, व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा…
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही,
माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा…
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही,
माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा…
माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही, 
तरूण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा…
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस करी माझी तक्रार नाही, 
ते ओझं वहाण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा…
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा
तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा…
-रविंद्रनाथ टागोर

10. चार काय करतोस
काहितरी करून दाखव…
वेळ जाईल निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव…
लाखो आले आणि गेले
बोलून उपदेश सगळे
स्वतः काही नाही केले
फक्त उपदेश दिले…
उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ
सत्याची साथ तू देऊन तर बघ
हिंमत आहे तुझ्यात,
आयुष्याचा शिखर चढण्याची
स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ…
हीच वेळ आहे,
योग्य पाऊल पुढे टाकण्याची
काहीतरी करून दाखवण्याची…
घाबरू नकोस, निर्णय घे
यश तुझ्याच हातात आहे….
-हार्दिक शाह

खास वडील चारोळ्या आणि कविता पाठवा (Fathers Day Poem In Marathi)

वॉट्सअपसाठी मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Poem In Marathi For Whatsapp)

Motivational Poem In Marathi

आजकाल सोशल  मीडिया आणि व्हॉटसअपवर प्रेरणादायी विचार, सुविचार, कोट्स, कविता मित्रपरिवार आणि प्रियजनांना पाठवण्याचा ट्रेंड आहे. अशाच तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी पाठवा ही मराठी प्रेरणादायी कविता (Inspirational Kavita In Marathi)

1.चालणारे दोन पाय किती विसंगत
एक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहीत असतं
क्षणात सारं बदलणार असतं
याचच नाव जीवन असतं
याचच नाव जीवन असतं…

2.संधी मिळेल तुलाही
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस,
प्रेम तुझ्यावर करणारे 
कितीतरी लोक आहेत,
तुझ्यासाठी जोडणारे
खूप सारे हात आहेत,
असे अशा आपल्यांसाठी
तू ही थोडं हसून बघ,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस…

3. काळ हा कोणाचाच नसतो
का रे तू  समजक नाहीस,
आज तू हरला म्हणून
असं नाही की तू उद्या जिंकणार नाहीस,
काळ तर कोणाच्याच हातात नाही
तो नेहमी बदल असतो,
कधी आपल्याला परकं करतो
तर कधी परक्यांना आपलं करतो,
बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो
तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरूवात करतो,
कोमेजेलेलं फुल पाहून झाड कधीच निराश होत नाही
कारण त्याला माहीत असतं उद्याचा बहर अजून येणार आहे…
तू ही कर असं काही, की लोक घेतील तुझं नाव अभिमानाने… घे आकाशात उंच भरारी नको करू पर्वा हरण्याची…

4. जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ
जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ,
चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस
प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ,
अपयश आलं तर ते निरखून बघ
यश आलं तर ते थोडं वाटून बघ,
डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ,
स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ,
जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे थोडं तोलून मापून बघ,
जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडवून बघ

5. लढता लढता हरलो जरी, 
हरल्याची मला खंत नाही…
लढा माझा माझ्यासाठी
लढाईला माझ्या अंत नाही…
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन

6.चांगल्या लोकांची परमेश्वर
खूप परिक्षा घेतो 
पण साथ कधीच सोडत नाही
वाईट लोकांना परमेश्वर 
खूप काही देतो
पण साथ कधीच देत नाही

7. कासवाच्या गतीने करा होईना
रोज थोडी थोडी प्रगती करा
खूप ससे येतील वाटेत आडवे
बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा
जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजत बसू नका
कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले 
तर पुसायला किती जण येतात ते मोजा

8.समुद्राने झऱ्याला 
हिणवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार
तुला समुद्र नाही का व्हायचे ?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले, 
मोठे होऊन खारे होण्यापेक्षा
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो

9.पाकळ्यांचे गळणे म्हणजे फुलांचे संपणे असते
संपतानाही सुंगध देणं यातंच त्यांचे आयुष्य असते
असं आयुष्य जगता येणे म्हणजे
खरंच आयुष्याचे सोने असते
पण या ज्यांना याचा अर्थ समजतो त्यांचे जीवनच खऱ्या अर्थाने सोन्याहून पिवळे असते

10. देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात….

Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता

हृदयस्पर्शी प्रेरणादायी कविता (Heart Touching Inspirational Poem In Marathi)

Motivational Poem In Marathi

मनातील विचारांचा शरीर आणि जीवनावर परिणाम होत असतो. यासाठीच मनात सतत चांगले आणि उत्साही विचार यायला हवेत. जर तुमचा एखादाा मित्र उदास असेल तर या ह्रदयस्पर्शी प्रेरणादायी कवितांनी (Inspirational Marathi Kavita) त्याच्या मनावर घाला हळुवार फुंकर 

  1. पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी
    जखमी पंखातील रक्ताने 
    हिरव्या भूमीवर 
    लाल नागमोड उमटवीत
    उडतो आहे आपल्या घरट्याकडे
    कदाचित आपल्या मृत्यूकडेही
    पण त्याच्याकडे करूणेने 
    पाहणारे सारे आकाशाली
    हिरावून घेऊ शकत नाही
    रक्ताने माखलेला 
    त्याचा आनंद… अभिमान
    पिंजरा तोडल्याचा
    कुसुमाग्रज

2. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे , पिल्लु तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे , पिल्लु तयांत एक
पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
एके दिनी पंरतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक 
ग. दि. माडगुळकर

3. प्रेम हरवले म्हणून
आयुष्य संपवायचे नसते
त्याला शोधत पुन्हा नवीन
वाटेवर चालायचे असते
मग तुझी वाट पाहत
कोणी न कोणी नक्कीच थांबून असेल
तिच्या नजरेला नजर भिडताच
प्रेम मात्र मनात बसेल
मग तिने दिलेलं फुल
तू पुस्तकात ठेवशील
त्याच्या पाकळ्या पाकळ्या तू 
स्वतःपेक्षा जास्त जपशील
हरला म्हणून हात पाय गाळू नकोस
जिद्द ठेव मनात असा तू खचू नकोस
नाही प्रेमाला वेळ, काळ आणि भाषा
नेहमी पुढे चाल ठेवून मनात हिच एक आशा

4. रस्त्यात काटे दिसले म्हणून
मागे कधी फिरू नका
जीवनात संकट आले म्हणून
हळवे कधी होऊ नका
ध्येय आपले यशो शिखराचे
मनात जिद्द ठेवूया
रंगत संगत मनी होऊन
यशाची पायरी पकडूया
घाबरायचं नाही कोणी कोणाला
जीवन सुंदर आपण बनवायचं 
जरी कोणी आला आडवा
तर तेथेच त्याला गार करायचं
इच्छा आपली असावी स्वच्छ
नाही तिला लागणार डाग
अशी आशा मनी धरून
यशाची धरावी सरळ वाट…

5.केले कुणास्तव ते किती
हे कधी मोजू नये
होणार तयारी विस्मृती
त्याला तयारी पाहिजे
आज येथे नाचती 
घेतील ते पायातळी
त्याला तयारी पाहिजे
सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही,
त्याला तयारी पाहिजे
पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही असो
आता टळेना पोहणे
त्याला तयारी पाहिजे
विंदा करंदीकर

6. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून जावे
गुंतलेले प्राण ह्या रानांत माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूत घ्यावे!

7.मौनाने होतं एवढं रामायण
हे माहीत असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते, 
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक
भलत्याच दिशेला…
शब्द म्हणजे अंध कौरव, 
ओठात एक, पोटात भलतंच.
मौनाचे रामायण सहन करता येतं सीता होऊन,
पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा…
– पद्मा गोळे

8.शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द भलतेच बोलून गेले असते,
शब्दांना माघारी बोलावले म्हणून बरे झाले 
नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते
शब्द तरूण बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही
अस्मितेच्या खाली पोट असते हे त्यांना माहीत नसते
दत्ता हलसगीकर

