ज्योतिषशास्त्र अथवा हस्तशास्त्र हे आपल्याकडे खूप पाहिले आणि मानले जाते. काही जण यावर विश्वास ठेवतात तर काही जणांचा यावर विश्वास नाही. पण जसा विज्ञानाचा अभ्यास आहे तसाच अभ्यास ज्योतिष अथवा हस्तशास्त्राचाही आहे. याचा अभ्यास करून आयुष्यातील घडामोडींचा अंदाज घेतला जातो. तुम्हाला आतापर्यंत हे माहीत आहे की आपला हात पाहून आपले भविष्य सांगितले जातात. हाताच्या रेषांवरून काही अंदाज बांधून आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचा अभ्यास केला जातो. पण केवळ हस्तरेषाच नाही तर तुमच्या हाताच्या बोटांमधील फटही तुमच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल अथवा या व्यक्ती नक्की कशा आहेत याचा अंदाज देऊ शकतात. वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असं आहे. काही जण या हस्तरेषा आणि बोटांचा अभ्यास करून तुम्हाला अचूक या गोष्टीचा अंदाज देतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे? तर आम्ही तुम्हाला याविषयी काही माहिती सांगत आहोत.
तर्जनी आणि मध्यमा बोटाच्या मध्ये असलेली फट
तर्जनी अर्थात आपल्या अंगठ्याच्या बाजूचे पहिले बोट आणि मध्यमा अर्थात दुसरे बोट यामध्ये जर फट असेल तर अशा व्यक्ती स्वतंत्र व्यक्तीमत्वाचे अर्थात स्वतंत्र विचारांचे असतात. आपल्या आयुष्यातील ध्येय त्यांना योग्यरित्या माहीत असून त्याकडे त्यांचे व्यवस्थित लक्ष केंद्रीत केलेले असते. यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना नेहमीच मिळते. या दोन्ही बोटांमध्ये अधिक जास्त फट असेल तर या व्यक्ती स्वार्थी स्वभावाच्या असतात. आपल्याला हवं ते आयुष्यात मिळविण्याचाच कल या व्यक्तींचा असतो.
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
मध्यमा आणि अनामिकामधील फट
Freepik.com
मध्यमा आणि अनामिका या दोन बोटांमध्ये फट अर्थात ही दोन बोटं दूर असतील तर असं असणं योग्य नाही असं म्हटलं जातं. अर्थात आपण ज्या बोटात साखरपुड्याची अंगठी घालतो आणि मधील बोट यामध्ये सहसा फट असत नाही. पण तशी असेल तर ते योग्य नाही. अशी फट असेल तर ती व्यक्ती अत्यंत बेजबाबदार असल्याचे समजण्यात येते. अशा व्यक्ती केवळ स्वतःच्या फायद्याचाच विचार करतात. त्यांना इतर कोणाच्याही भावनांबद्दल देणंघेणं नसतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दोन हात लांब राहणंच सोयीस्कर ठरतं.
हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर
अनामिका आणि करंगळीमधील अंतर
अनामिका आणि सर्वात लहान बोट अर्थात करंगळीमध्ये अंतर असेल तरीही ते नक्कीच चांगले मानले जात नाही. अशा व्यक्ती अत्यंत रागीट स्वभावाची असते. आपली कामं करून घेण्यासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण आपल्या कुटुंबासाठी या व्यक्ती खूप झटतात. कुटुंबासाठी काहीही करण्याची या व्यक्तींची तयारी असते. बाहेर कोणालाही त्रास दिला तरीही कुटुंबातील व्यक्तींना त्रास झाला तर या व्यक्ती अत्यंत वाईट ठरतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तींच्या बोटांमध्ये अंतर असते त्या व्यक्ती अत्यंत उत्साही तुम्हाला दिसून येतील. शिवाय या व्यक्ती अत्यंत सकारात्मकही असतात.
हाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही
बोटांमध्ये फट नसलेल्या व्यक्ती
ज्या व्यक्तींच्या बोटांमध्ये फट अर्थात अंतर नसतं हस्तरेषा तज्ज्ञांच्या मते या व्यक्ती अत्यंत गंभीर स्वभावाच्या असतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात झाकण्याचा अथवा हस्तक्षेप करण्याचा या व्यक्ती कधी विचारही करत नाहीत. या व्यक्ती जास्त उत्साही नसतात. त्यामुळे त्यांचे आयुष्यही प्रचंड कंटाळवाणे असते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje