DIY सौंदर्य

आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

Dipali Naphade  |  Oct 16, 2020
आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला दिवसभर अनेक ब्युटी टिप्सचा वापर करतात. पण रात्री त्वचेची देखभाल करणं हे आकर्षक दिसण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत लाभदायक असतं हे तुम्हाला माहीत आहे का? त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी तुम्हाला रात्री काही ब्युटी टिप्सचा वापर करायला हवा. या ओव्हरनाईट ब्युटी टिप्स अर्थात हॅक्स तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उपयोगी ठरतील. अशाच काही ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स आपण जाणून घेणार आहोत.  ज्यामुळे आपली त्वचा, केस यांची काळजी घेणं आपल्याला सोपं जाईल आणि समस्यांपासूनही सुटका मिळेल. 

मुरूमं आणि पुरळांपासून सुटका मिळविण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी टिप्स

Shutterstock

मुरूमं आणि अॅक्ने चेहऱ्यावरून लवकर निघायचं नाव घेत नाहीत. अशा जिद्दी मुरूमांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही ओव्हरनाईट मास्कचा वापर करावा. हा मास्क बनविण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात 3-4 चमचे कोरफड आणि टी ट्री ऑईलचे 2 थेंब घ्या. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण मुरूमं आलेल्या ठिकाणी लावा. रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर हे असंच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.  काही दिवसांनंतर तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमं आणि अॅक्ने निघून गेलेले तुम्हाला जाणवेल. तुम्ह नियमित रात्री या हॅकचा वापर करा आणि परिणाम पाहा. 

चेहऱ्यावर असतील मुरूमं, तर नक्की ट्राय करा ‘हे’ फेस वॉश (Best Face Wash For Pimples)

चमकदार त्वचेसाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

Shutterstock

चमकदार त्वचेसाठीदेखील तुम्ही ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स वापरू शकता. यासाठी तुम्हाला अत्यंत सोपी पद्धत अवलंबण्याची गरज आहे. एका बाऊलमध्ये तुम्ही 4 चमचे कोरफड जेल घ्या आणि त्यामध्ये एक चमचा जोजोबा एसेन्शियल ऑईल मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स करून त्याचे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि झोपताना हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर हे चेहऱ्यावर असेच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. 

चमकदार त्वचेसाठी घरगुती आयुर्वेदीक फेसमास्क

केसांची काळजी घेण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

Shutterstock

केसांची काळजी आजकाल खूपच जास्त घ्यावी लागते. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीने केसांना सर्वात जास्त फटका बसतो. केसगळती, कमी वयात केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे या समस्या सर्रास उद्भवतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस काढा आणि एक कप कांद्याचा रस काढून त्यात अर्धा कप कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट केसांना लावा आणि त्यावर टॉवेल गुंडाळा. रात्रभर हे असंच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी आणि माईल्ड शँपूने केस धुवा.  तुम्हाला आठवड्याभरातच याचा अप्रतिम परिणाम दिसून येईल. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

घनदाट आयब्रोने दिसेल चेहरा अप्रतिम, वापरा ही ओव्हरनाईट ट्रिक

Shutterstock

घनदाट आणि जाडसर आयब्रोसाठी तुम्ही ही अप्रतिम ओव्हरनाईट ट्रिक वापरू शकता. ही ट्रिक करण्यासाठी 1 चमचा एरंडाचे तेल, 2 थेंब मेंदीचे तेल, 2 थेंब ऑलिव्ह तेल घ्या आणि हे एकत्र करा. हे एकत्र केलेले मिश्रण आयब्रो पेन्सिलच्या मदतीने तुम्ही आयब्रोवर लावा. रात्रभर तसंच राहू द्या. आंघोळीबरोबर हे स्वच्छ करा. रोज रात्री तुम्ही ही ट्रिक केलीत तर तुमच्या भुवया अर्थात आयब्रो घनदाट आणि काळ्याभोर होतील. 

तुमच्या Eyebrows ना द्या Perfect शेप

 

 

फाटलेल्या पायांवरही तुम्ही वापरा या टिप्स

Shutterstock

पाय फुटले असतील तरत तुम्ही शिया बटर आणि कोरफड जेलचा वापर करून ही समस्या सोडवू शकता.  तसंच तुम्ही यावर देशी तुपाचाही वापर करू शकता. दोन चमचे  शिया बटर आणि 3 चमचे कोरफड जेल मिक्स करा. व्यवस्थित  मिश्रण करून घ्या. हे मिश्रण तुम्ही फाटलेल्या पायांना लावा. रात्रभर तसंच राहू द्या. नियमित हा उपाय करा आणि फुटलेले पाय बरे झालेले तुम्हाला दिसतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य