DIY लाईफ हॅक्स

स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची गरज नाही

Dipali Naphade  |  Jul 9, 2020
स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची  गरज नाही

जरा  काही झालं की आपण नक्कीच लगेच डॉक्टरकडे पळत नाही. त्यासाठी आपण घरात पेनकिलर्स घेतो. आपल्यालाही आता सरावाने काही औषधं माहीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्स घेत असतो. पण पेनकिलर्सच्या गोळ्या सतत घेणं नक्कीच योग्य नाही. त्याचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा पेनकिलर्स घेण्याच्या सवयीमुळे किडनी निकामी झालेल्या केसही पाहायला मिळतात. पण असं असलं तरीही आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला काही नैसर्गिक पेनकिलर्स सापडतील ज्यामुळे तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज भासणार नाही. पण आता नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरातून घेऊन नैसर्गिक पेनकिलर्स म्हणून वापर करू शकता ते आपण या लेखातून पाहूया. खरं तर त्याचा कसा आणि उपयोग करता येईल आणि त्याचा काय फायदा आहे तेदेखील आपण जाणून घेऊया. कोणत्याही पेनकिलर्सच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुमच्या शारीरिक दुखण्यावर घरातील नैसर्गिक पेनकिलर्स नक्कीच अधिक फायदेशीर ठरतात. 

अशा कोणत्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक पेनकिलर्स आहेत ज्या आपल्याला दुखण्यातून सावरू शकतात आणि त्याचा काय फायदा आहे ते आपण पाहूया.

हळद (Turmeric)

Shutterstock

हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि करक्युमिन नावाचे तत्व जमख भरण्यासाठी आणि बऱ्याच त्रासातून सुटका मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपल्या रोजच्या वापरात हळदीचा  समावेश करून घ्या. तसंच हळदीने आपली रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते. नियमित हळदीचे सेवन केल्यास, बऱ्याच आजारांपासूनही दूर राहण्यासाठी याचा उपयोग होतो. 

फायदे आणि वापर

लिंबू (Lime)

Shutterstock

लिंबामध्ये नैसर्गिक दुःख निवारणाचे घटक असतात. त्यामुळे त्वरीत  आराम मिळतो. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स  करून घेतल्यास ते पाणी प्यायलानेही डोकंदुखी थांबते. अथवा ताप असल्यास, कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावा आणि दुखत असणाऱ्या ठिकाणी कपडा भिजवून लाऊन ठेवावा. पाच ते सात मिनिट्स असं केल्यास, त्वरीत आराम मिळतो. 

फायदे आणि वापर 

आले (Ginger)

Shutterstock

अँटीइन्फ्लेमेरी घटकांनी युक्त  असणाऱ्या आल्यामुळे पोटदुखी आणि पोटासंबंधित विकार दूर होण्यासाठी मदत होते. पोट दुखल्यावर कोणतीही पेनकिलर गोळी खाण्यापेक्षा आल्यामुळे पटकन बरे वाटते आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. शरीराला हानी पोहचत नाही. 

फायदे आणि वापर 

आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं (Health Benefits Of Ginger In Marathi)

हिंग (Asafoetida)

Shutterstock

यामध्ये इन्फ्लेमेटरी ऑक्सिडंट्स असतात जे पोटदुखी, उलटी, गॅस, अपचनसारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. पोटात दुखल्यास, तुम्ही हिंगाचं पाणी बेंबीच्या आसपास लावल्यास, पोटदुखी आणि गॅसपासून सुटका मिळवू शकता. अगदी लहान बाळासाठीदेखील हा उपाय उपयुक्त असतो. त्यामुळे मोठ्या व्यक्तींना खरंच अशा वेळी कोणत्याही पेनकिलर्सची आवश्यकता नाही. जाणून घ्या हिंगाचे फायदे आणि वापर.

फायदे आणि वापर

मेथी (Fenugreek)

Shutterstock

मेथीदेखील पेनकिलकरचं काम करते. मेथीमध्ये असणारे तत्व हे मधुमेह नियंत्रणात आणण्यास मदत करतात. मेथी ही मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय गुणकारी असते. मधुमेही व्यक्तींनी कोणत्याही पेनकिलर्स घेण्यापेक्षा आपल्या आहारात मेथीचा  समावेश करून घेणं हे योग्य आहे. 

फायदे आणि वापर

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे

मीठ (Salt)

Shutterstock

 

मीठ खरं तर जेवणात जास्त खाऊ नये असं म्हणतात. ते खरं आहे. पण मीठाचे अनेक फायदेही आहेत. विशेषतः घसादुखीवर मीठ खूपच चांगले औषध आहे. 

फायदे आणि वापर

 

कॉफी (Coffee)

Shutterstock

कॉफी हा खरं तर एनर्जीचा स्रोत मानला जातो. कॉफीमुळे ऊर्जा मिळते हे खरं असलं तरी काही गोष्टींवर कॉफी औषधासारखे काम करते. विशेषतः डोकं दुखत असल्यास, स्ट्रॉंग कॉफी चांगलीच परिणामकारक ठरते. 

फायदे आणि वापर

चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे

पेपरमिंट (Peppermint)

Shutterstock

बहुगुणी पुदिन्याचा (Peppermint) वापर केल्यास असंख्य आजारांतून तुम्हाला झटपट आराम मिळण्यास मदत होते. पुदिन्याला (पेपरमिंट) आयुर्वेदातही विशेष असं महत्त्व आहे. पुदिन्याची पाने आकारानं जरी लहान असली तर त्यातील विविध गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्यवर्धक अशी आहेत.

फायदे आणि वापर

लवंग (Clove)

Shutterstock

लवंग हे तसं बघितलं तर बऱ्याच आजारांवर उपयुक्त ठरते. लवंग नेहमी घरात ठेवावी असंही म्हटलं जातं. केवळ पदार्थांमध्येच नाही तर औषध म्हणून लवंगेचा वापर करता येतो.

फायदे आणि वापर

दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम (Tips To Get Rid Of Toothache In Marathi)

चेरी (cherry)

Shutterstock

चेरीमध्ये विटामिन ए, बी, सी आणि बिटा केराटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह ही तत्व जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे चेरी हे नैसर्गिक आणि आरोग्यासाठी खूपच लाभदायक फळ आहे. 

फायदे आणि वापर

सोयाबिन (Soy beans)

Shutterstock

सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवोन्स नावाचे रयासन आढळते. यामुळे शरीरातील विशेषतः महिलांच्या शरीरातील हाडांची मजबूती चांगली होते. त्यामुळे नियमित याचा जेवणामध्ये समावेश करून घ्यायला हवा.

फायदे आणि वापर

चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर, आहारात करा सोयाबीन तेलाचा वापर

दही (Plain yogurt)

Shutterstock

दह्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि जास्त  प्रमाणात जीवनसत्वं आढळतात. तसंच दुधाच्या तुलनेत दही हे लवकर पचते. दह्याने शरीराला फायदे मिळतात. 

फायदे आणि वापर

प्रशोत्तरे (FAQs)

1. नैसर्गिक पेनकिलर्स वापरून काही नुकसान होते का?

पेनकिलर्सच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधीही नैसर्गिक पेनकिलर्स घेणे उत्तम. कारण त्याने कोणतेही नुकसान होत नाही आणि मुळात या गोष्टी कशा वापरायच्या आणि किती प्रमाणात त्याचा वापर करायचा हे ठरलेले असते.  त्याचे फायदेही नमूद असतात. 

2. नैसर्गिक पेनकिलर्समधून नक्की फायदा मिळतो का?

हो नैसर्गिक पेनकिलर्स घेतल्याने नक्कीच फायदा मिळतो. इतकंच नाही तर तुम्हाला उगीचच गोळ्या खाण्याचा त्रासही घ्यावा लागत नाही. 

3. औषधांपेक्षा नैसर्गिक पेनकिलर्स जास्त परिणामकारक असतात का?

नैसर्गिक पेनकिलर्सचा परिणाम लगेच होतो. औषधांचा बऱ्याचदा फायदाही होत नाही. पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अवलंबून आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता. 

4. सर्वात जास्त परिणामकारक असे नैसर्गिक पेनकिलर्स कोणते?

अशा अनेक नैसर्गिक पेनकिलर्स आहेत ज्या जास्त परिणामकारक आहेत.  आजार कोणता आहे त्यावर अवलंबून आहे. कोणत्याही नैसर्गिक पेनकिलर्सची अशी नावं घेता येणार नाहीत. 

 5. यकृतासाठी हळद नुकसानकारक आहे का?

हळद ही यकृतासाठी अर्थात किडनीसाठी लाभदायक आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चुकीचा आहे. त्यामुळे अति वापर न करता योग्य प्रमाणात औषध म्हणूनच वापरावी. 

 

Read More From DIY लाईफ हॅक्स