खाणंपिण आणि नाइटलाईफ

कच्चा कांदा नक्की का खावा, काय आहेत याचे फायदे

Dipali Naphade  |  Jan 1, 2021
onion

कांदा हा केवळ खाण्याचा स्वाद वाढविण्यासाठीच नाही तर शरीरासाठीही फायदेशीर आहे. आपल्याला जेवणामध्ये कांदा लागतोच. पण कच्चा कांदा खायची वेळ आली की बरेच जण नाक मुरडतात. पण कच्चा कांदा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कांद्यामध्ये अँटिइन्फेमेटरी गुण असतात. त्याशिवाय यामध्ये अँटिअलर्जिक, अँटिऑक्सिडंट आणि अँटिकार्सिनोजेनिक गुणही आढळतात. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, बी 6, बी कॉम्प्लेक्स, लोह, फोलेट आणि पोटॅशियम यासारखे तत्वही आढळतात. कच्च्या कांद्याचा वापर करण्याचे अनेक प्रकार आहेत. काही जण याचा उपयोग सलाडप्रमाणे करतात, तर काही जण याचे लोणचे बनवतात. तर काही जण याची कोशिंबीर करून खातात. काही जणांना कच्चा कांदा खायला आवडत नाही. पण कच्चा कांदा शरीराला उपयोगी ठरतो आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठीही याचा उपयोग होतो. या लेखातून आपण कच्चा कांदा नक्की का खावा आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

कच्च्या कांद्याचे फायदे

Shutterstock

कच्चा कांदा हा शरीराला अनेक आजारांपासून दूर राखण्यास मदत करतो. तसंच याचा शरीराला फायदा मिळतो. नक्की कोणते आजार यापासून दूर राहतात पाहूया. 

स्काल्प चांगला राखण्यासाठी

Shutterstock

कांद्याचा रस काढून तुम्ही केसांना लावला तर केसगळती होण्यापासून वाचते आणि तुम्हाला मऊ आणि मुलायम केस बनतात. तसंच केसांची वाढ होण्यास मदत मिळते. कच्च्या कांद्याचा रस स्काल्पला लावल्यास, त्याचा फायदा होतो. कोंडाही होत नाही. सध्या अनेक पार्लरमध्येही कच्च्या कांद्याची ट्रीटमेंट करण्यात येते. जेणेकरून केस अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. बाजारामध्ये कांद्याच्या रसाचे शँपूदेखील आले आहेत.

मजबूत आणि चमकदार केसांसाठी करा कांद्याच्या रसाचा असा वापर

मधुमेह संपुष्टात आणण्याासाठी

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींंसाठी कच्च्या कांद्याचे सेवन करणे लाभदायक मानले जाते. कांद्याचा उपयोग हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही होतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नियमित कच्च्या कांद्याचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यातील तत्वामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

कॅन्सर रोखण्यासाठी

कॅन्सर एक असा आजार आहे जो कधीही होऊ शकतो आणि कोणालाही होऊ शकतो. पण कच्चा कांदा हा या आजारामध्ये लाभदायक मानला जातो. कांद्यामध्ये असे अनेक पोषक तत्व आहेत जे कॅन्सरचा त्रास होण्यापासून वाचविण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या नियमित जेवणामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश करून घ्या. तुम्हाला कांदा आवडत नसेल तरीही औषध म्हणून याचा किमान आठवड्यातून एकदा तरी खाण्यासाठी उपयोग करा. भाजीमध्ये अथवा अन्य पदार्थांमध्ये आपण कांदा घालतोच. पण कच्चा कांदाही तुम्ही खा.

स्वयंपाकानंतर हाताला येणारा लसूण-कांद्याचा वास असा करा दूर

 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

Shutterstock

प्रतिकारशक्ती असेल तर शरीर उत्तम राहू शकते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कच्चा कांदा खाल्ल्याने अथवा यांच्या सालांचा चहामध्ये उपयोग केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

कांदा कापताना आता डोळ्यात येणार नाही पाणी, करा नामी युक्ती

हाडांची मजबूती वाढविण्यासाठी

वयानुसार हाडांची मजबूती कमी होऊ लागते. हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडांच्या  समस्यांपासून वाचण्यासाठी कच्चा कांदा फायदेशीर ठरतो. कांद्यात असणारे विटामिन सी आणि कॅल्शियम हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडातील त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे नियमित कच्चा कांदा खावा. 

टीप – कांदा अतिप्रमाणातही खाऊ नये. तसंच तुम्ही कांदा खात असताना अथवा त्याचा उपयोग करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