DIY सौंदर्य

डोळ्याखाली डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Nov 3, 2019
डोळ्याखाली डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

कामाची दगदग, अती ताणतणाव, अपूरी झोप, मद्यपान, धुम्रपान, पाणी कमी पिणं, सतत मेक-अप करणं, वारंवार उन्हामध्ये फिरणं, आजारपणं आणि काही विशिष्ठ औषधं, अॅलर्जी, सर्दी-खोकल्याच्या समस्या यामुळे देखील तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आल्यामुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चारचौघात उठणं बसणं कठीण होतं. मात्र डोळे हा आपल्या आरोग्याचाही आरसा असतात. त्यामुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येणं हे आरोग्य समस्येचंदेखील एक लक्षण असू शकतं. डोळ्यांच्या त्वचेखालील मेलॅनीन या रंगद्रव्याचं प्रमाण वाढल्यामुळे ही समस्या निर्माण होते त्यामुळे जर तुम्हाला सतत डार्क सर्कल्स येत असतील तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका.

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी घरगूती उपाय

डोळ्यांना तेलाने मसाज करा

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली नारळाचं अथवा बदामाचं तेल सर्क्युलर मोशनमध्ये लावा. नियमित हा उपाय केल्यामुळे तुमच्या डोळ्या खालील काळी वर्तूळं कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

ग्रीन टीचे पाऊच डोळ्यांवर ठेवा

ग्रीन-टीमधील अॅंटिऑक्सिडंट आणि टॅनिन तुमच्या डोळ्याखालील त्वचेतील रक्तवाहिन्या संकुचित करतात. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या त्वचेवरील सूजलेला अथवा फुगलेला भाग कमी होतो. तसेच ग्रीन-टीमधील व्हिटॅमिन के तुमच्या डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळंदेखील कमी करतात. यासाठी दोन ग्रीन-टी बॅग अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेल्या ग्रीन-टी बॅग अर्धातास डोळ्यांवर ठेवा आणि आराम करा. आठवड्यातून एकदा असे करण्याची सवय स्वतःला लावा.

Shutterstock

पूरेशी झोप घ्या

बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणं अथवा जागरणामुळे तुम्हाला डार्क सर्कल्स होऊ शकतात. यासाठी शक्य असल्यास वेळेवर झोपा आणि लवकर उठा ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल

भरपूर पाणी प्या

निरोगी जीवनासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल. 

कच्च्या बटाट्याचा रस लावा

कच्च्या बटाट्याचा रसामुळे त्वचेचा काळेपणा  कमी होतो. बटाट्याच्या रसामुळे त्वचा उजळते. यासाठी कच्च्या बटाट्याचा रस घ्या आणि डोळ्यांवर सर्क्युलर मोशनमध्ये लावा. अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका. 

केळ्याची साल डोळ्यांवर ठेवा

डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर त्यावर केळ्याच्या सालीचा आतील गर आणि कोरफडाचा गर मिक्स करून डोळ्यांच्या खालील भागावर लावा. ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होण्यास मदत होईल. केळ्यांची  साल डोळ्यांवर ठेवल्यामुळेदेखील तुम्हाला आराम मिळू शकतो

काकडी आणि टोमॅटोचा रस

काकडी आणि टोमटोमध्ये क्लिझिंग घटक  असतात. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा नक्कीच कमी होऊ शकतो. यासाठी काकडीचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करा आणि डोळयांखाली लावा. 

Shutterstock

पोषक आणि सतुंलित आहार घ्या

आहारातून तुम्ही जे पदार्थ खाता त्याचा तुमच्या आरोग्य आणि त्वचेवर परिणाम होत असतो. जर तुम्ही पुरेसा आणि संतुलित आहार घेतला तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसून येईल. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, फळांचे रस, सलाड, नारळपाणी, लिंबूपाणी, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमची त्वचा नक्कीच उजळून निघेल. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

हे ही वाचा – 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

लिपस्टिकचा रंग निवडताना करा या गोष्टींचा विचार

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

Read More From DIY सौंदर्य