Recipes

महाराष्ट्राची खासियत स्वादिष्ट पोपटी रेसिपी | Popti Recipe In Marathi

Dipali Naphade  |  Jan 10, 2022
popti-recipe-in-marathi

हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येते ते म्हणजे ‘पोपटी’. अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्ट्यांविषयीदेखील ऐकले जाते. काही जणांना याबाबत माहीत आहे तर काही जणांना याची अजिबातच कल्पना नाही. पण पोपटी पार्टीची मजाच काही वेगळी आहे. विशेषतः कोकणातील लोकांना आणि त्यातही रायगड जिल्ह्यातील लोकांना याबाबत अधिक माहिती आहे. पोपटी म्हणजे काय आणि पोपटी रेसिपी (Popti Recipe In Marathi) काय असते अर्थात पोपटी कशी बनवायची याबाबत आपण जाणून घेऊया. 

पोपटी म्हणजे काय? (रायगडच्या संस्कृतीतील एक आद्य प्रकार)

Popti Recipe In Marathi

पोपटी म्हणजे काय नक्की? असा प्रश्न अनेकांना पडतो. रायगड जिल्हाच्या संस्कृतीतील आद्य प्रकार म्हणजे पोपटी. वालाच्या शेंगा या भांबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजविण्यात येतात. त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात. पण सहसा मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते. भाजीपाल्यासह यामध्ये अंडी, चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढविण्यात येतो. हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते. विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुर्डा तयार करण्यात येतो. थंडीच्या दिवसात इथे हुर्डा पार्ट्या चालतात. त्याचप्रमाणे कोकणात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी ही अत्यंत प्रसिद्ध आहे. 

शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी करण्यात येते. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पा गोष्टींमध्ये या पार्टी करण्यात येतात. पोपटी पार्टीमध्ये धमाल आणि रंगत असते. शिवाय या पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहातो. पोपटी बनविण्याची एक विशिष्ट पद्धत आहे (Popati Recipe In Marathi). सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोपटीमधील वालाच्या शेंगा तुम्हीही कितीही खाल्ल्यात तरीही त्या तुमच्या पोटाला आणि शरीराला अजिबातच बाधत नाहीत. यामध्ये गावठी शेंगांचा अधिक वापर करण्यात येतो. पोपटी कशी बनवायची (Popati Mahiti Marathi) ते आपण जाणून घेऊया.

अधिक वाचा – तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ (Rice Recipes In Marathi)

पोपटी कशी बनवायची? (Popti Recipe In Marathi)

पोपटी कशी बनवायची (How to make Popti) याबाबत तुम्हाला माहीत आहे का? पोपटीमध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे भांबुर्डीच्या पाल्याचा. पावसाळ्यानंतर हा पाला माळरानामध्ये उगवलेला मिळतो. तर आपल्याकडे वसईवरूनही हा पाला येतो. या भांबुर्डीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. पोपटीमध्ये हा पाला जेव्हा घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजतात. तसंच याचा आणि शेंगांचा एकत्र स्वाद हा खूपच मस्त लागतो. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – हिवाळ्यात बनवा गरमागरम सूप, खास रेसिपी

पोपटी रेसिपी चे प्रकार (Types Of Popti Recipe in Marathi) 

पोपटीचे दोन ते तीन प्रकार आहेत. आपण त्याचीही रेसिपी (popti recipe in marathi) जाणून घेऊया. अगदी पारंपरिक पोपटी कशी बनवायची आणि त्याची बेसिक रेसिपी आपण जाणून घेतली. आता त्यामध्ये अजून कशाप्रकारे पोपटी बनवता येते ते पाहूया.

अधिक वाचा – संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चटपटीत मेन्यू

कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी रेसिपी

Instagram

कोकण म्हटलं की खोबरं आलंच. कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी रेसिपी नक्की कशी करायची घ्या जाणून. 

साहित्य

बनविण्याची पद्धत 

गावरान चिकन पोपटी रेसिपी 

Instagram

सर्वाधिक पोपटीचा बनवला जाणारा आणि खाल्ला जाणारा प्रकार म्हणजे चिकन पोपटी रेसिपी (Chicken Popti Recipe). पोपटी रेसिपी म्हटलं की सर्वाधिक डोक्यात येते ते म्हणजे चिकन. कशाप्रकारे बनते गावरान चिकन पोपटी रेसिपी जाणून घ्या 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

झणकेदार नागपुरी पोपटी रेसिपी

Popati Mahiti Marathi

नागपूरच्या भाज्या असो अथवा कोणतेही पदार्थ असोत ते झणकेदार आणि तिखटच असतात. अशीच झणकेदार नागपुरी पोपटी रेसिपी (Popati Recipe In Marathi) जाणून घ्या. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. पोपटीसाठी कोणत्या शेंगा वापराव्या?
पोपटीसाठी खरं तर गावठी शेंगानाच प्राधान्य द्यावे. याला अत्यंत चांगली चव असते. याशिवाय याची चव आणि लज्जत ही टिकून राहाते. रायगड जिल्ह्यातील नागोठणे गावातील निडी गावातील शेंगा यासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. तुम्हाला पोपटी बनवायची असेल तर या शेंगा मिळाल्यास उत्तम ठरेल. 

2. मडके चांगले की पत्र्याच्या डबा ?
मडक्याला बरेचदा तडा जातो अथवा त्यातील पोपटी अर्धी कच्ची राहण्याची भीती असते. त्याशिवाय एक वापरलेले मडके पुन्हा वापरता येत नाही. मात्र पोपटी करताना पत्र्याच्या डब्याचा वापर केल्यास हा त्रास राहात नाही आणि डबा पुन्हा वापरताही येतो. पण मडक्यातील पोपटीसारखी चव मात्र लागत नाही. 

3. पोपटी पार्टीची मजा कुठे घेता येते?
तुम्हाला रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी याचा अनुभव घेता येतो. तसंच अलिबागमध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत जिथे कॅम्पिंगमध्ये पोपटी पार्टी आयोजित केली जाते अथवा काही रिसॉर्टमध्ये पोपटी पार्टी असते जिथे तुम्ही आधी बुकिंग करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. 

Read More From Recipes