कितीही आधुनिक अर्थात मॉर्डर्न कपडे घातले तरीही साडीची फॅशन आणि महिलांचे साडी प्रेम कधीच कमी होणार नाही. लग्नसराईसाठी साड्यांचे वेगवेगळे प्रकार घेतले जातात. त्यातही लग्न, मुंज, गुढीपाडवा, दिवाळी असे सणसमारंभ असल्यावर नऊवारी साडीला तर अधिक महत्त्व प्राप्त होते. साडी कशी नेसावी याचेही प्रशिक्षण घेतले जाते. तर आजकाल नऊवारी साडी नेसून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना चांगल्या कॅप्शनची (Nauvari Saree Look Caption In Marathi) आणि चांगल्या स्टेटची (Nauvari Saree Status In Marathi) गरज भासते. त्यामुळे असेच काही सुंदर नऊवारी साडी कोट्स (Nauvari Saree Quotes In Marathi) आम्ही खास तुमच्यासाठी या लेखातून घेऊन आलो आहोत. सुंदर लुकसाठी अशा सुंदर कॅप्शन (Nauvari Look Caption In Marathi) तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तुम्हीही नऊवारी साडीचा लुक सोशल मीडियावर पोस्ट करताना या नऊवारी साडी कोट्सचा (Nauvari Saree Quotes In Marathi) नक्की आधार घ्या.
Table of Contents
- मराठीतले नऊवारी साडी कोट्स | Nauvari Saree Quotes In Marathi
- नऊवारी साडी लुक इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीमध्ये | Nauvari Look Caption In Marathi
- इन्स्टाग्रामसाठी नऊवारी स्टेटस मराठीत | Nauvari Saree Status In Marathi For Instagram
- पारंपरिक नऊवारी साडी कॅप्शन मराठीतून | Traditional Nauvari Saree Look Caption In Marathi
- नऊवारी पैठणी साडी कोट्स मराठीतून | Nauvari Paithani Saree Quotes In Marathi
मराठीतले नऊवारी साडी कोट्स | Nauvari Saree Quotes In Marathi
नऊवारी साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलीचा तोराच काही वेगळा असतो. सौंदर्याची खाण भासावी अशी जणू प्रत्येक मुलगी नऊवारी साडीमध्ये शोभून दिसते. अशाच नऊवारी साडी नेसल्यानंतर जर तुम्हाला कोट्स (Nauvari Saree Quotes In Marathi) हवे असतील तर खास तुमच्यासाठी.
1. परिपूर्ण सौंदर्याची व्याख्या म्हणजे नऊवारी साडी, सौंदर्य खुलविते भारी.
2. कितीही आधुनिक कपडे घातले तरीही नऊवारीची शान कोणत्याच कपड्यात आणता येत नाही
3. नऊवारी म्हणजे महाराष्ट्राची आन, बान, शान आणि अभिमान !
4. परदेशातही देशी फिलींग देणारा वेष म्हणजे नऊवारी साडी!
5. केवळ अंगावर घालण्यासाठी कापड नाही, तर नारी शक्तीचा अभिमान अशी ही नऊवारी साडी!
6. माझ्या चेहऱ्यावर आलेल्या तेजासाठी जर कोणी कारणीभूत असेल तर ती आहे ही नऊवारी साडी!
7. कोणत्याही मॉर्डर्न लुकला लाजवेल असा जर कोणता लुक असेल तर तो म्हणजे हा नऊवारी साडीचा!
8. नऊवारी नेसून मिरविण्याचा आनंद दुसऱ्या कशाच नाही
9. सगळ्यात भारी लुक म्हणजे नऊवारी साडीतला लुक!
10. मी कोण आहे, हे दाखविण्याचा सर्वात सुंदर पर्याय म्हणजे नऊवारी साडी!
