DIY सौंदर्य

कांदा – मेथीचा हेअरमास्क ठरतो केसांसाठी फायदेशीर, वापरून पाहा

Dipali Naphade  |  May 1, 2022
onion-fenugreek-seeds-hair-mask-for-glowing-hair-in-marathi

केसांची समस्या कोणाला नाही असं या जगात कोणीही नसेल. केस सुंदर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. अनेकदा पार्लरमध्येही महागडे उपचार घेतले जातात. पण इतकं करूनही केसांच्या समस्या पटकन जातात असं नाही. पण घरातील काही पदार्थांचा वापर केल्यास तुम्हाला केसांच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते आणि या पदार्थांच्या हेअरमास्कमुळे केसांना फायदाही होतो. नेहमीच्या वापरातीलच हे पदार्थ आहेत आणि ते म्हणजे कांदा आणि मेथी. हो खरं आहे, कांदा – मेथीचा हेअरमास्क हा केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. प्राचीन काळापासून याचा वापर होत आला आहे. यामधील पोषक तत्व तुमच्या केसांची वाढ करण्यासाठी आणि केसांचा उत्तम पोषण करण्यासाठी उत्तम ठरतात. तुम्हीही याचा वापर करून पाहायला काहीच हरकत नाही. मात्र तुम्हाला यापैकी कोणत्याही पदार्थांची अलर्जी असल्यास, पॅच टेस्ट केल्याशिवाय याचा वापर करू नका. यासाठी नक्की काय करायला हवे आणि याचा कसा फायदा होतो हे या लेखातून तुम्ही जाणून घ्या. 

कसा बनवायचा कांदा – मेथीचा हेअरमास्क (Onion Fenugreek Seed Hair Mask)

कांदा आणि मेथीचा हेअरमास्क घरी कसा बनवायचा याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही याचा वापर करून नक्की केसांसाठी फायदा करून घ्या. 

स्टेप 1 – सर्वात पहिल्यांदा मेथीचे दाणे घ्या आणि एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात हे दाणे रात्रभर भिजत घाला

स्टेप 2 – सकाळी उठल्यावर हे पाणी काढून टाका आणि याची मिक्सरमधून एक सरसरीत पेस्ट करून घ्या

स्टेप 3 – त्यानंतर एक कांदा कापा आणि त्याची पेस्ट करा. ही पेस्ट एका कपड्यात काढा आणि या पेस्टमधून कांद्याचा रस एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवा 

स्टेप 4 – मेथीच्या पेस्टमध्ये कांद्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या

स्टेप 5 – ब्रशच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या संपूर्ण केसांना ज्याप्रमाणे डाय लावता त्याच पद्धतीने हे मिश्रण लावा आणि साधारण 1 तास हे मिश्रण केसांवर तसंच राहू द्या (सुरूवातील लावताना कांद्यामुळे डोळे चुरचुरतात अथवा डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे ही पेस्ट लावताना तुम्ही काळजी घ्यावी. अचानक डोळ्याजवळ ही पेस्ट आणू नये)

स्टेप 6 – एका तासानंतर माईल्ड शँपूनंतर तुम्ही केस स्वच्छ धुवा आणि ड्रायरचा वापर करू नका. नैसर्गिक हवेवरच केस सुकू द्या. ओल्या केसांवर अजिबातच तुम्ही कंगवा मारू नका. यामुळे केस तुटण्याचा आणि गळण्याचा त्रास अधिक होतो 

काय आहेत कांदा मेथी हेअरमास्कचे फायदे 

कांदा आणि मेथी या दोन्ही पदार्थांमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व आहेत. तुमचे केस पांढरे होत असतील तरीही तुम्ही याचा वापर करू शकता. मेथीच्या दाण्यामध्ये लेसिथिन नावाचे तत्व असते, जे तुमच्या केसांना नैसर्गिक कंडिशनर म्हणून मदत करते. तसंच यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फोलिक अॅसिड, विटामिन ए, के आणि सी चे प्रमाणही अधिक असते, जे केसगळती आणि केस तुटण्यासारख्या समस्या थांबविण्यास मदत करते. तर कांद्यामध्ये सल्फर अधिक प्रमाणात असते. जे केसांना पातळ होण्यासापासून थांबवतात. केस घनदाट होण्यास आणि अधिक चमकदार होण्यास कांद्याची मदत मिळते. कांद्यामध्येही फॉलिक अॅसिड, विटामिन सी आणि सल्फरसारखे केसांना पोषक तत्व आढळतात. यामुळे केसांची वाढ अधिक चांगली होते. 

याप्रमाणे तुम्ही कांदा मेथी हेअरमास्कचा वापर करून आपल्या केसांची चांगली वाढ करू शकता आणि केसांना योग्य पोषण देऊ शकता. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असेल आणि वापरायचे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनही हे वापरू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य