त्वचेचा तजेला टिकवून ठेवायचा आहे?त्वचा चिरतरुण राहावी अस वाटते? तर आज आपण असा सोपा उपाय शोधून काढला आहे जो सध्या प्रत्येकाच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतो. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या ऑलिव्ह ऑईलविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी फारच चांगले आहे आहे याचे आरोग्यविषयक फायदे आपण या आधीही बरेचदा जाणून घेतले आहे. पण त्वचेसाठीही ऑलिव्ह ऑईल हे उत्तम आहे. ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला चांगले ठेवण्याचे काम करतात. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते. तुमच्या त्वचेसंदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करुन सुंदर त्वचा मिळवू शकता. ऑलिव्ह ऑईलचा वापर नेमका कसा करावा आणि त्याचा फायदा त्वचेला कसा होतो ते जाणून घेऊया.
Table of Contents
त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल्सचे फायदे (Olive Oil Benefits For Skin In Marathi)
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेवर कमालीचे काम करतात त्यांचा नेमका कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.
त्वचा ठेवते मॉश्चराईज (Moisturizing Effects)
ऑलिव्ह ऑईल लावण्याचा पहितर आणि थोडासा मसाज केल्यानंतर हे त्वचेत मुरुन जाते. त्वचा कोरडी पडत नाही. इतर कोणत्याही मॉश्चरायझरपेक्षा ते त्वचेवर अधिक राहते. त्यामुळे त्वचा कोणत्याही वातावरणात चांगली राहण्यास मदत मिळते. ला आणि महत्वाचा फायदा म्हणजे त्वचा मॉश्चराईज करणे.तेलामध्ये असे काही घटक असतात जे लावल्यानंतर नक्कीच त्वचा तुकतुकीत आणि चांगली दिसू लागते. ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेले घटक अशाच पद्धतीने काम करतात. हे तेल फार तेलकट नसते. त्यामुळे त्वचेवर लावल्यानं
अँटीऑक्सिडंट घटक (Antioxidants Content)
ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्वचेला तजेलदार आणि चांगली राहण्यासाठी अँटीऑक्सिडंट घटक हे फारच गरजेचे असतात. अँटीऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा आपोआप दुरुस्त होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत करते.
बॅक्टेरियाशी लढा (Fights Bacteria)
त्वचेवर येण्यासाठी धूळ, माती, प्रदूषण कारणीभूत असते. त्वचेवर असणाऱ्या पोअर्समध्ये जाऊन हा त्रास होऊ शकतो. हवेत असणाऱ्या बॅक्टेरियाला लांब ठेवायचे असेत तर तुम्हाला त्वचेचे संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. ऑलिव्ह ऑईलच्या उपयोगाने त्वचेमधील पोअर्समधून घाण बाहेर पडण्यास मदत मिळते. त्वचेचे आरोग्य चांगले राहिल्यामुळे बॅक्टेरियाशी लढण्यासाठी त्वचा सज्ज होते. यामधील अँटीऑक्सिडंट घटक बॅक्टेरियाला त्वचेला करु पाहणाऱ्या हानीपासून दूर ठेवतात.
स्ट्रेच मार्क्स करते कमी (Lighten Stretch Marks)
त्वचेवर असणारे कोणतेही व्रण कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल हे नेहमी फायद्याचे असते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचा एकसारखी करण्यास मदत करते. खूप जणांना स्ट्रेज मार्क्सचा त्रास असतो. तो काही केल्या जात नसेलस तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलच्या तेलाचा वापर सुर करा. स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी जर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा केला तर कालांतराने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळते.
जखमा भरण्यास मदत (Treating Wounds)
त्वचेवर पिंपल्स येणे, ओपन पोअर्स या सगळ्यामुळे त्वचेवर एक प्रकारच्या जखाम होत असतात. काळे डाग आणि फोडलेल्या पिंपल्समुळे त्वचा दिवसेंदिवस काळवंडलेली दिसू लागते. त्या जखमा दुरुस्त करण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते. अँटीसेप्टीक घटक असल्यामुळे त्वचेवर जखमा असतील तर त्या भरुन निघण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स जर फुटले असतील तर ती जखम जळजळ करते. ऑलिव्ह ऑईलच्या वापरामुळे ही जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
पिंपल्स करते कमी (Reduce Pigmentation)
खूप जणांना पिंपल्सचा त्रास असतो. त्वचेला आवश्यक असे घटक मिळाले नाही किंवा त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर असा त्रास होणे अगदीच स्वाभाविक असते. ओपन पोअर्समुळे तुम्हाला सतत पिंपल्स येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा मसाज करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे पोअर्स स्वच्छ राहण्यास मदत मिळेल. शिवाय त्वचा नरिश होण्यासही मदत मिळेल.