9.पडला पडला म्हणताना कळपात हसू झाले, 
हरला हरला म्हणताना कळपात सोहळे झाले,
हरण्याचा सोहळा माझा किती वेळ सुरू होता?
अनेक सोहळे झाले अनेक कावळे झाले
कुठेच आता कळपाचा आवाज का येईना?
अरेरे! माझे आता हरणे कमी झाले.
माझे आता हरणे कमी झाले.
– स्वप्नील कराळे

10. कमी तापवलं तर 
नासण्याची भीती
जास्त तापवलं तर 
आलेल्या दाट सायीमुळे
गुदमर होतो आयुष्याचा
विस्तवावर ठेवलं तर 
राखेशिवाय काय सापडेल?
या नैराश्याच्या गोंधळात
म्हणूनच सांगतो मित्रांनो,
आयुष्य जगण्यातच खरी मजा आहे…

Mother’s Day…आईसाठी करा खास आईच्या कविता (Poem On Mother In Marathi)

छोट्या प्रेरणादायी मराठी कविता (Small Marathi Motivational Kavita)

Marathi Motivational Poem

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी तुम्हाला या छोट्या प्रेरणादायी कविता (Marathi Preranadayi Kavita) नक्कीच उपयोगी पडतील. 

  1. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
    सगळेच अश्रू दाखवायचे नसतात,
    सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात,
    स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून…
    स्वप्न पाहायचीच सोडून द्यायची नसतात,
    तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायची असतात.

2. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, 
जे वाट पाहतात…
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे प्रयत्न करतात…
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात…
आयुष्य अवघड आहे पण, अशक्य नक्कीच नाही !

3. अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिने
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामध्ये जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला 
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा
तिची उलीशीच चोच 
तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दोन बोट
बहिणाबाई चौधरी

4. ढवळून सारी स्वप्ने माझी, 
कुठे शोधली खोल तळाशी,
दुष्काळाच्या गर्तेमध्ये
राहून गेले एक तळाशी,
गढूळलेल्या उण्यापुऱ्या त्या,
रोगटलेल्या पाण्यावरती
राहून गेलेल  एक कसे ते
चिकटून होते शेवाळ्याशी,
होती सोबत चुकचुकणाऱ्या 
रातकिड्यांच्या आवाजाची
पिऊन गेले रात काजळी
डगमगले ना परी मुळाशी
 कसली त्याची जिद्द म्हणावी
जगण्याची की गुदमरण्याची
सोयरीक ही जुळवत होते
गरगरणाऱ्या पाचोळ्याशी
इथेच आहे बहर फुलांचा
दिसेल तासा माथ्यावरती
भरेल तेव्हा कळशी माझी
हितगुज चाले आभाळाशी

5. पैज लावायची असेल तर….
ती फक्त स्वतःसोबतच लावा
कारण, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल 
आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल

6.कविता चुकली तर… कागद फाडता येतो पण
जर प्रेम करण्यात चूक झाली तर, ‘आयुष्याच्या पत्रावळ्या होतात’ 

7.लाथ मारूनी आव्हानांना 
गंध यशाचा धुंद करावा
मिठीत घ्यावी आपुली स्वप्ने
आयुष्याचा उत्सव व्हावा
तोच श्वास अन तीच हवा
पळ पळ भासो नित्य नवा
सजीव होण्या जिवंतपणा
आयुष्याचा उत्सव व्हावा
नको निराशा नकोत मोह
स्वतः स्वतःचा सोडू डोह
जगणे आपुले सार्थ कराया
आयुष्याचा उत्सव व्हावा
कष्ट करा, घाम गाळा
नष्ट होतील सारे ताण
उंच होईल तुमची मान
आयुष्याचा उत्सव छान
होईल जेव्हा आपुला अंत 
नयन मिटूया तेव्हा शांत
पाहून आपला आयुष्य उत्सव
मरणाचाही होईल महोत्सव

8.झेप घ्यायची असेल तर
आपल्या परिघाच्या बाहेर घ्या
म्हणजे तुम्ही खाली पडणार नाहीत
कारण अवकाशात मुक्तपणे
विहारल करण्याकरता
आधी पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या
परिघाबाहेर जावे लागते
–  आनंदयात्री

9.जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही!
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही!
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही
उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
संदीप खरे 

10.मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हाथ भरून घ्यायचं नुसतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं…

जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार (Nature Quotes In Marathi)

प्रेरणादायी चारोळ्या मराठी (Motivational Charoli In Marathi)

Motivational Poem In Marathi

मराठीतील या प्रेरणादायी चारोळ्या (Motivational Charoli In Marathi) वाचूनही तुमचे मन नक्कीच प्रफुल्लित होईल. उदास आणि निराश मनात चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी अशा चारोळ्या तुमच्या संग्रही असायला हव्या.

