Care

उन्हाळ्यात केस सतत होत असतील तेलकट तर अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Apr 6, 2021
उन्हाळ्यात केस सतत होत असतील तेलकट तर अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात उकाडा आणि घामाच्या धारा यामुळे आधीच हैराण व्हायला होते. कपड्यांना येणारी घामाची दुर्गंधी, भिजलेले केस यामुळे घराबाहेर पडण्याचा कंटाळा येतो. त्यातच जर केस लांब असतील किमान उन्हाळ्यात केस नकोसे होतात. केसांना येणारा घाम आणि त्यामुळे सतत केस तेलकट होत असतील तर उन्हाळ्यात तुम्ही केसांची काळजी घेणे फार गरजेचे असते. केसांवर घाम तसाच राहिला तर केसांना दुर्गंधी तर येतेच. पण स्काल्प तेलकट होते. स्काल्प तेलकट होत राहिली तर मात्र हा त्रास पुढे कोंडा आणि केसगळतीस कारणीभूत ठरतो. त्यामुळे केसांची नेमकी कशी काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊया. म्हणजे तुमचे केस तेलकट होणार नाहीत आणि तुम्हाला केसांच्या अन्य समस्या येणार नाही.

केस ब्लीच करणं सुरक्षित आहे का

Instagram

केस करा ट्रिम 

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत केस कापणे किंवा ट्रिम करणे हा अनेकांचा ठरलेला दिनक्रम असायचा. पण आता खूप जणांना केस ट्रिम करायला आवडत नाही. पण जर शक्य असेल आणि केसांच्या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर मात्र तुम्ही तुमचे केस ट्रिम करा. केस रोज धुता येतील इतके शॉर्ट केले तर फार उत्तम म्हणजे तुमचे केस तेलकट होणार नाहीत. त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता कमी होते. जर तुमचे केस मोठे असतील आणि तुम्हाला ते कापण्याची मुळीच इच्छा नसेल तर ठीक आहे हा पर्याय तुम्ही टाळा.


तेल टाळा 

खूप जणांना आठवड्यातून एकदा तरी तेल लावायची सवय असते.  पण उन्हाळ्यात तेल लावणे टाळले तर फारच उत्तम. कारण तेल सतत लावल्यामुळे ते पोअर्समध्ये आणि  स्काल्पवर तेल तसेच राहते. तुम्ही अगदी आता जरी केस धुतले तरी देखील काही तासांनी तेलकट वाटू लागतात. काही जणांच्या केसांमध्ये नॅचरल तेल असते. त्यांना हा त्रास नुसता उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर होत असतो. अशांनी उन्हाळ्यात तेल लावणे टाळावे कारण तेल जर चेहऱ्यावर उतरले तर तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. 

तेलकट स्काल्पसाठी असे असावे हेअर रुटीन (Hair Care For Oily Scalp In Marathi)

Instagram

कंडिशनर नको 

कंडिशनर हा केसांचा गुंता कमी करण्यासाठी असतो. त्यामुळे तुमचे केस सिल्की दिसू लागतात. पण कंडिशनर लावल्यानंतर केसांवर एक थर निर्माण होतो. जो थोडा तेलकट असतो. जर कंडिशनरचा वापर जरी अति झाला तर केस एकदम तेलकट दिसू लागतात. त्यामुळे जर काही खास कार्यक्रम असेल तरच तुम्ही कंडिशनरचा वापर करा. जर गरज नसेल तर कंडिशनर वापरु नका. कंडिशनरच्या अति वापरामुळे तुम्हाला या दिवसात केसगळती अधिक होताना जाणवेल. त्यामुळे कंडिशनरचा वापर बेताने आणि जपून करा. 

टाल्कम पावडर वापरा

केस तेलकट झाले असतील तर  केसांवर थोडीशी टाल्कम पावडर शिंपडली जाते. टाल्कम पावडर घातली तर केस कोरडे होतात. पण हा प्रयोग तुम्ही केवळ केस धुवायचे नाहीत या कारणासाठी वापरली तर चालू शकेल. पण केसांवर जास्त टाल्कम पावडर वापरु नका. कारण जर स्काल्पवर घाम आला आणि टाल्कम पावडर सुकली तरी देखील केस कोरडे पडण्याची शक्यता जास्त असते. 


चांगला शॅम्पू वापरा 

चांगल्या केसांसाठी चांगला शॅम्पू महत्वाचा असतो. तेलाचे कोणतेही घटक असतील असे शॅम्पू तुम्ही मुळीच निवडू नका. कारण त्यामुळे केस तेलकट होतात. शक्य असेल तर तुम्ही उन्हाळ्यासाठी तुम्ही अॅलोवेरा, कांद्याचा अर्क, स्ट्रॉबेरी असे काही घटक असलेले शॅम्पू निवडा जे केस स्वच्छ करतात आणि केसांना चांगला सुगंध देतात. 


आता उन्हाळ्यात केसांना घाम येऊन ते तेलकट होत असतील तर तुम्ही केसांची अशी काळजी घ्या. 

लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणं

Read More From Care