DIY सौंदर्य

केसांना तेल लावण्याचे फायदे, होतात घनदाट आणि लांब

Dipali Naphade  |  Dec 15, 2020
केसांना तेल लावण्याचे फायदे, होतात घनदाट आणि लांब

प्रत्येक महिलेला आपले केस मजबूत, घनदाट असावे असं वाटतं. पण प्रत्येकाला ही इच्छा पूर्ण करता येतेच असं नाही. आता आपली जीवनशैलीही खूप बदलली आहे. आपल्या गरजा बदलल्या आहेत आणि प्राधान्यही. केसांची काळजी आपण सतत घेऊ शकत नाही. त्यामुळे बरेचदा लांबसडक केस असणाऱ्या महिलाही कमी दिसतात. त्याशिवाय केसांची काळजी नीट घेतली नाही तर केसांमध्ये कोंडा होणे, केसगळती, दुहेरी केस अशा अनेक समस्याही मागे लागतात. हिवाळ्यात सर्वात जास्त केसांच्या बाबतीत त्रास होतो. पण तुम्हाला जर घनदाट आणि लांबसडक केस हवे असतील तर सर्वात मुख्य आणि सोपा उपाय म्हणजे केसांना योग्यरित्या तेल लावणे. बरेचदा हल्ली महिलांना केसांना तेल लावायला आवडत नाही. पण केसांना तेल लावण्याने केस अधिक चांगले राहतात आणि पुढील समस्याही टळतात. केसांची योग्य निगा राखायची असेल तर केसांना तेल लावणं ही गोष्ट तुम्ही न टाळलेलीच बरी. निरोगी केसांसाठी केसांना तेल लावणे आणि केसांना स्पा करणे हे दोन्ही गरजेचे आहे. केसांना तेल लावण्याचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. बऱ्याचदा तेलाचे फायदे माहीत असूनही केसांंना तेल लावले जात नाही आणि काळजी घेतली जात नाही. असं अजिबात न करता किमान आठवड्यातून एकदा तरी केसांना व्यवस्थित तेल लावावे. पाहूया काय आहेत याचे फायदे. 

केसांमधील कोंडा होतो दूर

Shutterstock

कोंडा ही केसांची सामाईक आणि साधारणतः सर्वांनाच होणारी समस्या आहे. स्काल्प कोरडा पडतो तेव्हा कोंडा होतो. पण जेव्हा तुम्ही केसांना नियमित तेल लावता आणि मसाज करता तेव्हा तुमच्या केसांना योग्य मुलायमपणा मिळतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. तेलामुळे केवळ स्काल्पच कोरडा व्हायचा थांबत नाही तर तुमच्या केसांना अधिक मजबूती मिळण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

केसांची वाढ होते

Shutterstock

आपल्या केसांच्या वाढीसाठी पोषणाची आवश्यकता असते. तेलामुळे आपल्या केसांना योग्य पोषण मिळतं आणि आपल्या केसांची वाढ होण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर केस पुन्हा उगविण्यासाठीही तेलाची मदत मिळते. डोक्यावरील ज्या भागामध्ये केस कमी असतात तिथे नियमित तेल लावल्याने केस व्यवस्थित उगवतात. त्याची योग्य मशागत मात्र करावी लागते. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

कोरड्या केसांना नियंत्रणात आणते

Shutterstock

कोरडे केस कोणालाही आवडत नाहीत. मुळात केस कोरडे झाले की त्यात अधिक गुंतागुंत होते आणि केस अधिक प्रमाणात तुटतात. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे तेल लाऊन केसांना मुलायम करणे. मुळात कोरडे केस हे आपल्या नियंत्रणात राहत नाहीत. त्यामुळे आपलीही चिडचिड होते. पण केस कोरडे पडू द्यायचे नसतील आणि फ्रिजी होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही केसांना ऑईलिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे केस कोरडे होत नाहीत आणि केसांना योग्य पोषण मिळते. 

कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी घरगुती उपाय

केसगळती रोखते

Shutterstock

केसांची गळती हीदेखील एक सामाईक समस्या आहे. पण बऱ्याचदा काही जण याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. पण यावर उत्तम उपाय म्हणजे केसांना तेल लाऊन मालिश करणे. तेलामुळे केसगळती हमखास थांबते. मुळात केसांना तेलाने मालिश मुळापासून केले तर केसांना योग्य पोषण मिळते आणि केसांची गळती रोखण्यासाठी हे फायदेशीर ठरते. केसांची गळती थांबविण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

केसांना चमक मिळते

Shutterstock

तुमचे केस मोठे आणि घनदाट असतील तरीही त्यामध्ये जर चमक नसेल तर केसांमध्ये चमक आणण्यासाठी तेल फायदेशीर ठरते. नैसर्गिक हेअर ऑईलच्या मदतीने तुम्ही केसांमध्ये चमक आणू शकता. मुळात यामध्ये केसांना निरोगी ठेवण्याचे तत्व असते आणि त्यामुळे केस चमकदार होतात आणि तुम्हाला केसांच्या समस्याही जाणवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर या वरील पाच समस्या असतील तर तुम्ही नियमित केसांना तेल लावणे गरजेचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक 

 

Read More From DIY सौंदर्य