  1. मनातील स्वप्ने 
    खूप मोठी असावी, 
    ती पूर्ण न करण्यासाठी 
    कारणे मात्र कोणतीच नसावी

2. जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात 
रिस्क घेत नाही
तोपर्यंत तुम्ही परफेक्ट 
होऊ शकत नाही

3. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट
वस्तुंवर प्रकाश टाकतो,
परंतू स्वतः मात्र या सर्वांपासून अलिप्त राहतो,
अशा सूर्याप्रमाणे आपण आपलं चारित्र्य जपलं पाहिजे

4. एक वाक्य जीवनात 
नेहमी लक्षात ठेवा
एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा 
वेग कमी करून चालत राहा.

5. आपल्याला अपयश मिळाल्यावर 
कुणाला काहिही वाटू दे
स्वतःला मजबूत करून
स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे

6.ज्या पानावरील बातमी वाचून
मोठी माणसं चिंता करतात
लहान मुलं त्याचंच विमान 
बनवून आकाशात उडवतात.

7. आयुष्य फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहेत हेच आपल्याला ठाऊक नाही,
पुढची परिक्षा कोणती याची कल्पना नाही,
कोणालाच इथे कॉपीदेखील करता येत नाही.
कारण,इथे प्रत्याकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.

8.हातोडयाचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण…
त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं.

9. आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा
परिस्थितीला फोडून भव्य दिव्य यश मिळवा !

10. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही
ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच
तसंच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही,
शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा
तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल

वाचा – Success Quotes In Marathi

बेस्ट स्फूर्तीदायक कविता मराठी (Best Inspirational Kavita In Marathi)

Marathi Motivational Kavita

काही विचारच खूप स्फूर्तीदायक असतात. असे विचार वाचल्यावर मनात आपोआप चांगले सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण होते. यासाठी वाचा स्फुर्तीदायक विचार देणाऱ्या या काही कविता आणि चारोळी (Motivational Charoli In Marathi)

  1. जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला काय वाटतं ते लिहा,
    कारण उद्या तुमचं हे वाटणं जगाची आवड बनू शकतं.

2. अंधाऱ्या रात्रीवर मात करीत
सकाळी आकाशातील सूर्याकडे पाहिलं की, 
आपल्याला प्रसन्न वाटतं…
कधीतरी त्या सूर्याला तुमच्याकडे पाहून प्रसन्न वाटण्याची संधी द्या

3. आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा
स्वप्नांमधील चिंगारी जर विझली
तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या 
केली आहे असं तुम्हाला वाटेल

4. हे ईश्वरा, 
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, 
सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
सदगुरू श्री वामनराव पै

5. गरूडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्याचती संगत सोडावी लागेल

6.बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य
आणि…
स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवतात ते असामान्य

7.कधी कुणाच्या भावनांसोबत खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल

8.आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
की, तुम्हाला जणू जिंकण्याची सवयच आहे
आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

9. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा…
मासे किड्यांना खात असतात.
तलावातलं पाणी संपून तो कोरडा होतो तेव्हा…
किडे माश्यांना खात असतात
संधी सर्वांना मिळते,
फक्त त्यासाठी आपली वेळ यावी लागते.

10. लक्षात ठेवा, नेहमी चांगल्याच लोकांच्या संपर्कात राहा
कारण,
सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो. 

You Might Like These:

Katu Satya Vachan Msg In Marathi (कटू सत्य वचन मेसेज)

Life Struggle Quotes In Marathi | संघर्ष सुविचार मराठीतून

Swami Vivekananda Quotes Marathi On Love

Confidence Quotes In Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी

Read More From आपलं जग