नऊवारी साडी लुक इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीमध्ये | Nauvari Look Caption In Marathi
सध्या सगळ्यात जास्त सोशल मीडियामध्ये काही प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे इन्स्टाग्राम (Instagram). आपला कोणताही लुक अधिक सोशल करायचा असेल तर आपल्या अकाऊंटवरून फोटो पोस्ट करण्याचा हा उत्तम उपाय आहे. अशाच तुमच्या नऊवारी लुकसाठी खास इन्स्टाग्राम कॅप्शन (Nauvari Look Caption In Marathi).
1. नऊवारी साडी म्हणजे मराठ्यांचा अभिमान!
2. नऊवारी साडी नेसणं म्हणजे सौंदर्याचं भरभरून कौतुक आणि मराठी असण्याची शान!
3. सौंदर्य खुलविण्यासाठी जर काही शोधत असाल तर नेसा नऊवारी साडी!
4. खऱ्या सौंदर्याचा लुक हा नऊवारी साडी नेसल्यावरच येतो!
5. खरा तोरा मिरवायचा असेल तर शोभून दिसेल नऊवारी साडी!
6. सौंदर्याचा साज, साड्यांचा माज जर कोणी असेल तर ती म्हणजे नऊवारी साडी!
7. लाख मोलाच्या दागिन्यांना येते शोभा, अशी जर कोणी असेल तर ती म्हणजे महाराष्ट्रीयन नऊवारी साडी!
8. सौंदर्यात घालायची असेल भर, तर नऊवारी साडीवर असेल जर, तुम्ही कराल अनेकांची मनं सर!
9. एक वेगळाच आत्मविश्वास मिळवून देते नऊवारी साडी!
10. नऊवारी साडी म्हणजे केवळ कापड नाही, तर ती एक भावना आहे
इन्स्टाग्रामसाठी नऊवारी स्टेटस मराठीत | Nauvari Saree Status In Marathi For Instagram
नऊवारी साडी नेसल्यानंतर मोबाईलमध्ये भारंभार फोटो काढले नाहीत असं होणारच नाही. नऊवारी साडीतील फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केल्यानंतर अथवा व्हॉट्सअप स्टेटस (Nauvari Saree Status In Marathi For Instagram) ठेवण्यासाठी काही खास स्टेटस
1. कपाळी चंद्रकोर, नथ शोभते नाकी,
गळी शोभते नाजूकशी सर आणि ठुशी
नाकी डोळी नीटस जणून रेखीव घडवली मूर्ती
नऊवारी साडीतच दिसते ठसकेदार अस्सल मराठी मुलगी
2. सोन्याची चमक आणि नऊवारीतील धमक कधीच कमी होत नाही!
3. नऊवारी साडीवर कोणत्याही इतर गोष्टींपेक्षा उठून दिसत असेल तर ते म्हणजे तुमचं हास्य!
4. सुंदर नारी नेसे नऊवारी साडी!
5. लोकांना तुमच्याकडे वारंवार पाहण्याची संधी द्या, नेसा नऊवारी साडी!
6. नऊवारी साडी नेसणे म्हणजे एक वेगळाच आनंद!
7. नऊवारी साडी Vibes ONLY!
8. गुढीपाडव्याचा सण नऊवारी साडीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही!
9. कधीही निवृत्त न होणारी फॅशन म्हणजे नऊवारी साडी!
10. संस्कारी नारी with ब्युटीफूल नऊवारी साडी!
पारंपरिक नऊवारी साडी कॅप्शन मराठीतून | Traditional Nauvari Saree Look Caption In Marathi
कितीही आधुनिक झालं तरीही काही कार्यक्रमांना आजही पारंपरिक साडी नेसणे हे अपरिहार्य आहे. यामध्ये आधुनिकतेचा आणि पारंपरिकतेचा मेळही अनेक ठिकाणी घातला जातो. मात्र तरीही पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसणे हा वेगळाच साज आहे. अशाच पारंपरिक पद्धतीच्या नऊवारी साडीसाठी काही खास कोट्स Nauvari Saree Quotes In Marathi)
1. पारंपरिक ते अधिक सुंदर आणि नऊवारीला तोडच नाही!
