मनोरंजन

मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘वेलकम होम’

Trupti Paradkar  |  May 2, 2019
मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला  ‘वेलकम होम’

मराठी चित्रपटसृष्टीत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या लेखक दिग्दर्शकद्वयीने आपल्या हटके स्थान निर्माण केलं आहे. या दोघांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट नेहमीच आशयसंपन्न असतात. आतापर्यंत अनेक विचारप्रवर्तक विषय त्यांनी आपल्या चित्रपटांतून मांडले आहेत. आता आणखी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण  विषय घेऊन ते एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘वेलकम होम’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका असणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं. वेलकम होम हा चित्रपट घर या संकल्पनेवर आधारित असणार आहे.लग्नानंतर स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं? असा प्रश्न या चित्रपटातून उपस्थित केला जाणार आहे. वेलकम होममध्ये महिलाप्रधान विषय आणि मृणाल कुलकर्णीचा अभिनय असा अप्रतिम मिलाप असणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमधून या चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता निर्माण होत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच हटके विषय आणि अफलातून दिग्दर्शन यामुळे वेलकम होम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.

‘वेलकम होम’ 14 जूनला होणार प्रदर्शित

वेलकम होम चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत हे कलाकार असणार आहेत. चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचं  दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे. वेलकम होम 14 जूनला प्रदर्शित होणार आहे.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचं अफलातून दिग्दर्शन

सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांची अनोखी दिग्दर्शन शैली यामुळे त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होतं. आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिका, शॉट फिल्म्स, चित्रपट एकत्र दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या  अनेक मालिका, शॉर्टफिल्स आणि चित्रपटांना अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या दोघी, वास्तुपुरूष, अस्तू, देवराई, बाई, पाणी , कासव या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे सहाजिकच वेलकम होम बद्दल प्रेश्रकांच्या आशा आता नक्कीच वाढल्या आहेत. 

अधिक वाचा

फराह खान वाट पाहतेय शाहरूखच्या होकाराची

विराटने अनुष्काचा बर्थडे केला रोमँटिक,पाहा त्यांचा व्हिडिओ

दिग्पाल लांजेकरचा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन