कोरिअन आणि चायनीज ब्युटी रेजिममध्ये तांदूळाचा उपयोग केला जातो. तांदूळमध्ये असलेले अनेक घटक त्वचेसाठी फारच फायदेशीर असतात. तांदूळामध्ये कोलॅजन बुस्ट करणारे घटक असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक हे त्वचेला तजेला देण्याचे काम करते. शिवाय त्वचेवर एक लेयर तयार करते. ज्यामुळे उन्हामुळे होणारी त्वचेची हानीही होत नाही. तांदळाचे फायदे लक्षात घेत तुम्ही तांदळाचा उपयोग करुन तुम्ही एक स्किन केअर किट तयार करायला हवे. हे स्किन केअर किट कसे तयार करायचे ते जाणून घ्या.
#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय
तांदूळाचा फेसपॅक
तांदूळाचा उपयोग करुन तुम्ही एक उत्तम फेसपॅक देखील बनवू शकता. हा फेसपॅक बनवणंही फार सोप्प आहे. तुमच्याकडे असलेले कोणतेही तांदूळ भिजत घाला. ते चांगले भिजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही गुलाब पावडर किंवा बेसन घालून तो पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. हा फेसपॅक वाटताना तुम्ही थोडा जाड वाटा. म्हणजे तो सुकल्यानंतर तुम्हाला चेहराही स्क्रब करता येईल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून केवळ दोनदाच लावा. जर चेहऱ्यावर अॅक्टिव्ह पिंपल्स असतील तर त्या ठिकाणी तु्म्ही तांदूळाचा स्क्रब करु नका. कारण त्यामुळे जळजळ होण्याची किंवा पिंपल्स दुखावण्याची शक्यता असते.
तांदूळ टोनर
तांदूळापासून तुम्ही एक उत्तम टोनर बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेला कोणताही तांदूळ वापरला तरी चालणार आहे. तांदूळ साधारण 8 ते 9 तास भिजत ठेवा. भिजलेले तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर ते एका पातळ कपड्यातून काढा. तांदळाचा राहिलेला चोथा तुम्ही स्क्रब म्हणून वापरल्यास काहीच हरकत नाही. आता जे तांदूळाचे पाणी काढून ठेवले आहे ते स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्या आणि ते पाणी तुम्ही टोनर म्हणून वापरा. रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करुन झाल्यावर संपूर्ण चेहऱ्यावर मारुन घ्या. हे टोनर चेहऱ्यावर मारल्यावर चेहरा अधिक सुंदर दिसतो.
तांदूळ स्क्रब
आठवड्यातून एक दिवस तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढताच यायला हवा. अशावेळी तुम्ही बॉडी स्क्रब करु शकता. बॉडी स्क्रबचा वापर केल्यामुळे त्वचेवरील टॅन निघण्यास मदत मिळते. तुम्ही तांदूळ भिजत घालून ते जाडसर वाटून त्याचे स्क्रब तयार करु शकता.ते संपूर्ण शरीराला लावून अंगावर चोळा. अंगावर चोळल्यामुळे त्वचेवरील मळीचा थर निघण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही नुसते तांदूळ जाडसर वाटून ते शरीराला चोळू शकता.त्यामध्ये तुम्ही थोडेसे तांदुळाचे पीठ घातले तरी देखील चालू शकेल. कारण त्यामुळे तुम्हाला एक थोडासा जाड थर मिळेल. जो अंगाला चोळण्यास मदत करेल. जर यामुळे तुमची त्वचा थोडी कोरडी वाटत असेल तर तुम्ही लगेचच मॉश्चरायझर देखील लावू शकता.
त्वचेसाठी तयार केेलेले टोनर तुम्ही केसांवरही मारु शकता त्यामुळे केस तेलकट होणार नाही ते मोकळे आणि चमकदार दिसतील.
लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो* (Tips For Glowing Skin In Marathi)