मनोरंजन

‘नच बलिये’मधून पहिल्यांदाच एलिमिनेशनशिवाय एक जोडी होणार बाहेर, निर्मात्यांचा निर्णय

Dipali Naphade  |  Jul 24, 2019
‘नच बलिये’मधून पहिल्यांदाच एलिमिनेशनशिवाय एक जोडी होणार बाहेर, निर्मात्यांचा निर्णय

‘नच बलिये 9’ सीझन पहिल्या दिवसापासून गाजत आहे. यावेळची या डान्स रियालिटी शो ची वेगळी कॉन्सेप्ट आहे. त्याशिवाय सलमान खान या शो चं प्रॉडक्शन करत असल्यामुळे या शो बद्दल बरीच चर्चा आहे. आपल्या एक्स बरोबर डान्स अशी कॉन्सेप्ट याआधी आली नव्हती. त्यामुळे आता या जोड्यांची केमिस्ट्री कशी असणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पण शो सुरुही झाला नाही आणि आधीच एक जोडी या शो मधून बाहेर काढण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे ही जोडी एलिमिनेशन होऊन बाहेर पडणार नाहीये तर निर्मात्यांनी या जोडीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंहला दाखवला बाहेरचा रस्ता?

टीव्हीवरील ‘नच बलिये 9’ सीझन हा नुकताच सुरु झाला आहे. मागच्या आठवड्यात याचं प्रक्षेपण सुरु झालं. पण आता यामधील एक जोडी काढून टाकणार येणार असल्याची बातमी आहे. नच बलियेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे की, शो सुरु झाल्या झाल्या अशा प्रकारे एखाद्या जोडीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वास्तविक नच बलियेचा निर्माता असणाऱ्या सलमान खानने यावेळी नच बलियेमध्ये एक नवी कॉन्सेप्ट आणली आहे. या शो मध्ये एक्स कपल्स अर्थात याआधी एकमेकांच्या सहवासात असणाऱ्या पण आता वेगळ्या झालेल्या जोड्यांनीदेखील सहभाग घेतला आहे. पण यापैकी एक जोडी अशी आहे जी आता निर्मात्याच्या डोक्यालाही ताप देऊ लागली आहे. ही जोडी म्हणजे मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह. या जोडीला आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

काय आहे नक्की कारण?

मिळालेल्या माहितीनुसार नच बलिये 9 च्या निर्मात्यांनी मधुरिमा तुली आणि विशाल सिंह यांचं बिघडतं नातं पाहून त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले आहेत की, निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. या दोघांमधील वाद मिटवण्याचा गेले बरेच दिवस सेटवरील सर्वांनी प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. इतकंच नाही तर निर्मात्यांनीही त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा कोणताही परिणाम या जोडीवर झालेला दिसून आला नाही. त्यामुळे निर्मात्यांना या जोडीला काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

पहिल्याच भागात मधुरिमा आणि विशालचं झालं मोठं भांडण

नच बलियेच्या पहिल्याच भागात मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह या जोडीचं खूप मोठं भांडण झालं होतं. पहिल्याच भागात कोणाचंही न ऐकता दोघं भांडत होतं. या भांडणामुळे विशाल रागाने सेटच्या बाहेरही निघून गेला होता. निर्मात्यांनी या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते शक्य झालं नाही. दोघांमध्ये पहिले वाद सुरु झाला आणि तो विकोपाला गेला. पण असं सांगण्यात येतं की, यावेळी मधुरिमाने विशालला अपशब्द वापरल्याने हा वाद अधिक विकोपाला गेला. मधुरिमाने भांडण झाल्याचं कबूल केलं असलं तरीही कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरल्याचं तिने अमान्य केलं आहे.

हेदेखील वाचा

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार

#oopsmoment होता होता वाचली शिल्पा शेट्टी

 

 

Read More From मनोरंजन