बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकच्या शुटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. करिअरच्या दृष्टीनं परिणितीसाठी हा सिनेमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या सिनेमात काम करण्यासाठी परिणिती सुरुवातीपासूनच उत्सुक होती आणि यासाठी ती प्रचंड मेहनत देखील घेत आहे. काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनच्या सरावादरम्यान तिला दुखापत झाली होती.
परिणितीची ‘सायना’ सिनेमासाठी मेहनत
मोठ्या पडद्यावर बायोपिकला प्रचंड यश मिळावं यासाठी परिणिती सायना नेहवालची भेट घेऊन तिच्याबद्दल, तिच्या खासगी आयुष्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी परिणिती सायनासोबत हैदराबादमध्ये आली होती. यावेळेस परिणितीनं सायना नेहवालच्या आईनं तयार केलेले बटाट्याचे पराठ्यांचाही आस्वाद घेतला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. फोटोमध्ये सायना आणि परिणिती गरमा-गरम पराठ्यांवर ताव मारताना दिसत आहेत.
(वाचा : वरूण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ सिनेमाचा थ्रीडी ट्रेलर रिलीज)
परिणिती चोप्राला वाटतेय भीती कारण…
या भेटीसंदर्भात परिणितीनं सांगितलं की, ‘सायनाला भेटल्यानंतर आता मला भीती वाटतेय की या संपूर्ण गोष्टी मी कशा पूर्ण करणार आहे.. माझ्या मेहनतीमुळे त्यांना आनंद होईल, अशी आशा व्यक्त करते’. अमोल गुप्ते ‘सायना’ सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत तर भूषण कुमार आणि कृष्ण कुमार सिनेमाचे निर्माते आहेत.
(वाचा : अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला…)
परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट
या बायोपिकव्यतिरिक्तही परिणितीकडे आणखी काही सिनेमे आहेत. सायनाच्या बायोपिकचं शुटिंग पूर्ण केल्यानंतर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ सिनेमाच्या रीमेकवर ती आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. या सर्व चर्चांदरम्यानच परिणिती चोप्रानं अजय देवगणचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’मधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमामध्ये काम करण्यासाठी परिणिती अतिशय उत्सुक होती. पण अन्य प्रोजेक्ट्समुळे ‘भुज’सिनेमासाठी तारखा देणं तिला शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे. तारखांच्या अडचणीमुळेच परिणितीनं ‘भुज’ सिनेमातून थेट एक्झिट घेणंच पसंत केलं.
भुज : देशभक्तीवर आधारित सिनेमा
‘भुज’मध्ये अजय देवगणशिवाय संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 1971मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर सिनेमाचा विषय आधारित आहे. सिनेमामध्ये अजय देवगण जवान विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक दुधिया करणार असून गिन्नी खनुजा, वजीर सिंह, भूषण कुमार आणि अभिषेक या सिनेमाचे निर्माते आहेत. 2020मध्ये 14 ऑगस्टच्या दिवशी ‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’ बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)
सोनाक्षी सिन्हामुळे सोडला सिनेमा?
मिळालेल्या माहितीनुसार,’भुज’ सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हाचीही मुख्य भूमिका आहे. रिपोर्ट्सनुसार, पण या सिनेमावरून परिणिती आणि सोनाक्षीमध्ये कोल्ड वॉर सुरू होते. सोनाक्षी वारंवार आपलं पात्र हे सिनेमातील मुख्य भूमिका असल्याचं सांगत परिणितीसोबत स्पर्धा करू पाहत होती. यामुळे दोघींमधलं बोलणंदेखील पूर्णतः बंद झालं होतं. या सर्व बाबी लक्षात घेऊन परिणितीनं सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की पाहा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहेत नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स. जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखेच. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काउंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje