DIY सौंदर्य

लग्नाच्या आधी हवी असेल तजेलदार त्वचा तर मुलतानी मातीमध्ये करा ‘हे’ मिक्स

Dipali Naphade  |  Aug 9, 2021
multani mitti benefits for skin

चमकदार आणि तरूण त्वचा प्रत्येकालाच हवी असेत. अशी त्वचा मिळविण्यासाठी अनेक जण पार्लरच्या पायऱ्याही झिजवतात. पण तरीही चेहऱ्यावर मुरूमं येणे, काळे डाग दिसणे अशा समस्यांना समोर जावे लागते. पण तुम्ही नेहमी चेहऱ्यासाठी उत्तम पर्याय ऐकला असेल तो म्हणजे मुलतानी माती. तुम्हाला नेहमी चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही मुलतानी मातीचे काही फेसपॅक घरीच तयार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकता. मुलतानी माती कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे याचा वापर करताना जास्त विचार करण्याची गरज भासत नाही. तुम्हाला त्यामध्ये काहीही मिक्स न करतादेखील चेहऱ्याला लावता येते आणि याचाही उत्तम परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. 

असा बनवा मुलतानी मातीचा फेसपॅक

Multani Mitti – Shutterstock

मुलतानी मातीचा अप्रतिम फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागत नाही. तुम्ही मुलतानी मातीमध्ये संत्र्यांच्या सालाची पावडर मिक्स करा. त्यामध्ये गुलाबपाणी मिक्स करा आणि हा लेप तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा सोपा लेप नक्कीच तुमचा चेहरा दिवसभर तेजलदार दिसण्यासाठी मदत करतो. तुम्ही या फेसपॅकचा वापर केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही इतर पार्लरमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासत नाही. संत्र्यांची पावडर घरात तयार करणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही बाजारातून आरामात ही पावडर खरेदी करून आणू शकता. मात्र याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करून पाहा. 

अधिक वाचा – वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक (Multani Mitti Face Packs)

आठवड्यातून वापरा इतके वेळा 

अधिक वाचा – तेलकट त्वचेसाठी उन्हाळ्यात वापरा हा उत्तम घरगुती फेसपॅक

लग्नाच्या आधी मिळतो अप्रतिम तजेलदारपणा 

Freepik

लग्नात नवरीने सुंदर दिसणं आणि चेहरा ताजातवाना दिसणं यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येतं. त्यासाठी हल्ली अनेक डाएट आणि पार्लरच्या अपॉईंटमेंटही घेतल्या जातात. पण मुलतानी मातीचा फेसपॅक हा नवरीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्वचेवर तजेलदारपणा आणि चमक आणण्याासाठी तुम्ही नवरीसाठी याचा वापर करून घेऊ शकता. लग्नाच्या आधी किमान तीन महिने तुम्ही या फेसपॅकचा वापर करायला सुरूवात करा. मिनरल्स आणि विटामिन सी गुणांनी युक्त असणारे हे फेसपॅक त्वचा अत्यंत निरोगी आणि चांगली बनविण्यास मदत करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लग्नाच्या दिवशी करण्यात आलेला मेकअपही अत्यंत उठावदार दिसून येतो. तसंच यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नसल्यामुळे आणि मुलतानी माती ही नैसर्गिक असल्यामुळे चेहऱ्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही योग्यरित्या याचा वापर करून घेऊ शकता. 

अधिक वाचा – त्वचेचा हा प्रकार असणाऱ्यांनी टाळा हे नैसर्गिक घटक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य