मनोरंजन

पूजाने त्रास सहन केला मात्र ‘चेहरा’ लपवला नाही…

Trupti Paradkar  |  Aug 14, 2019
पूजाने त्रास सहन केला मात्र  ‘चेहरा’ लपवला नाही…

कलाकारांना शूटिंग दरम्यान बराच काळ कलाकारांना घरापासून दूर रहावं लागतं. शिवाय आजारी पडल्यावरदेखील शूटिंगच्या शेड्यूलमुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टी सहन कराव्या लागतात. असाच एक किस्सा सध्या एका नवोदित मराठी अभिनेत्रीसोबत घडला. काही दिवसांपूर्वीच ‘साजणा’  नावाची मालिका टेलिव्हिजनवर सुरू झाली आहे. ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रातील गावाकडील संस्कृती, तिथे फुलणारं प्रेम यावर ही मालिका आधारित  आहे. निखळ प्रेमाच्या विविध रंगछटा दाखवणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हे मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका कमी वेळातच लोकप्रिय होण्यात संपूर्ण टीमचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांची कामाप्रती असलेली श्रद्धा व समर्पण यामुळेच हे यश मिळवणे मालिकेला शक्य झाले आहे. चित्रीकरणादरम्यान असंच एक उदाहरण ‘साजणा’च्या सेटवर पाहायला मिळालं आहे.

पूजाला झाला होता ‘हा’ त्रास

साजणा  मालिकेत लाजऱ्याबुजऱ्या रमाची भूमिका साकारणारी पूजा बिरारी खऱ्या आयुष्यात मात्र खंबीर आणि सहनशील आहे. पूजाने या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या साजणा मालिका लोकांना फार आवडत असल्याचं दिसतं. गावाकडचा आणि प्रेमाचा विषय असेल तर तो प्रेक्षकांना लगेचच जवळचा वाटू लागतो. शूटिंग गरम्यान पुजाच्या चेहऱ्यावर ऍलर्जी आली होती. या अॅलर्जीचा तिला प्रचंड त्रास होत होता. मात्र एवढा त्रास होत असतानाही सलग ३ दिवस तिने चित्रीकरणात कुठेही व्यत्यय येऊ दिला नाही. एवढंच नाही तर ऍलर्जीमुळे होत असलेला त्रास तिने शूटिंग सुरू असताना आपल्या चेहऱ्यावर कुठेही दिसू दिला नाही. यावरून कामाप्रती असलेली तिची निष्ठा, आवड आणि समर्पण दिसून आलं. आपल्यामुळे चित्रीकरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तिने सारंकाही हसत हसत सहन केलं. एका सेटवर सुरू असलेल्या शूटिंगसाठी अनेकांचं सहकार्य गरजेचं असतं. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, प्रॉडक्शन टीम, तंत्रज्ञ असे अनेक लोक यासाठी मेहनत घेत असतात. आपल्यामुळे या  सर्वांच्या कामावर परिणाम होऊ शकतो हे पूजाने ओळखलं आणि त्रास सहन करत शूटिंग सुरू ठेवलं. ज्यामुळे चित्रीकरण सुरळीत व अखंडितपणे पार पडलं. अनेक मालिकांच्या लोकप्रियतेचे व यशाचे रहस्य हे अनेकदा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असते. अस्सल कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आपल्या वैयक्तिक गोष्टी नेहमीच बाजूला ठेवतात. कारण ‘शो मस्ट गो ऑन’

कशी आहे साजणाची ‘रमा’

साजणा मालिकेत पूजा रमाची  भूमिका साकारत आहे. रमा ही एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे पुरेसं शिक्षण न घेऊ शकलेली पण तरिही स्वाभिमानी तरूणी आहे. शिक्षण नसलं तरी रमाकडे एक प्रकारचा बेडधकपणा आहे. तिची स्वप्नं इतरांपेक्षा वेगळी आणि मोठी आहेत. शिवाय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी  तिची प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आहे. तिचं प्रेम एका श्रीमंत घरातील राजबिंड्या मुलावर जडलं आहे. प्रेमाचे हे विविध रंग दाखवणारी ही मालिका सध्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रमाप्रमाणेच पूजालादेखील स्वतः आनंदी राहायला आणि इतरांना आनंदी ठेवायला आवडतं. म्हणूनच साजणाच्या शूटिंग दरम्यान इतरांना त्रास होऊ नये यासाठी  पूजाने तीन दिवस स्वतःच्या अॅलर्जीकडे दुर्लक्ष करत चित्रीकरण सुरू ठेवलं. 

अधिक वाचा

पुन्हा डेट करत असल्याच्या अफवेवर नेहा कक्कर भडकली

बालकलाकार ज्या आता दिसतात ‘ग्लॅमरस’, बघा ओळखता येतं का

#POPxoMarathiBappa : बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहे – विद्या बालन

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन