विराटने अनुष्काचा बर्थडे केला रोमँटिक,पाहा त्यांचा व्हिडिओ

विराटने अनुष्काचा बर्थडे केला रोमँटिक,पाहा त्यांचा व्हिडिओ

विराट- अनुष्का  म्हणजेच सगळ्यांचेच लाडके ‘विरुष्का’ ..त्यांचे प्रत्येक फोटोज व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना आवडत असतात.  नुकताच अनुष्काचा बर्थडे झाला. तिचा हा क्षण विराटने खूप खास आणि रोमँटिक केला आहे. हे कोणी सांगितलेले नाही विराटने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे त्यांचा हा खास क्षण समोर आला आहे.


विराट- अनुष्का या ठिकाणी साजरा करणार लग्नाचा वाढदिवस


काय आहे व्हिडिओ?


कोणत्याही जोडीदाराला आपल्या पार्टनरचा वेळ हवा असतो. त्याच्यासोबत आपला वेळ घालवायचा असतो. त्याच्यासोबत खूप गप्पा मारायच्या असतात. आता सेलिब्रिटी कपल असले म्हणून काय झाले? दोघांच्या बिझी लाईफमधून विराट अनुष्काला नेहमीच वेळ देत असतो. आणि अनुष्कादेखील त्याला नेहमीच वेळ दिसताना दिसते. आता या व्हिडिओमध्ये ही दोघं मस्त एका नदी किनारी बसली आहेत. संध्याकाळची वेळ आहे. विरुष्का एकमेकांसोबत छान गप्पा मारत तो क्षण एन्जॉय करत आहे. स्वत:  विराट कोहलीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्ट खाली त्याने कोणतीही कॅप्शन लिहिली नसली तरी देखील हे खास प्लॅनिंग त्याचे अनुष्काच्या वाढदिवसासाठी असावे, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

♥️ Credit - @suppeerrgram


A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on
लाडक्या #hubby सोबत केला वाढदिवस


महत्वाची गोष्ट अशी की,  हा व्हिडिओ अनुष्काच्या वाढदिवसाच्या असण्याची शक्यता आहे. कारण 1 मे रोजी अनुष्काचा बर्थडे असतो. इतरवेळी स्टार्स त्यांच्या वाढदिवसाची पार्टी देत असतील. पण अनुष्काने विराटसोबत बर्थडे साजरा करण्याचा निर्णय घेत त्यांनी एकत्र वेळ घालवला आहे, असेच या  पोस्टमधून तरी सध्या कळत आहे. पण हे क्षण खास आहेत. इतके मात्र नक्की


विराट- अनुष्काच्या घरी येणार नवा पाहुणा


विरुष्का नेहमीच घालवतात एकत्र वेळ


virushka 1


विराट आणि अनुष्का वेळ मिळेल तेव्हा बाहेर जाताना दिसतात.या दोघांनाही फिरण्याची आवड असून  लग्नानंतर त्यांनी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिलेली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक बोटींगचा व्हिडिओदेखील वायरल झाला होता. त्यांच्या वायरल व्हिडिओ आणि फोटोसंदर्भात ते कधीच काही बोलत नाहीत. पण त्यांच्या फॅन्सना मात्र त्यांची अपटु डेट माहिती मिळते. अनेकदा विराट आणि अनुष्काचं त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात किंवा मग पापाराझींकडून ही माहिती फॅन्सपर्यंत पोहोचते. 


प्रियांकाच्या भावाचं लग्न या कारणामुळे गेले लांबणीवर


डिसेंबरमध्ये लग्नाला पूर्ण होतील 2 वर्षे


विराट- अनुष्काच्या लग्नाबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. शेवटपर्यंत तारीख कळत नव्हती. अखेर इटलीमध्ये 11 डिसेंबर 2017 साली त्यांनी लग्न केले. ही दोघं विवाहबंधनात अडकणार याची माहिती अनेकांना होती. पण ते कधी लग्न करणार हे माहीत नव्हते. अखेर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ आला आणि अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर बी टाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली.


आता विराटने अनुष्काचा वाढदिवस इतका साधा पण हटके साजरा केल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, आपलाही वाढदिवस असात साजरा व्हायला हवा. नाही का?


(फोटो सौजन्य- Instagram)