Diet

‘हे’ आजार असणाऱ्यांनी संत्री खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम

Harshada Shirsekar  |  Dec 27, 2019
‘हे’ आजार असणाऱ्यांनी संत्री खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम

बदलत्या ऋतुनुसार वेगवेगळ्या आजारांचा त्रास होऊ लागतो. सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी यांसारखी शारीरिक दुखणी वाढू लागतात. आजारांच्या त्रासातून स्वतःचा बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी कित्येक फळे आणि भाज्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतात. पण यामध्ये काही अशी फळेही असतात, ज्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. संत्रे हे त्यापैकीच आहे. हिवाळ्यात संत्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पण मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हे फळ आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याव्यतिरिक्त अन्य आजार असतानाही संत्रे खाल्ल्यास त्याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो. जाणून घेऊया याबाबतची माहिती

मधुमेहाचा त्रास
संत्र्यांमध्ये कृत्रिमरित्या साखरेचा समावेश केलेला नसतो. कारण यामध्ये निसर्गतः साखरेचं प्रमाण अधिक असते. साखरेत ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असते, ज्यामुळे साखरेच्या पातळीवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच मधुमेहचा त्रास असणाऱ्यांनी संत्री अधिक प्रमाणात खाऊ नये.

(वाचा : उपवासात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या कारणे)

फायबर कमी असते
वजन घटवण्यासाठी टोकाचा प्रयत्न करत असाल तर पुरेशा प्रमाणात फायबरचा शरीराला पुरवठा होणे आवश्यक असते. कारण फायबरमुळे भूक नियंत्रणात राहते. संत्र्यांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असते. तुमचं पोट भरलेलं ठेवण्याव्यतिरिक्त फायबर तुमचं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या स्तरात समतोल राखण्याचं कामही करते. तसंच आतड्यांची योग्य हालचाल होण्यासही मदत होते. पण फायबर कमी प्रमाणात असल्यानं संत्री खाणे हानिकारक ठरू शकते.

(वाचा : हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात)

प्रोटीन कमी असते
संत्र्यांमध्ये प्रोटीनची मात्रा देखील कमी असते. १०० ग्रॅम संत्र्यांमध्ये केवळ १ ग्रॅमच प्रोटीन आढळतं. स्नायू, त्वचा आणि अन्य शारीरिक पेशींच्या निर्मितीसाठी आणि शरीराची देखभालीसाठी प्रोटीन आवश्यक असते. यामुळे आपल्या आहारात अधिक प्रमाणात संत्र्यांचा समावेश करू नये.

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

मिनरल्सचं कमी प्रमाण
तसं पाहायलं गेलं तर संत्र्यांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन्सचा समावेश आहे. पण मिनरल्सची कमी आहे. संत्र्यांमध्ये लोह, झिंक, कॉपर,सेलेनिअम आणि फॉस्फोरसचे घटक नाहीत.

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

दुष्परिणामांनंतर जाणून घेऊया संत्र्याचे आरोग्यदायी फायदे
1. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते
2. रक्तदाब नियमित करते
3.किडनीचं आरोग्य सुधारते
4.कॅन्सरपीडित रुग्णांसाठी संत्रे फायदेशीर
5. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
6. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो
7. अर्थरायटिसच्या रुग्णांसाठी संत्र्यांचे सेवन करणं चांगलं

(वाचा : गाढ झोप हवी आहे का, रात्री ‘या’ 5 अन्नपदार्थांचं करा सेवन)

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Diet