2. एकाच वेळी सौंदर्य आणि पारंपरिकतेचा मेळ हवा असेल तर नऊवारी साडीशिवाय पर्याय नाही!
3. पुन्हा एकदा पारंपरिकतेकडे वळूया! नऊवारी साडी नेसूया!
4. नऊवारी साडीतील पारंपरिकता = मुलींची सहजसुंदरता
5. प्रत्येक पारंपरिक नऊवारी साडी एक गोष्ट सांगत असते, तुम्हाला फक्त ती वाचता यायला हवी
6. पारंपरिक नऊवारी साडी म्हणजे वाखाणण्याजोगी कला!
7. मराठी मुलींचा अभिमान म्हणजे पारंपरिक नऊवारी साडी!
8. कारण तुम्हाला मला पारंपरिक नऊवारीत बघायला आवडेल हे मला माहीत आहे…
9. कोणतीही महिला जर सर्वात सुंदर दिसत असेल तर ती म्हणजे नऊवारी साडीत!
10. तुमच्यातला लाजाळूपणा घालवून, सौंदर्याची खाण उभी करते ती म्हणजे नऊवारी साडी!
नऊवारी पैठणी साडी कोट्स मराठीतून | Nauvari Paithani Saree Quotes In Marathi
पैठणी म्हणजे महाराष्ट्राची शान. त्यातही नऊवारी पैठणी साडी म्हणजे दुधात साखर. महाराष्ट्रात अनेक महिलांकडे नऊवारी पैठणी साडी आहे. पैठणीची अनेक पद्धतीने स्टाईल केली जाते. ती नेसल्यानंतर तुम्हाला जर सोशल मीडियासाठी काही कोट्स हवे असतील तर खास तुमच्यासाठी.
1. साड्यांची राणी म्हणजे केवळ पारंपरिक नऊवारी पैठणी साडी!
2. पैठणी नऊवारी साडी आणि त्यावर सुंदर असा साज
बाई कुणाचीही नजर न लागो आज!
3. महाराष्ट्राच्या लेकी, गोष्ट तुमची न्यारी, नऊवारी पैठणीच्या साजात दिसता लय भारी!
4. रोज रोज #caption टाकू तरी काय, त्यापेक्षा आज नऊवारी पैठणी साडीतच करते तुम्हाला हाय बाय!
5. नऊवारी पैठणी साडी, जगाय लय भारी!
6. नऊवारी पैठणी साडीचा तोरा, जरतारी पदर सांगतोय नाच रे मोरा!
7. साधेपणा हीच आनंदाची गुरूकिल्ली, तर नऊवारी पैठणी साडी ही आहे सौंदर्याची किल्ली!
8. कॅमेऱ्याची क्लॅरिटी आणि नऊवारी पैठणी साडी नेसलेल्या मराठी मुलीची पर्सनॅलिटी ही नेहमी कडकच असते!
9. मुलीचे सौंदर्य फॅशनने नाही तर नऊवारी पैठणी साडीच्या ठसक्याने शोभते!
10. नऊवारी पैठणीचा ठाव, घालणार काळजावर घाव!
निष्कर्ष – नऊवारी साडी नेसल्यानंतर फोटो पोस्ट करताना काही खास नऊवारी साडी कोट्स (Nauvari Saree Quotes In Marathi) आम्ही तुमच्यासाठी दिले आहे. तुम्ही याचा उपयोग इन्स्टाग्राम पोस्टसाठीही (Nauvari Look Caption In Marathi) करून घेऊन शकता. तुमच्या नऊवारी साडी लुकसाठी अशा कॅप्शन वापरा (Nauvari Saree Look Caption In Marathi) आणि करा इतरांनाही आनंदी!
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade