Love

#Mystory: मैत्री आणि प्रेम यापैकी एकाची निवड करायला त्याने मला भाग पाडलं

Leenal Gawade  |  Oct 19, 2019
#Mystory: मैत्री आणि प्रेम यापैकी एकाची निवड करायला त्याने मला भाग पाडलं

आयुष्यात अनेकदा अनपेक्षित निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयानंतर आयुष्य सुरळीत चालेल अशी शाश्वती नसते. पण त्यावेळी ते घेणं भाग असतं. असचं काहीसं घडलं मीराच्या बाबतीत. ‘प्रेम’ आणि ‘मैत्री’ यापैकी एकाची निवड करताना तिला काय करावं कळत नव्हत.आयुष्यात प्रेमाची गरज होती आणि मैत्रीची साथ हवी होती. पण यामधील सुवर्णमध्य तिला साधता आला नाही. त्यामुळेच तिला अगदीच टोकाचा निर्णय घ्यावा लागला. पण… जाणून घेऊया मीराची ही कहाणी. कारण हल्लीच्या काळात या गोष्टी अगदी साहजिक घडू लागल्या आहेत.

तुमचा रोमान्स अधिक सेक्सी करण्यासाठी तुम्हीही पाठवा Naughty Sexts

shutterstock

मीरा आणि श्रीकांत यांचे नाते अगदी छान सुरु होते. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलायचे नाही. म्हणूनच या दोघांना सगळ्यांनी ‘एक दुजे के लिए’ जोडी असे नावच देऊन टाकले होते. मीराचा प्रत्येक दिवस श्रीकांतने सुरु व्हायचा आणि श्रीकांतनेच संपायचा. तिला श्रीकांत शिवाय  कोणतेही सुख आयुष्यात नको होते. तिचे आयुष्य श्रीकांत येण्याचे पूर्ण झाले होते. दिसायला देखणा, स्वभावाने सुस्पष्ट, थोडासा रागीट पण त्याहून अधिक प्रेमळ..असा त्याचा स्वभाव मीरालाच कळला होता. त्याला समजावून घेण्याचे कमालीचे कसब फक्त मीरामध्ये होते आणि म्हणूनच त्यांना एकमेकांपासून दूर करणे फारच कठीण होते. जसं जसे दिवस जात होते. तस तशी त्यांची एकमेकांशी असलेली ओळख वाढत होती.

श्रीकांतच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या मीराला त्याच्याशिवाय विश्व नव्हते.त्याच्याशिवाय तिला कुठेही जायला कंटाळा असायचा. अगदी मोजक्याच मित्रांसोबत तिची ओळख होती. त्यांच्यासोबत फिरायला जाणे, हॉटेलात जाणे, वाढदिवस साजरे करणे, एकमेंकानी फ्रेंडशिप स्टेटस ठेवणं हे अधूनमधून अगदी चालायचचं. श्रीकांतलाही कसलाच संशय किंवा त्रास नसल्याने तो मीराला काही बाबतीत कधीच हटकायचा नाही. उलट तो तिला कायमच या साठी पाठिंबा द्यायचा. पण परिस्थिती नेहमीच सारखी राहात नाही. श्रीकांतचे वागणे हळूहळू बदलत होते. त्याला मीरावर कधीच संशय नव्हता. पण मीराच्या मित्रांबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे त्याच्या मनात सतत विचि विचार येऊ लागले होते. तो आता कधीही मीरा त्यांना बाहेर भेटायला जाणार हे कळल्टयावर तिला  ‘जाणं गरजेचं आहे का?’ असा प्रश्न करु लागला होता. आधी ही बाब मीराच्या लक्षात आली नाही. पण हे नेहमीच होऊ लागलं होतं. तिच्या निवडक मित्रांसोबत जाऊ नये म्हणून तो तिला अडवू लागला होता.

आधी मीरालाही त्याची काळजी या सगळ्यापासून आपल्याला लांब ठेवते आहे असे वाटत होते. पण ज्या श्रीकांतला मी डिसीजन मेकर असल्याचा अभिमान होता. तोच श्रीकांत आता स्वत:चे निर्णय तिच्यावर थोपवू पाहत होता. तिच्या आयुष्यातील सगळ्या निर्णयांचा जणू त्याने ठेकाच घेतला होता. कामानिमित्त बाहेर गेलेल्या श्रीकांतने अचानक एके दिवशी कहरच केला. मीराला तिच्या मित्रांशी बोलायचे होते. थोडा वेळ घालवायचा होता. पण त्याने तिला पेचात पाडले. ‘तुला माझे प्रेम महत्वाचे आहे की, तुझी मैत्री?’ असे श्रीकांतने मीराला थेट विचारुन टाकले.

Mystory: त्यानंतर मला पुन्हा कधीही प्रेम झालं नाही

shutterstock

अचानक विचारलेल्या या प्रश्नाने मीरा भांबावून गेली. कारण श्रीकांत तिच्याशी असा कधीच वागला नव्हता. त्याला श्रीकांतचे हे वागणे त्रास देत होते. नेहमी समजूतदारपणे वागणारा श्रीकांत आज इतक्या मोठ्या निर्णयावर कसा येऊन पोहोचला हे तिलाही कळत नव्हते. पण त्याला सोडून तिचे आयुष्य काहीच नव्हते. तिला तिचे नाते टिकवून ठेवायचे होते. त्यामुळे नात्यात येणारा तणाव तिला दूर करायचा होता. मीराने खचून न जाता आणि केवळ भांडण हा पर्याय समोर न ठेवता श्रीकांतला समजवण्याचे ठरवले. प्रेम आणि मैत्री या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून त्याचा एकमेकांशी काहीच संबंध असू शकत नाही. हेच तिला श्रीकांतला समजून सांगायचे होते. पण काही गोष्टी संबंध ताणलेले असताना सांगायच्या नसतात हे मीरा योग्य पद्धतीने जाणून होती.

तिने श्रीकांतचा राग निवळण्यासाठी थोडा वेळ दिला श्रीकांत समजून घेईल हे तिला माहीत होते. त्याच्या राग निवळण्याच्या काळात तो तिला या निर्णय घेण्यावरुन बरेच टोमणे देत होता. पण तिने वाईट न वाटून घेता त्यावर मार्ग काढायचे मनाशी ठरवले होते. एक दिवस संधी सांधून आणि तिने त्याच्याशी बोलण्याचे ठरवले. तो त्यावेळीही तिच्याशी वाद घालत होता. त्याला या गोष्टीचा राग होता की, या दोघांमध्ये तिला मला निवडण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे.त्याचे सगळे ऐकून झाल्यानंतर तिने त्याला एक मिठी मारली. आयुष्यात त्याचे काय स्थान आहे ते समजावून सांगितले.मैत्री आणि प्रेम यांची तुलना कधीच होऊ शकत नाही हे पटवून दिले. त्यानंतर तो शांत झाला. इतक्या दिवसाचा त्याचा राग मीरामुळे निवळला होता.

आता तुम्हाला वाटेल की, यात काय विशेष पण.. नात्यात तेव्हाच अडचणी येतात. ज्यावेळी एक कोणीतरी समजूतदारपणा न घेता भांडत राहतो. जेव्हा एक व्यक्ती चिडलेली असते. त्यावेळी दुसऱ्याने शांत राहायचे असते. तसे झाले तरच तुमचे नाते टिकून राहते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Love