त्वचेचे अडथळे करतात दूर (Work As A Skin Barrier)
वातावरणातील अनेक गोष्टी त्वचेसाठी बाधा निर्माण करतात. त्वचेच्या या समस्या कमी करुन त्वचा चांगले ठेवण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते. ऑलिव्ह हे एक नैसर्गिक बॅरिअर असून त्वचेचा तजेला ठेवण्यास ते मदत करते. त्यामुळे सगळ्या त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल्सचा वापर करा.
वार्धक्याची लक्षण ठेवते दूर (Prevent Premature Aging)
त्वचेवर सुरकुत्या कोणालाच आवडत नाही. त्वचेची इलास्टिसिटी वाढवून त्वचा चिरतरुण ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल मदत करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास त्यामुळे मदत मिळते. तसेच वयोमानानुसार त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांची गती थांबवण्यासही मदत करते. ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेले व्हिटॅमिन त्वचेला चांगले ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन D चा साठा (Rich Source Of Vitamin D)
त्वचेसाठी व्हिटॅमिन D हे फारच गरजेचे असते. त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी ते मदत करते. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन A,D,E असते. जे तुमची त्वचा अधिक चांगली ठेवण्यास मदत करतात. बऱ्याच ठिकाणी अशा व्हिटॅमिन असलेल्या कॅप्सुल मिळतात. त्या घेण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकता.
सूर्य किरणांपासून संरक्षण (Protect From UV Rays)
ऑलिव्ह ऑईल त्वचेवर असे सुरक्षा कवच तयार करते. सूर्याच्या अतिनील किरणांपासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करा. त्यामुळे त्वचेची हानी होत नाही. त्वचा चांगली राहते. त्वचा टॅनही होत नाही. त्वचा टॅन होत नाही त्यामुळे त्वचा कोरडी पडून अनइव्हन होण्याची शक्यताही दुरावते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.
असे लावा चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल (How To Apply Olive Oil For Skin In Marathi)
ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही करणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकता.
- आंघोळीनंतर हातावर अगदी थोडेसे ऑलिव्ह ऑईल चेहऱ्याला आणि त्वचेला लावा. त्यामुळे त्वचा दिवसभर मॉश्चराईज राहते.
- ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करुन तुम्हाला मेकअपही काढता येतो. त्यामधील नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला हानी पोहचू देत नाही.
- ऑलिव्ह ऑईल आणि हळद हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. एका भांड्यात प्रत्येकी एक एक चमचा तेल आणि हळद घेऊन एकत्र करा. हा मास्क चेहऱ्याला लावून किमान 10 मिनिटं ठेवा. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तुम्हाला त्वचा अधिक चांगली आणि तुकतुकीत दिसेल. असे घरगुती फेस पॅक त्वचेवर तजेला आणतात
- दररोज रात्री झोपताना ऑलिव्ह ऑईल चेहऱ्याला लावून मसाज करा. यामसाजमुळे चेहऱ्यावरील नसा मोकळा होण्यास मदत मिळते.
- तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही मॉश्चरायझरमध्ये अगदी एखादा ड्रॉप ऑलिव्ह ऑईल घाला आणि ते लावा. त्यामुळे मॉश्चरायझर अधिक काळासाठी टिकते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
हो, अगदी कमी प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचा उपयोग त्वचेसाठी करण्यास काहीच हरकत नाही. हे तेल थोडे जाड असते. त्यामुळे ते जरासे जरी घेतले तरी ते चेहऱ्याला पुरेसे होऊ शकते. शक्य असेल तर एक दिवस आड किंवा आठवड्यातून या तेलाचा उपयोग करा. या तेलाचा अतिरेक आणि जास्त वापर तुमची त्वचा अधिक तेलकट करु शकतो. याचा वापर करताना योग्य मसाज करा तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल.
ऑलिव्ह ऑईल हे फारसे तेलकट नसले तरी देखील तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कोणत्याही तेलाचा वापर करताना थोडा विचार करणे गरजेचे आहे. जर तुमची त्वचा तेलकट प्रकारातील असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलच नाही तर कोणत्याही तेलाचा वापर करणे टाळावे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला इतर कोणत्याही समस्या होणार नाहीत.
असे कधीच कोणत्या अभ्यासांती सिद्ध झालेले नाही की, ऑलिव्ह ऑईलच्या वापरामुळे त्वचा काळी पडली आहे.तेलाच्या वापरामुळे त्वचेखाली असलेल्या स्किनसेल्सची पुनरावृत्ती व्हायला मदत होते. त्वचेवरील टॅन कमी होते. त्यामुळे त्वचा ही अधिक चांगली दिसते. त्वचेवर चमक येते. त्यामुळे त्वचा काळवंडण्याचा प्रश्न यामध्ये येत नाही.